( मोईन अली )
" पिलू मी तुझ्या शिवाय जगू शकत नाही रे... काहीही करू पण लग्न करू पुढे होईल ते होईल... "
हो पण तू नंतर काही तरी वेगळं बोलू नकोस म्हणजे झालं असा प्रश्न विचारताच ती मला पटकन मिठी मारून " तुला विश्वास नाही का माझ्यावर "
घरात असलेला आजारी बाप, लोकांच्या शेतात कामाला जाणारी आई आणि अंगावर फटका शर्ट घालून दप्तर नाही म्हणून हातात वही पकडून शाळेत जाणार लहान भाऊ मला दिसेनासे झाले होते. मनात फक्त तिच्या प्रेमाचा काहूर सुरू होता काहीही झालं तरी ती पाहिजे नाही तर मरणं बेहत्तर अशीच
रात्रीचे ११:३० वाजले आमचे चॅटिंग सुरूच होते तिने खात्री केली तिच्या घराचे झोपले आहेत याची त्याप्रमाणे मी ही आई बाबा यांचे आशीर्वाद घेतले पुन्हा भेट होईल की नाही याची शाश्वती न्हवती मन रडत
( क्रमशः )
मित्रांनो आज पहिल्यांदा लिहिण्याचा प्रयत्न केला आहे यामध्ये अनेक चुका असतील कृपया आपण त्या मला सांगाव्यात ही विनंती. आवडले तर आपण
@Manoj2211Khare @SahilVastad @dreamzunite @Girish_javeer @Piyuuu8888 @dipalikale14 @LSonure @Madhuri47_47_47