६ जून १६७४ हा दिवस खुप महत्त्वाचा आहे, हा दिवस महाराष्ट्राच्या भाग्यात सहजासहजी आला नव्हता, त्यामागे जवळपास ३० वर्षाचे अविश्रांत घेतलेले कष्ट होते, #Shivrajyabhishek #शिवराज्याभिषेक
मूळ सत्तेपासून बंड पुकारलेले एक बंडखोर म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जात होते, उदा. जावळीचे मोरे स्वतःला राजे मानत पण शिवाजी महाराजांना राजे मानायला ते तयार नव्हते, #Shivrajyabhishek #शिवराज्याभिषेक
जनतेमध्ये सुरक्षतेची, स्थैर्याची भावना निर्माण व्हावी, स्वराज्याला स्थैर्य लाभावे यासाठी शास्त्रशुद्ध, विधीयुक्त राज्याभिषेक करून घेणे, हाच एक उपाय होता, #Shivrajyabhishek #शिवराज्याभिषेक
राजा झाल्याने महसूल गोळा करणे आणि प्रजेकडून निष्ठेची अपेक्षा करणे या गोष्टी सोप्या झाल्या, #Shivrajyabhishek #शिवराज्याभिषेक
राज्याभिषेक दिनानिमित्त महाराजांना मानाचा मुजरा. #Shivrajyabhishek #शिवराज्याभिषेक