वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, WHO -
ही एक आंतरराष्ट्रीय सहकार्याने कार्य करणारी संस्था असून, रोगप्रतिबंधक व रोगनियंत्रक कार्य करणे’ हे या संस्थेचे ध्येय आहे.
ह्या संस्थेच्या प्रतिकांमध्ये एक सळई , एक साप , ऑलिव्ह झाडाची दोन पाने आणि पृथ्वी आहे.
आहे तो फक्त निसर्ग.
प्राचीन ग्रीकमधला 'असकलेपिस' नावाचा एक वैद्य होता.तो सळई आणि बिनविषारी सापाच्या मदतीने उपचार करायचा. साप म्हणजे पुनर्जन्म. कात टाकली कि साप नव्याने टवटवीत होऊन नवीन जीवन जगतो म्हणून या प्रतिकात सापाचे स्थान आहे.
ऑलिव्ह झाड हे गौरव , विपुलतेच आणि शांततेचे प्रतीक आहे.
सळई हे उपचाराचे शस्त्र आहे.पृथ्वी म्हणजे पृथ्वी आणि आपण माणसे म्हणजे त्या पृथ्वीवरचा एक थेंब.
भयंकर साथीचे रोग संसर्गामुळे पसरतात आणि अशा संसर्ग झालेल्या व्यक्तींचा विलग्नवास करण्याचे (इतरांपासून अलग ठेवण्याचे, क्वारंटाइनाचे) महत्त्व अगदी प्राचीन काळापासून लोकांना पटले होते.
चौदाव्या शतकात अशा विलग्नवासाची व्यवस्था भूमध्य समुद्रावरील बंदरात होती.
साथीच्या रोगांबद्दल जागतिक माहिती गोळा करून ती सर्व देशांना पुरविणे.१९२१ मध्ये राष्ट्रसंघाने अशी जागतिक आरोग्य यंत्रणा उभी केली
ज्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून हि संस्था स्थापन झाली तो माणूस मात्र ह्या प्रतिकात दिसत नाही.
निसर्ग वाचला म्हणजे माणसं वाचतील हाच संदेश देत आहे हि संस्था. #कोरोना संपल्यावर निसर्ग वाचवू , आपणच आपल्याला वाचवू यासाठी प्रामाणिकपणे झटुया. #म#निसर्गप्रतीक #अंघोळीचीगोळी
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
एकट्याने तब्बल एक कोटी झाडे लावणाऱ्या या अज्ञात हिरोची कहाणी प्रत्येकाने वाचायलाच हवी!
गो ग्रीन नावाखाली आपण ५-१० झाडं किंवा फार तर २० झाडं लावली असतील. पण एका व्यक्तीने, एकट्याने एक कोटीं पेक्षा जास्त झाडे लावली आहेत. कोण आहे ही व्यक्ती?
एक चांगला शिकला सवरलेला माणूस,
निसर्गाच्या रक्षणाचा ध्यास घेतलेला माणूस, निसर्गाचे महत्व कळलेला माणूस. पण सर्वज्ञात नसलेला अत्यंत साधा माणूस.सायकलवर फेरी मारायची, त्यामुळे कसलाही खर्च नाही. बिया देण्याचं काम झाडेच करतात. फक्त साठवायच्या आणि वेळ मिळाला की पेरून यायच्या. हे मोठ्ठ काम ह्या व्यक्तीने हाती घेतलं
पण कुठेही बोभाटा न करता.गावातल्या काही लोकांना ह्या माणसाच्या वेड्या छंदाची माहिती होती. काही लोक वेडा माणूस म्हणायचे, उगाच वेळ वाया घालवतोय म्हणायचे. पण ह्याचे काम चालूच. ध्यासच घेतला होता जणू..!या अवलीयाचं नाव आहे दरीपल्ली रामय्या. तेलंगणा राज्यातल्या ‘खंमम’ जिल्ह्यातला हा
भारतीय स्वातंत्र्याची ७३ वर्ष यावर्षी पुर्ण होत आहेत. ब्रिटिशांशी चाललेल्या या लढ्यात अनेकांनी आपले योगदान दिले आणि अखेर ब्रिटिश राजवट खालसा झाली पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण देशांचे नागरिक
म्हणुन आपल्या मुलभूत गरजांसाठी काम करण्यास सुरुवात केली. पंचवार्षिक योजना, हरित क्रांती, दुग्ध क्रांती, माहिती आणि तंत्रज्ञान, उद्योग व्यापार, डिजिटल क्रांती सर्वच क्षेत्रांत आपण दिवसेंदिवस एक पाऊल पुढे टाकत आहोत. दुर्गम भागात रस्ते, लाईट, पाणी पोहचवण्यासाठी आपण पुढाकार घेत आहोत
आपल्याला अत्यावश्यक वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण शासन दरबारी पाठपुरावा करत आहोत. मात्र भारतीय स्वातंत्र्याची ७३ वर्ष उलटुन गेली तरी येथील झाडे अजुनही पारतंत्र्यात आहेत. हो नक्कीच आहेत कारण आपल्याकडे झाडांसाठी अनेक कायदे नमुद असले तरी हे कायदे मोडणाऱ्या एखाद्या व्यक्ती
ढगांचे खुप प्रकार असतात. त्यातला एक प्रकार असतो Cirrocumulus ढग. हे आपलं विमान ज्या उंचीला उडतं ना त्याच्या थोडं खाली असतात (ढोबळ मानाने पृथ्वी पासुन 5 ते 10 हजार मिटर उंचीवर). पांढरे शुभ्र ढगांचे पुंजके आपण बघतो ना ते हेच. आपलं विमान यातुन जातं तेव्हा आपण रोमांचीत होतो.
हे पावसाचे ढग नव्हेत. पावसाचे ढग म्हणजे Nimbus. ते काळेशार असतात. ज्यांना बघुन कालिदासाला मेघदुतम सुचलं आणि त्याने एका निंबस ला आपल्या प्रेयसी पर्यंत आपला निरोप पोहोचवण्याची विनंती केली. ते असो, Cirrocumulus ढग पांढरे शुभ्र असल्याने आणि त्यांच्यात पाणी सुपर कुल्ड स्वरुपात
गोठलेले असल्याने पृथ्वीचे तापमान वाढू देत नाही. यांच्या वरुन उष्णता परत अवकाशात परावर्तीत होते वगैरे तो तांत्रिक भाग पुन्हा कधी तरी. मात्र आता Cirrocumulus ढग ग्लोबल वार्मिंग मुळे प्रचंड प्रमाणात कमी होत चाललेत. परिणामत: आपण 1, 1.5, 2 अंशाने तापमान वाढणार असं जे वातावरण निर्माण
शिवाजी महाराज आणि पाणी व्यवस्थापन
गेले अनेक दिवस पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात पाऊस पडला नाही. लोकांना #अंघोळीचीगोळी घ्यावी लागते का काय शी भीती आहे.पण शिवाजी महाराजांनी त्या काळात पाण्याचे व्यवस्थापन व्यवस्तिथ पार पडले.आपण कधी महाराजांचा विचार आत्मसात करणार ?
सह्याद्रीच्या शिखर
माथ्यावर अनेक गड-किल्ले आहेत. त्यातील काही शिलाहार, यादवकालीन तर काही शिवकालीन गड-कोट आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य या गड-किल्ल्यांच्याच आश्रयाने उभे राहिले होते, त्यामुळे गडावर त्यांचे विशेष प्रेम. डोंगरमाथ्यावरील या किल्ल्यांवर प्रथम प्राधान्य पिण्याच्या पाण्याला असे.
आज्ञापत्रातील दुर्गप्रकरणामधील गडाची राखण या विषयासंबंधी लिहिले आहे. त्यात ते म्हणतात, 'तसेच गडावर आधी उदक पाहून किल्ला बांधावा, पाणी नाही आणि ते स्थळ तो आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी आधी खडक फोडून तळी, टाकी पर्जन्यकाळापर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरेल अशी मजबूत बांधावी. गडावरी
काल एक ट्विट आले.
परिषद शाळा अजिवली,पनवेल.
शाळेतील सर्व झाडे विनाकारण तोडली आहेत.
कृपया चौकशी करण्यात यावी.@Nitin_Mali यांचे .
वाटले की
" प्रत्येक कायद्यासाठी स्वतंत्र पोलीस "
आपल्याला माहित आहे अन्याय झाला तर पोलीस मदत करतात.ही साधी सोपी परंपरा आहे.
गुन्हा सिद्ध करायला पोलीस न्यायदेवतेला साथ देतात.आज, भारतीय दंड संहिता (IPC) १८६० नुसार झालेल्या गुन्ह्यांसाठी पोलीस असतात असे आपल्याला ठोबळपणाने माहित आहे.
गुन्हा हा पोलीस स्टेशन मध्ये नोंदवला जातो,मग पुरावे, मग न्यायालयाच्या 'तारीख पे तारीख'.ज्यावेळेस न्याय नको पण ह्या
न्यायालयाच्या कचाट्यातून सोडव देवा अशी अवस्था होते तेव्हा कुठे न्याय मिळतो. पण मग त्याला न्याय म्हणायचे का ?
गुन्हा कोणत्या कायद्याखाली नोंदवायचा याबाबत पोलीस अनेकवेळा संभ्रमात असतात.अहो इथे लाखो कायदे आहेत. एक उदाहरण सांगतो. क्वारंटाईन झालेल्या एका इसमाला सोसायटीने लिफ्ट
कोण म्हणतं, खिळ्याने फक्त चायनाचे #ChinaArmy सैनिकच जीव घेतात ?
शहरातली झाडं पहिली तर कळेल की खिळ्यांनी फक्त माणसंच नाही तर झाडंसुद्धा तीळ तीळ मारायची कला आपल्याच काही माणसांना अवगत आहे.हो ,आपल्याच माणसांना.
'हिंदी-चिनी भाई-भाई' यावर आजही आमचा ठाम विश्वास आहे.
माणूस वाईट नसतोच पण त्या माणसाचे काही दुर्गुण वाईट असतात.आपल्याला माणूस नाही तर त्यांच्यातला दुर्गुण संपवायचा आहे.
हो,२० सैनिक शाहिद झाले,वाईट झाले.सलाम सर्वांना.त्या सैनिकांनी आपल्या भारताची रक्षा केली होती. भारताची म्हणजे डोंगर,नदी,नाले,झाडे,माणसं,प्राणी,बिल्डिंगा,शेतं हे सगळे
...बरोबर ना ?
पण मग त्या सैनिकांकडूनच का अपेक्षा ठेवायची सगळ्या भारताची रक्षा करण्याची ?
आपण नाही का रक्षा करू शकत ? निदान आपल्या आजुबाजुंच्या झाडांची !
खिळे मारणे काय आणि खिळ्यांनी मारणे काय,दोन्हीही सारखेच.
चिनी सैनिकांबद्दल आमच्याही मनात राग आहे. @PMOIndia@CMOMaharashtra