Murlidhar Mohol Profile picture
महापौर, पुणे (२०१९-२२) | Mayor of Pune (2019-22) | भाजप | BJP | मते वैयक्तिक | स्वयंसेवक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ |
Jun 22, 2021 4 tweets 3 min read
प्रतीक्षा संपली; उद्यापासून १८ वर्षांवरील सर्वांना लस !

पुणे मनपा कोरोना लसीकरण : बुधवार, दि. २३ जून २०२१ चे नियोजन आणि सर्व लसीकरण केंद्राची यादी !

(१/४) प्रतीक्षा संपली; उद्यापासून १८ वर्षांवरील सर्वांना लस !

पुणे मनपा कोरोना लसीकरण : बुधवार, दि. २३ जून २०२१ चे नियोजन आणि सर्व लसीकरण केंद्राची यादी !

(२/४)
Jun 19, 2021 6 tweets 2 min read
पुणे शहरातील बोगद्यांच्या कामाला वेग येणार !

आपल्या पुणे शहरातील पाषण ते कोथरूड वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि सेनापती बापट रस्त्यावर येणारा ताण कमी करण्यासाठी प्रस्तावित असणाऱ्या पंचवटी, पाषाण ते कोथरूड आणि पंचवटी, पाषाण ते गोखले नगर या दोन्ही बोगद्यांच्या कामाला गती येणार आहे. असून या संदर्भात पालकमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. या बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी या दोन्ही बोगद्यांच्या कामाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत.

बोगद्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आणि कामाला गती देण्याच्या उद्देशाने आज बैठक पार पडली.
Jun 19, 2021 4 tweets 2 min read
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमार्फत राबविण्यात येत असलेल्या नवीन एकात्मिक दुमजली उड्डाणपूल, भुयारी मार्ग व इतर उपाययोजना बांधकाम करणेबाबत महापौर कार्यालयात बैठक पार पडली. बैठकीत हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गमधील सावित्रीबाई फुले विद्यापीठ प्रस्तावित असलेल्या दुमजली उड्डाणपूल भुयारी मार्ग व इतर उपाययोजना बांधकाम करणेबाबत चर्चा करण्यात आली.
May 29, 2021 5 tweets 1 min read
परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण 'ड्राईव्ह' !

शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण करण्याचा निर्णय घेतला असून विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे. पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील लसीकरण केंद्रात आपण हा विशेष ड्राईव्ह राबवणत असून नोंदणी न करता थेट 'वॉक इन' पध्दतीने परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जाणार आहे.
May 26, 2021 4 tweets 2 min read
पुणे शहरातील लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा सक्षमपणे सामना करण्यासाठी आपले विविध पातळ्यांवर सर्वतोपरी प्रयत्न सुरूच आहेत. याचाच एक भाग म्हणून @MCCIA_Pune आणि @ppcr_pune ने पुढाकार घेत ऑनलाईन बैठक आयोजित केली होती. ImageImageImageImage या बैठकीला माझ्यासह स्थायी समिती अध्यक्ष श्री. हेमंत रासने, सभागृह नेते श्री. गणेश बिडकर, आयुक्त श्री. विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, 'पीपीसीआर'चे मुख्य समन्वयक श्री. @sudhirmehtapune,
May 13, 2021 5 tweets 2 min read
लसीकरणाची माहिती आता घरबसल्या !

पुणे शहरात नागरिकांना लसीकरण केंद्रावर गेल्यावर सध्या मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहण्यास मिळते. त्या पार्श्वभूमीवर पुणेकर नागरिकांना उद्या कोणत्या केंद्रावर किती डोस मिळणार, ही माहिती घरबसल्या मिळणार आहे. त्यासाठी संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले असून पुणेकरांना लसीकरणासंदर्भातील सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

लसीकरणासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती आता punevaccination.in या संकेतस्थळावर मिळणार असून याचे लोकार्पण आज माझ्या हस्ते करण्यात आले.
May 11, 2021 6 tweets 2 min read
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी विशेष टास्क फोर्सची स्थापना !

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना पुणे महानगरपालिका सक्षमपणे करत असून तज्ञांची मते लक्षात घेता तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आपण सज्जता ठेवण्यास प्राधान्य देत आहोत. Image याचाच एक भाग म्हणून लहान मुलांच्या कोरोना उपचारांसाठी आणि त्यांच्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विशेष टास्क फोर्सची स्थापना केली आहे.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर पुणे शहरातील बालरोग तज्ञांची महत्वाची बैठक ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. Image
May 7, 2021 8 tweets 2 min read
#Thread | पुणे महापालिकेच्या वतीनं आपण उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार !

पुणे शहराबाबत मुंबई उच्च न्यायालयात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जुनी सादर करण्यात आली असावी. पूर्वीसारखी परिस्थिती पुण्यात आता नाही. म्हणूनच या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये संभ्रम आणि...
(१/८) भीती निर्माण होऊ नये, या उद्देशाने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. तसेच पुण्यात आणखी कडक लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता नसल्याचीही आपली भूमिका आहे.

पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी जी उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे.
(२/८)
May 5, 2021 5 tweets 2 min read
अवघ्या दोन आठवड्यात साकारला 'ऑक्सिजन जनरेटिंग प्लान्ट' !

रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनारुग्णांची संख्या आणि ऑक्सिजनचा विस्कळीत पुरवठा लक्षात घेता आपण अवघ्या दोन आठवड्यात 'ऑक्सिजन जनरेटिंग प्लान्ट' दळवी हॉस्पिटलमध्ये साकारला असून ऑक्सिजन निर्मितीलाही सुरुवात झाली आहे. ImageImageImageImage प्रस्ताव ते प्रत्यक्ष ऑक्सिजननिर्मिती अवघ्या १५ दिवसात शक्य केले आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आले.

ऑक्सिजन मागणीच्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती आणि पुरवठा होत नाही. महापालिकेच्या दळवी हॉस्पिटलमध्ये १३० ऑक्सिजन बेड्स आहेत.
Aug 17, 2020 5 tweets 1 min read
शास्त्रज्ञांनी पुण्यात केलेली रक्तनमुन्यांच्या ताज्या अभ्यासानुसार सार्स कोव्ही-२ विरुद्ध IgG अँटिबॉडी म्हणजे प्रतिपिंड मोठ्या प्रमाणात आढळली आहेत. अभ्यासासाठी निवडलेल्या विविध ५ प्रकारच्या निवासस्थानात राहणाऱ्या व्यक्तींमध्ये प्रतिपिंडाचे प्रमाण ३६.१ ते ६४.४ पर्यंत दिसत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था, ट्रान्सलेशन स्वास्थ्य आणि तंत्रज्ञान संस्था, फरिदाबाद आणि ख्रिश्चन वैद्यकीय महाविद्यालय, वेल्लोर यांच्या वतीनं हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
Jul 27, 2020 7 tweets 3 min read
राज्य सरकारने महापालिकेला आर्थिक मदत द्यावी आणि वैद्यकीय सेवा वेगाने उभ्या करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली !

कोरोना संकटाच्या काळात गेली साडेचार महिने आपल्या महापालिकेने २५० कोटींपेक्षा जास्त खर्च करत सर्व यंत्रणा सक्षमपणे चालविली, आजवर कोणतीही आर्थिक अडचण येऊ दिली नाही. परंतु आता राज्य शासनाने पुणे महापालिकेला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आज राज्याचे उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks दादा यांच्याकडे केली. पुणे शहरात नव्याने तीन जम्बो आयसोलेशन सेंटर उभे करण्यात येणार आहेत. यामध्ये तिन्ही सेंटरमध्ये ऑक्सिजन व आयसीयू बेड्स उभे करण्यात येणार आहेत.
Jul 23, 2020 6 tweets 2 min read
पुणे शहरातील गणेशोत्सवाचं नियोजन !

कोरोनाचं गडद होणारे संकट आणि पुण्याची ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त महत्वाची बैठक माझ्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. उत्सवाचे स्वरूप, सार्वजनिक मंडळे आणि घरगुती बाप्पा याबाबत विविध मुद्द्यावर चर्चा झाली.
(१/६) @threadreaderapp
या बैठकीला उपमहापौर सरस्वतीताई शेंडगे, सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार, आरपीआय गटनेत्या सुनिताताई वाडेकर, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस उपायुक्त सपना गोरे यांच्यासह महापालिकेतील अधिकारी उपस्थित होते.(२/६)
Jun 2, 2020 4 tweets 1 min read
Outside Containment Zone मध्ये दुकाने सुरु करताना घ्यावयाची दक्षता

■ व्यवसायधारकाने दुकानाची वेळ निश्चित केल्याप्रमाणे म्हणजे सकाळी ०९.०० ते सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत ठेवावी.

■ व्यवसायधारक आणि काम करणारे हे प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेरील भागात राहणारे असणे आवश्यक आहे. ■ दुकानदारांनी कामगारांना फोटोसह ओळखपत्र द्यावे.

■ दुकानामध्ये काम करताना दोन कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे.

■ दुकानात काम करण्याच्या सर्व व्यक्तींनी मास्क आणि हातमोजे (Hand gloves) वापरावे.
May 21, 2020 5 tweets 2 min read
गणेशोत्सव आणि माझ्यातला कार्यकर्ता !

पुणे शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत आगामी गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे. या संवेदनशील आणि समाजाभिमुख निर्णयाबद्दल सर्व मंडळांचे पुणेकरांच्या वतीनं मनःपूर्वक धन्यवाद ! मी स्वतःदेखील सर्वात आधी गणेश मंडळाचा कार्यकर्ता. गणेशोत्सव कार्यकर्त्यांसाठी नेमका काय असतो? हे शब्दांत सांगणे कठीण आहे. वर्षभर आतुरतेने उत्सवाची वाट पाहत असताना उत्सव जसजसा जवळ येतो, तसतसा अंगात वेगळाच उत्साह अंगात संचारतो.
Apr 30, 2020 4 tweets 1 min read
पुण्यातील काही भागात उद्यापासून केवळ दूध आणि मेडिकल सेवा !

कोरोना प्रादुर्भाव अधिक असलेल्या भागात उद्यापासून तीन दिवस किराणा, भाजीपाला, फळे, चिकन, मटण, अंडी विक्री बंद राहणार राहणार असून दूध विक्री स.१० ते दु.१२ सुरु असेल तर घरोघरी दूध विक्रीसाठी स. ६ ते १० वेळ असेल.

(१/४) ■ पूर्ण हद्दीत बंधने असलले ठाणे

समर्थ, खडक आणि फरासखाना

■ काही भागात बंधने असलेले पोलीस ठाणे...

● स्वारगेट पोलीस ठाणे●
गुलटेकडी, महर्षीनगर झोपडपट्टी परिसर, डायस प्लॉट, इंदिरानगर, खड्डा झोपडपट्टी

(२/४)
Apr 13, 2020 4 tweets 1 min read
पुण्यातील आणखी २२ भाग पूर्णपणे सील !

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुणे शहरातील आणखी २२ भाग पूर्णपणे सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, ही सर्वांना मनापासूनची विनंती !

#PuneFightsCorona सील करण्यात येत असलेले भाग...
१) पत्राचाळ, लेन नंबर १ ते ४८ आणि परिसर, प्रभाग क्रमांक २०
२) संपूर्ण ताडीवाला रोड
३) घोरपडी गाव, विकासनगर, बालाजीनगर, श्रावस्तीनगर, प्रभाग क्रमांक ०२
४) राजेवाडी, पद्मजी पोलीस चौकी, जुना मोटर स्टँड, संत कबीर, AD कॅम्प चौक, क्वार्टर गेट