रिपब्लिक चॅनल असो, सोशल मीडियावर होणारी गुंडगिरी असो वा फडणवीसांसकट सर्व नेत्यांची होणारी ट्रोलिंग असो -
भाजपची लंगडी बाजू उघडी पडली आहे प्रत्येक वेळी. +
मागे कोरोनामुळे प्रदूषण कमी झालं आणि बऱ्याच गोष्टी स्पष्ट दिसायला लागल्या - हे विनोद बरेच फिरले. तसंच काहीसं भाजपचं झालं आहे. +
कोरेगाव भीमा प्रकरणात पत्रकरांनी चक्क भावना भडकवण्याची सुपारी घेतल्यागत वर्तन केलं. प्रक्षोभक ट्विट्स, भाषणं, लेख...सगळं केलं. दिल्लीत दंगल घडली - ती पण अशीच. +
भाजपला फक्त निवडणूक लढवून सत्ता मिळवणे : यापूरतंच युद्ध लढायचं असतं. आयडिलॉजिकल वॉरफेअर ट्वेन्टी फोर बाय सेव्हन सुरू ठेवायला हवं - हे भाजपला मान्यच नाही असं वाटतं. त्याचे परिणाम मात्र देशाला, समाजाला, समर्थकांना भोगावे लागतात. +
पण भाजप अजूनही आपली लंगडी बाजू भक्कम करताना दिसत नाही. एवढं होतंय तरीही परिस्थिती सुधारेल असं वाटत नाही.
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com