💊 #BathPill 💊- Skip a Bath अंघोळीची गोळी Profile picture
Taking a #BathPill means skipping a bath intentionally.This saves natural resources & thus🌍.💊is a common #ClimateAction for 8 bn people. We do #NailFreeTree

Apr 30, 2020, 5 tweets

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, WHO -
ही एक आंतरराष्ट्रीय सहकार्याने कार्य करणारी संस्था असून, रोगप्रतिबंधक व रोगनियंत्रक कार्य करणे’ हे या संस्थेचे ध्येय आहे.
ह्या संस्थेच्या प्रतिकांमध्ये एक सळई , एक साप , ऑलिव्ह झाडाची दोन पाने आणि पृथ्वी आहे.
आहे तो फक्त निसर्ग.

प्राचीन ग्रीकमधला 'असकलेपिस' नावाचा एक वैद्य होता.तो सळई आणि बिनविषारी सापाच्या मदतीने उपचार करायचा. साप म्हणजे पुनर्जन्म. कात टाकली कि साप नव्याने टवटवीत होऊन नवीन जीवन जगतो म्हणून या प्रतिकात सापाचे स्थान आहे.
ऑलिव्ह झाड हे गौरव , विपुलतेच आणि शांततेचे प्रतीक आहे.

सळई हे उपचाराचे शस्त्र आहे.पृथ्वी म्हणजे पृथ्वी आणि आपण माणसे म्हणजे त्या पृथ्वीवरचा एक थेंब.
भयंकर साथीचे रोग संसर्गामुळे पसरतात आणि अशा संसर्ग झालेल्या व्यक्तींचा विलग्नवास करण्याचे (इतरांपासून अलग ठेवण्याचे, क्वारंटाइनाचे) महत्त्व अगदी प्राचीन काळापासून लोकांना पटले होते.

चौदाव्या शतकात अशा विलग्नवासाची व्यवस्था भूमध्य समुद्रावरील बंदरात होती.
साथीच्या रोगांबद्दल जागतिक माहिती गोळा करून ती सर्व देशांना पुरविणे.१९२१ मध्ये राष्ट्रसंघाने अशी जागतिक आरोग्य यंत्रणा उभी केली

ज्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून हि संस्था स्थापन झाली तो माणूस मात्र ह्या प्रतिकात दिसत नाही.
निसर्ग वाचला म्हणजे माणसं वाचतील हाच संदेश देत आहे हि संस्था.
#कोरोना संपल्यावर निसर्ग वाचवू , आपणच आपल्याला वाचवू यासाठी प्रामाणिकपणे झटुया. #म #निसर्गप्रतीक
#अंघोळीचीगोळी

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling