श्रीमन्महाराज शाहू छत्रपती कधी खडखडा घेऊन यायचे, तर कधी फोर्ड मोटार ! महाराज एखाद्याच्या घरासमोर गाडी थांबवायचे, कधी रस्त्यात थांबावायचे.
स्वतःच मोठ्याने हाक मारायचे व म्हणायचे,"चल बस गाडीत !"
महाराजांनी बस म्हटलं की बसायचं ! कुठे जायचंय?
#ShahuMaharaj 👇
गाडीत आता लहान मुल बसण्याइतपतही जागा नव्हती. महाराजांसहीत सर्वजण खूपच दाटीवाटीने बसले होते. तोच महाराजांना खंडेराव बागल दिसले. महाराजांनी त्यांनाही गाडीत घेतले. गाडीतले लोक जवळपास एकमेकांच्या मांडीवरच बसले होते. गाडी नवीन 👇
वाटेतच छत्रपतींच्या नऊ सर्वोच्च जहागिरदारांचे बंगले होते.
त्यांतील एका बड्या जहागिरदारदाराच्या बंगल्यात गाडी घेतली.
महाराजांनी त्या जहागिरदाराला बोलावले.
जहागिरदार पळतच बाहेर आला.
महाराज म्हणाले, "बाबा, तू चल बरोबर." बाबा गोंधळला.
गाडीत कुठे 👇
बाबा गाडीच्या दाराला तसाच लटकला.
गाडी तशीच दुसऱ्या एका जहागिरदाराच्या बंगल्यावर गेली.
तो जहागिरदार शाही पोषाखात कुठेतरी जाण्याच्या बेतात बाहेरच उभा होता, तोच महाराजांनी त्याला बोलावले, "आप्पा तू पण चल रे जरा बरोबर."
👇
दुसऱ्या जहागिरदाराला पाहून आप्पाही गाडीच्या मडगार्डवर उभा राहिला. गाडीला लोंबकळणारे हे दोन जहागिरदार प्रचंड मिजासखोर व रयतेला कस्पटासमान लेखणारे होते.
असे हे दोन बडे जहागिरदार शाही पोशाखात गाडीला लटकत उभे राहिलेले व गाडीच्या आत छत्रपती सोडले तर इतर 👇
गाडी परत शहराच्या दिशेने रवाना झाली.
अशा या गाडीची मिरवणूक साऱ्या गावभर काढून जहागिरदारांचा नशा उतरविला. गंमत म्हणजे, त्यांना फिरवून फिरवून तसंच बंगल्यावर सोडून दिलं. गावभर त्या जहागिरदारांची चांगलीच शोभा झाली.👇
मी तुमच्यापेक्षा त्यांना जास्त मानतो हे कृतीने छत्रपतींनी त्यांना दाखवून दिले.
#करवीरराज्य #आठवणीतले_महाराज
साभार: Karvir Riyasat
विनम्र अभिवादन 🙏