■ व्यवसायधारकाने दुकानाची वेळ निश्चित केल्याप्रमाणे म्हणजे सकाळी ०९.०० ते सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत ठेवावी.
■ व्यवसायधारक आणि काम करणारे हे प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेरील भागात राहणारे असणे आवश्यक आहे.
■ दुकानामध्ये काम करताना दोन कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे.
■ दुकानात काम करण्याच्या सर्व व्यक्तींनी मास्क आणि हातमोजे (Hand gloves) वापरावे.
■ कर्मचाऱ्यांना हात वेळोवेळी स्वच्छ धुण्यासाठी सावण/मॅनिटायझरची व्यवस्था करावी व आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून द्यावी
■ दुकानाचे काउंटर गिहाईक सोडून गेल्यानंतर १% सोडियम हायपो क्लोराइट द्रावणाने पुसून घ्यावी.
■ दुकानात खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकाने देखील मास्क घालणे आवश्यक आहे.