@CMOMaharashtra
मागील अनेक दिवसांपासून शेवटच्या वर्षात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षासंबंधित प्रश्न चिघळला आहे. एकीकडे इतर वर्षातील विद्यार्थ्यांना विनाअट पुढच्या वर्षात ढकलले असताना, शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांसोबत झालेल्या अन्यायाबाबत विद्यार्थी
आवाज उठवत आहेत. माननीय शिक्षणमंत्री याबाबत सल्लामसलत करत असल्याचे कळते आहे. अर्थात ते चक्रव्यूहात अडकले आहेत. हा निर्णय चलाखीने घेण्याची वेळ आता आली आहे. तांत्रिकदृष्ट्या परीक्षा घेणे हा योग्य निर्णय आहे हे मान्य असले तरी..
ही मागणी करताना काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे शासनाचे लक्ष वेधू इच्छित आहे.
- शेवटची सत्र परीक्षा विशेषतः अभियांत्रिकी क्षेत्रासाठी निर्णायक आहे का? याचा विचार व्हावा.
- काही विद्यार्थी करोना पॉझिटिव्ह सापडल्याचे कळते आहे. तर अनेकजण विलगीकरणात आहेत. अशावेळी त्यांच्या मानसिकतेचा विचार व्हावा.
- कॅम्पस मुलाखतीत
- करोनासंदर्भात आलेल्या अनेक अहवालानुसार, जून-जुलै महिन्यात करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. अशावेळी
- परीक्षेला येणार प्रत्येक विद्यार्थी फिट असेल कशावरून? अशावेळी विद्यार्थ्यांसोबत कुटुंबीयांचा जीव
- परीक्षाकेंद्रात मुले भीतीच्या सावटाखाली परीक्षा देऊ शकतील काय?
- पावसाळ्यात मुंबईचे हाल काय असतात यांबद्दल वेगळे काय लिहावे? अशावेळी बहुतांश अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे कॉलेज कल्याणपलीकडे असल्याने. केंद्र देखील त्याच भागात
- परीक्षा काळात एखाद्या विद्यार्थ्यास करोनाची लागण झाल्यास विद्यापीठ किंवा राज्य शासन त्याची जबाबदारी घेईल का?
- इतर तीन वा दोन वर्षातील विद्यार्थी, एक सत्र स्किप करूनच पुढे जाणार आहेत. अशावेळी या चार वर्षातील विद्यार्थ्यांना
- परीक्षा महत्त्वाच्या असल्या तरी आपल्याकडे कागदी गुणांना किती महत्त्व आहे याबाबत आपणास कल्पना असेलच, या चार वर्षातील विद्यार्थ्यांसाठी तज्ञांच्या मदतीने
विद्यार्थीहितासह एकूणच मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य निर्णय घेऊन इतिहास रचण्याची (अपवादात्मक चार बॅच या दृष्टीने) उत्तम संधी आहे. धन्यवाद!