राजर्षि छञपती शाहू महाराज यांना स्मृतीदिन निमित्त विनम्र आदरांजली
छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून देऊन सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी दलित व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली (१/४)
बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्र, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत म्हणून शिक्षण तसेच विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर देऊन त्यानुसार त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि तो अमलात आणला.(२/४)
सामाजिक सुधारणांबरोबरच शेतीस व उद्योगधंद्यांस प्रोत्साहन दिले. अनेक कृषी व औद्योगिक प्रदर्शने भरविली. पन्हाळ्यावर चहा, कॉफी, रबर यांच्या लागवडींचे प्रयोग केले. कृषी उत्पादनासाठी शाहूपुरी, जयसिंगपूर यांसारख्या बाजारपेठा वसविल्या. (३/४)
कोल्हापुरात कारखानदारीचा पाया रचला. ‘शाहू मिल' ची स्थापना करून आधुनिक वस्त्रोद्योगास त्यांनी चालना दिली.
तसेच सहकारी संस्थांचे जाळे संस्थानात मजबूत केले. भोगावती नदीवर राधानगरी येथे धरण बांधून घेतले.(४/४)
११ मे ११९८ च्या या दिवशी, भारताने राजस्थानच्या पोखरण येथे भारतीय सैन्याच्या कसोटी श्रेणीतील शक्ती-१ अणुचाचणी यशस्वीपणे पार केली. भारताने तांत्रिक यश मिळविले.
तसेच नॅशनल टेक्नॉलॉजीने हंसा-3 हे भारताचे पहिले स्वदेशी विमानही निश्चित केले आहे. हे राष्ट्रीय अंतराळ प्रयोगशाळांनी विकसित केले आहे.
अंतराळ इंजिनिअर (Aerospace Engineer) आणि राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वात पोखरणमधील पाच अणु चाचण्यांपैकी ही पहिली होती.
वॉल्ट डिस्ने, बाळासाहेब ठाकरे, डेव्हिड लो, श्रीकांत ठाकरे, आर.के. लक्ष्मण, मॉर्ट ड्रकर, जॅक डेव्हिस या महान व्यंगचित्रकारांना विनम्र अभिवादन करतो.(१/४)
व्यंगचित्रातून मिळणारा आनंद हा माणसाला त्याचे दु:ख क्षणभर का होईना विसरायला भाग पाडतो. म्हणूनच जीवनानंद देणा-या या व्यंगचित्रक्षेत्रातील सर्व मुशाफिरांना मानाचा मुजरा..(२/४) @RajThackeray @MANJULtoons@satishacharya
स्वातंत्र्यपूर्व काळात वृत्तपत्रासोबतच व्यंगचित्राचाही भारतीय समाजात उगम झाला. चित्रकला हा व्यंगचित्राचा पाया आहे आणि व्यंगचित्र ही चित्रकलेची शेवटची पायरी आहे. असे असले तरीही ही अखेरची पायरीच कलावंताची खरी कसोटी घेणारी आहे.(३/४)