My Authors
Read all threads
भारतच्या विरोधात आकार घेत असलेले अंतर्राष्ट्रीय षडयंत्र !
- प्रशांत पोळ

चीनच्या तुकड्यांवर पाळले जाणारे वामपंथी आणि भारताच्या वाढत्या प्रभावाने घाबरलेले काही देश, एक झाले. आणि मग साकार होऊ लागले, भारताच्या विरोधात एक अंतर्राष्ट्रीय षडयंत्र – Mission_Defame_India.
भारताने २३ मार्च पासून लॉकडाउन घोषित केले होते. बरखा दत्त ने २६ मार्चला ‘वॉशिंगटन पोस्ट’ मध्ये एक आर्टिकल लिहिले. शीर्षक होते, ‘As India goes into lockdown, fear spreads. Poverty may kill us first’.
बरखा दत्त, अरुंधति रॉय, सागरिका घोष, राजदीप सरदेसाई यांच्यासारख्या लोकांचा अंदाज होता की, 'हे लॉकडाउन भारतीय सहन करू शकणार नाहीत. यांचे जेवणाचे वांधे होतील आणि भीतीमुळे विद्रोह उभा राहील.

पण असे झाले नाही.
आपला देश केवळ सरकारी तंत्राने चालत नाही.इथे समाज सक्रिय आहे. संकटाच्या या वेळी एक अब्ज तीस करोड लोकांमधील राष्ट्रपुरुष जागा झाला. एक – दोन दिवसात संपूर्ण देशात व्यवस्था तयार झाली. समाज तंत्र भक्कमपणे उभे राहिले. प्रत्येक भूकेलेल्या अन्न मिळू लागले.
जो जिथे होता, तिथे त्याची काळजी घेतली गेली.पुनश्च, संपूर्ण जग आश्चर्याने भारताकडे पाहू लागले. संपूर्ण विश्वात अशा प्रकारची, संपूर्ण लॉकडाउनची हिंमत कोणी केली नाही. भारताने केली. त्यामुळे भारत विरोधी एक नवी नीती अमलात आणली गेली. ‘इस्लामीफोबिया’
अर्थात भारतात इस्लाम विरोधी वातावरण तयार होत आहे,अशी आरडाओरड. कोरोनाच्या प्रसारासाठी भारतीय, इस्लामला दोषी मानत आहेत ,असे वारंवार सांगणे. तब्लिगी जमातीच्या विषयावर चुप बसणे, पण इस्लामला त्रास देण्याचा मामला समोर आणणे.
२ एप्रिलला राणा अय्युब सारख्या लोकांनी लिहिले की मोदी, प्रेसची अभिव्यक्ति स्वतंत्रता हिरावून घेत आहेत. २ एप्रिलच्या न्यूयॉर्क टाईम्स मध्ये लिहिलेल्या आपल्या लेखात राणा अय्युब लिहिते, ‘‘Under Modi, India’s press is not so free anymore” हा लेख रविश कुमारच्या फोटो सह छापला आहे.
तब्लिगी जमातीचे प्रकरण समोर आल्यावर राणा अय्युब चा स्वर बदलला. त्यांनी ६ एप्रिलच्या ‘न्यूयॉर्क टाईम्स’ मध्ये आपल्या लेखात लिहिले – ‘Islamophobia taints India’s response to the Corona virus’.
यात ती लिहिते, The hate found official support, when Mukhtar Abbas Naqvi, the Union Minority Affairs Minister in Modi’s cabinet, called the gathering by Tabligi Jamat, a ‘Talibani Crime’.
उज्बेकिस्तान, ताजिकिस्तान, कझाकिस्तान यासारख्या मुस्लिम देशांमध्ये प्रतिबंधित,आणि अनेक दहशतवादी कारवायांमध्ये संलिप्त असल्याचा आरोप असणाऱ्या तब्लिगी जमातीला हत्यार बनवून जागतिक मंचावर, भारताला बदनाम करण्याचे षडयंत्र साकार होऊ लागले.
नंतर यामध्ये उडी घेतली, अरुंधति रॉय हिने. ‘God of Small Things’ केवळ या एकमात्र सफल पुस्तकामुळे, जगातील मीडिया मध्ये स्थान प्राप्त करणारी सुझाना अरुंधति रॉयने यासाठी माध्यम निवडले – डोईचेवाला न्यूज अर्थात जर्मनीची सर्वात मोठी समाचार संस्था.
जर्मनी मध्ये देखील समाजवादी – साम्यवादी विचारांच्या लोकांची संख्या, मीडिया मध्ये चांगल्यापैकी आहे. अशा सर्वांनी सुझाना अरुंधति रॉय च्या ह्या मुलाखतीचा फायदा घेतला. शीर्षक होते– Muslims in India accused of Corona Virus.
सुझाना अरुंधति रॉयने या मुलाखतीत म्हटले आहे – “This crisis of hatred against Muslims, comes on the back of a massacre in Delhi, which was the result of people protesting against the anti-Muslim citizenship law.
Under the cover of COVID-19 the government is moving to arrest young students, to fight cases against lawyers, against senior editors, against activists and intellectuals. Some of them have recently been put in jail."
रॉय बाईने पुढे लिहिले आहे की “संघ आणि भाजपा हे हिटलरच्या नाझी पार्टीसारखा व्यवहार करत आहेत आणि ज्या प्रकारे हिटलरने ज्यू (यहूदी) लोकांचा वंश विच्छेद केला तसाच हे लोक मुसलमानांचा नरसंहार करत आहेत.“
संपूर्ण विश्वात भारतचे असे चित्र प्रस्तुत केल्या जात आहे की ‘भारत एक हुकूमशाही देश आहे, ज्याला हिटलरप्रमाणे मोदी चालवत आहेत. भारतात अभिव्यक्ति स्वातंत्र्य धोक्यात आहे. भारतात लॉकडाउनमुळे लोकांच्या जेवणाचे वांधे झाले आहेत.लोकं उपाशी मरत आहे. आणि भारतात इस्लामला चिरडले जात आहे,
शनिवार १८ एप्रिलला सुझाना अरुंधति रॉयचा हा साक्षात्कार, डी डब्लू न्यूज़ने जगात वायरल केला आणि दुसऱ्या दिवशी, १९ एप्रिलला टाइम्स ऑफ इंडियाच्या रविवार संस्करण मध्ये सागरिका घोषचा मोठा लेख छापून आला – ‘Covid-19 can be cured, but who will cure the communal virus?’
त्यात ती लिहिते, “The Corona Virus can be cured, but who will cure the age old communal virus, that impacts India ? Religious hatred, nurtured by the politics of bigotry (कट्टरता) is a disease, India just doesn’t want to cure.”
ह्या सगळ्या घटनांची क्रोनोलोजी पहा. ‘एखाद्या कुशल दिग्दर्शकाने वेगवेगळ्या पात्रांना, वेगवेगळ्या स्थानावर, नियोजित वेळी एंट्री घ्यायला सांगितले’ असे सगळे पाहून वाटते.

या काळात वैश्विक स्तरावर चीनवर बहिष्काराची चर्चा सुरु आहे.
संपूर्ण जगात, पर्यायरूपाने जी दोन – चार नावं समोर येत आहेत,त्यामध्ये दमदार नाव आहे – भारत.म्हणून, ह्या चीनने फेकलेल्या तुकड्यांवर पोसल्या जाणाऱ्या लोकांचे Mission_Defame_India स्पष्ट आहे
विश्व मंचावर भारताचे चित्र कट्टरतेने परिपूर्ण, असहिष्णु, हुकूमशाहाच्या रूपात प्रस्तुत करणे आणि भारतात सरकारच्या विरोधात लोकांना रस्त्यावर आणणे.
पब्लिक ट्रांसपोर्ट जर एकदम सुरू केले तर, चीनी वायरस वाढण्याचा धोका आहे, सागरिका घोषचे २१ एप्रिलचे ट्वीट आहे – If #Lockdown2 become #Lockdown3, govt @RailMinIndia must start basic rail services across India + physical distancing norms. Public Transport is a lifeline of poor.
यांनी दिल्लीत हा करण्याचा प्रयत्न केला . सत्तर / ऐंशी हजारांची गर्दी जमवली.यांना वाटले, केंद्र सरकार आता कशी पुरी पडेल..? पण दोन रात्रीनंतर , हा मामला एकदम अप्रासंगिक झाला. Non-issue बनून गेला. असा प्रयत्न मुंबईच्या बांद्रामध्ये देखील झाला. पुढेही होत राहिल.
चीनी पैशांवर नाचणाऱ्या कठपुतळ्या अजुन तमाशे उभे करतील.

पण हा 'तो’ भारत नाही ...

हा नवा भारत आहे. शक्तिशाली. मजबूत. दृढ़तापूर्वक उभा राहणारा... दमदार...!

हे सगळे षडयंत्र सुद्धा विफल होतील आणि ह्या कठपुतळ्या देखील..!
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with Most_Intolerant

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!