तर तेच काम करायला 50 माणसांना किती दिवस लागतील ?
काळ काम वेगाचे हे एक सोपे गणित आहे
पण सध्या हेच गणित महाराष्ट्राचे आर्थिक गणित बिघडवण्याची शक्यता आहे !
त्याला कारण करोना आणि त्यामुळे होणारे मजुरांचे रिव्हर्स मायग्रेशन !
पाणी पुरी वाला , आयटी कम्पनी बाहेर चहा विकणारा ,बिल्डिंग बांधणार ,दुकानात काम करणारा, सोसायटी ची रखवाली करणारा
अशे हे मजूर कोरोनाच्या भीतीने महाराष्ट्र सोडून जाऊ लागले ते 21 मार्च पासून !
22 मार्च ला जनता करफ्यू लागला आणि 24 मार्च ला लॉकडाऊन ! आणि तेव्हा पासून मजुरांचा स्वतःच्या गावी जायचा ओघ अधिकच वाढला !
संकट दूर होऊन मग सगळे सुरळीत होण्याची शक्यता कमीच आहे
त्यामुळे जसे गडकरी साहेब म्हणतात
कोरोना सोबत आपल्याला जगण्याची सवय लावून घ्यावी लागणार आहे !
उत्तर प्रदेश, बिहार , आणि बंगाल हे बहुतांश मजुरांच्या प्रवासाचे अंतिम ठिकाण आहे !
गावी परत आलेले मजूर पुन्हा वापस कसे जाणारा नाहीत ह्या साठी उत्तर प्रदेश सरकार प्रयत्न करत आहे !
परदेशी गुंतवणूक राज्यात वाढवून , उद्योगांना जमीन उपलब्ध करून देऊन,
आता लक्षात घ्या , जे मजूर कसेही करून गावी पोहचले आहेत , ते वापस येण्याची शक्यता कमी आहे ! दूध गरम लागल्याने ते ताक पण फुकून पिणार आहेत!
मग अश्या मजुरांना जर वापस आणायचे असेल तर त्यांना अधिक पैशाचे अमिश दाखवावे लागेल
कामगार कायद्यात बदल करणे
कामगार वेल्फेयर योजना काढणे
कामगारांच्या कुटूंबाचाही विचार करणे
ही काळाची गरज आहे ! इथे प्रांतवाद आडवा नाही आला पाहिजे
तो घरी पोहचण्यात आणि सेटल होण्यात एक टाईम गॅप आहे आणि त्या गॅप मधेच आपल्याला मैदान मारायचे आहे ! 👍