Malhar Pandey Profile picture
Jun 21, 2020 29 tweets 7 min read Read on X
#THREAD
विषय :-कॅप्टन विक्रम बत्रा

भारतीय सैन्याच्या अदम्य साहसाचा अनेक कहाण्या आहेत ज्याने,काही क्षणासाठी का होईना आपण भारावून जातो!हि अशीच एक कहाणी अश्या एक सैनिकाची ज्याचे नाव घेतले कि आजहि आपोआप ओठावर बोल येतात,'ये दिल मांगे मोर'. हि कहाणी आहे कॅप्टन विक्रम बत्रा यांची!
(1) Image
९ सप्टेंबर १९७४ साली हिमाचल मध्ये कमल कांत आणि गिरिधारी लाल बत्रा यांच्या पोटी विक्रम चा जन्म झाला आणि बरोबर १४ मिनिटाने विशाल म्हणजे विक्रम च्या जुळ्या भावाचा जन्म झाला
(2/28) Image
,विक्रम अगदी लहानपणा पासून त्यांच्या शाळेत एक हुशार आणि प्रत्येक गोष्टी मध्ये उत्सहाने भाग घेणारा विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता.उत्तर भारतातील सर्वोत्तम NCC कॅडेट म्हणून त्याने नाव अगदी लहानपणीच कमावले आणि वयाच्या १२ व्या वर्षी कराटे मध्ये ग्रीन बेल्ट सुद्धा मिळवला
(3/28)
विक्रम हा राष्ट्रीय पातळीचा टेनिस पटू सुद्धा होता. लहानपणा पासून देशभक्त असलेल्या विक्रम ने आर्मी जोईन करायचे ठरवले आणि त्याने CDS हि परीक्षा दिली.

विक्रम च्या बॅचलर डिग्री वर त्याला हाँग कोन्ग स्थित मर्चन्ट नेव्ही च्या कंपनीत भरपूर पगार असलेली नोकरी लागली होती पण
(4/28)
आर्मी मध्ये जाण्यासाठी म्हणून त्याने ती नाकारली, याच प्रसंगाचा दाखल देत त्यांची आई कमल म्हणतात,"जेव्हा त्याने हा निर्णय घेतला तेव्हा तो म्हणाला, आई पैसे हीच मोठी गोष्ट नाही या जगात,मला या देशासाठी काहीतरी करायचा आहे,काहीतरी विलक्षण,काहीतरी मोठं'
(5/28)
तेव्हा त्याला काय माहित होते कि हे बोल सिद्ध करण्यासाठी म्हणून त्याला किती मोठी किंमत मोजावी लागणार आहे ते.१९९६ मध्ये विक्रम CDS परीक्षेत उत्तीर्ण झाला आणि मिलिटरी अकॅडमि मध्ये लेफ्टनंड म्हणून दाखल झाला.
(6/28) Image
त्याची पहिली पोस्टिंग हि काश्मीर मधील बारामुल्ला जिल्ह्यातील सपोर या गावात झाली.तीन वर्ष उलटली आणि १९९९ साली कारगिल चे युद्ध चालू झाले,याच वेळेला विक्रम त्याची कमांडो ट्रेनिंग पूर्ण करून काही दिवसांकरिता त्याच्या घरी अर्थात हिमाचल ला गेला होता.
(7/28)
त्याच्या मित्रांसोबत तो एका कॉफी शॉप मध्ये असताना त्याचा मित्र त्याला म्हणाला
'विक्रम,युद्ध चालू झालं आहे,कुणासठाऊक तुला केव्हा बोलावलं जाईल,काळजी घे'
यावर विक्रम चं उत्तर ऐकून
(8/28)
त्याचे मित्र अचंबित झाले,
"काळजी नसावी,एक तर मी हातात तिरंगा घेऊन येईन किंवा मी तिरंग्या मध्ये बांधून येईन,पण इथे पुन्हा येईन हे निश्चित".
(9/28)
काहीच दिवसात विक्रम ला पोस्टिंग ला रिपोर्ट होण्याचा आदेश मिळाला आणि १ जून ९९ ला विक्रम पुन्हा एकदा काश्मीर मध्ये रुजू झाला.विक्रम च्या युनिट ला कारगिल मध्ये थांबण्याचे आदेश मिळाले.
(10/28)
१८ दिवसानंतर म्हणजे १९ जून १९९९ ला या युनिट ला पॉईंट ५१४० हा पाकिस्तान च्या ताब्यातून परत घेण्याचे आदेश मिळाले.हे विक्रम चे युद्धातली पहिली मुख्य लढाई होती.
(11/28)
पाकिस्तानी सैन्याने कडे उंचीचा फायदा असला तरी योग्य रणनीतीमुळे 13 J & K Rifles ने हि लढाई आरामात जिंकली आणि पॉईंट ५१४० भारतात सामील केला,ज्याचे नाव पुढे जाऊन 'TIGER POINT ' असे ठेवण्यात आले.
(12/28) Image
विक्रम च्या नेतृत्वाखाली एकाही सैनिकाला जीव गमवावा लागला नाही,या आनंदात विक्रम त्याच्या एका ऑफिसर ला एक वाक्य म्हणाला जे कारगिल युद्धाचे घोषवाक्य झाले,"ये दिल मांगे मोर".
२० जून ला विक्रम ने त्याच्या वडिलांना फोन करून हि वार्ता सांगितली आणि घरात आनंदाचे वातावरण पसरले !
(13/28) Image
थोडे दिवस गेले आणि २९ जून ला विक्रम च्या युनिट ला पुन्हा एकदा बोलावले गेले आणि आता मात्र एका खर्यार्थाने कठोर असलेला पॉईंट ४८७५ काबीज करण्यासाठी. पॉईंट ४८७५ हा समुद्रसपाटी पासून १७००० फूट उंच असून ८० डिग्री चा स्लोप असलेला या युद्धातील सर्वात अवघड पॉईंट मानला जात.
(14/28) Image
विक्रम ला हे सांगितल्यावर तो आनंदी झाला,हे विलक्षण धैर्य पाहून त्याचे सिनिअर ऑफिसर आश्चर्यचकित झाले
जुलै ६ ला विक्रम आणि त्याची युनिट ह्या पॉईंट ला जाण्यासाठी चालू लागली.१६००० फुटावर आधीपासूनच पाकिस्तानी सैन्य तैनात होते,ते जणू वाटच पाहत होते !
(15/28)
कुठून तरी बातमी शत्रूच्या गोटात पोहोचली कि 'भयंकर शेर शाह( विक्रम बात्राला दिलेले code name) इथेच जवळ कुठेतरी आहे त्याच्या युनिट सोबत.पाकिस्तानी सैन्याने रात्रीतून अंधाधुन गोळीबार चालू केला,
(16/28)
ग्रेनेड्स फेकले पण शेर शाह( विक्रम) ने त्याची युनिट बरोबर या सगळ्यापासून वाचवून ठेवली होती.
विक्रम त्याच्या साथीदारासोबत ( कॅप्टन अनुज नैय्यर) हळू हळू करत शत्रूच्या नाकाखाली जाऊन पोहोचला आणि अचानक हल्ला केला
(17/28) Image
सगळे जण पाकिस्तानी सैन्यावर असे काही कोसळले कि पाकिस्तानी बुडाला पाय लावून पळत सुटले,आपले सैनिक युद्धात इतके बेभान झाले होते कि अगदी हाताने सुद्धा शत्रूला त्यानें मृत्युमुखी पोहोचवले.(18/28)
पॉईंट ४८७५ आपण काबीज केलाच ! सगळे जण आनंदात होते,हि लढाई संपल्यात जमा होती,तेवढ्यात कुठून तरी एक ग्रेनेड तिथे पडला आणि विक्रम च्या जुनिअर चा पाय या स्फोटात गेला,हे दृश्य पाहून विक्रम त्याच्या कडे पळत गेला विक्रम त्याच्या दिशेने धावला.
(19/28)
सुभेदार त्याला विनंती करत होता कि 'कप्तान साब आप जाओ,सबको लेके जाओ' पण विक्रम त्याला बघून म्हणाला 'तू बाल बच्चेदार है,पीछे हट"(तुला पोरं बाळ आहेत,मागे सरक),विक्रम ने या सगळ्यात काही ग्रेनेड शत्रूच्या बंकर वर फेकले जवळपास ५ शत्रू क्षणार्धात मारले गेले.
(20/28)
विक्रम त्याच्या जुनिअर ला उचलण्यासाठी म्हणून पळत असताना कुठून तरी एक गोळी आली आणि विक्रम च्या छातीच्या आर पार झाली,विक्रम जखमी झाला असा जखमी कि थोड्यावेळात त्यानें शेवटचा श्वास घेतला,विक्रमला वीरगती प्राप्त झाली !
(21/28)
सूर्योदय होऊ पर्यंत भारताने पॉईंट ४८७५ पूर्णपणे काबीज केला होता परंतु भारत मातेचे दोन सुपुत्र कॅप्टन विक्रम बत्रा आणि कॅप्टन अनुज नैय्यर कायम स्वरूपाचे तिच्या कुशीत विसावले होते.भारतासाठी हा खूप मोठा विजय होता !
(22/28) Image
विक्रम च्या अंतयात्रेच्या वेळेला त्यांची आई एक वाक्य म्हणाली 'आज विक्रम गेला कदाचित म्हणूनच मला देवाने जुळी मुलं दिली,एक गेला असला तरी दुसरा मला कायम त्याची आठवण करून देईल'
(23/28) Image
हे वाक्य वाचताना माझ्या डोळ्यात अश्रूंच्या धारा होत्या आणि हि कथा जेव्हा मी पहिल्यांदा वाचली होती तेव्हा पायातले त्राण नाहीसे झाले होते.१५ ऑगस्ट १९९९ ला विक्रम बत्रा यांच्या अदम्य साहसा साठी त्याना भारतीय आर्मी मधील सर्वोच पदकाने अर्थात परमवीर चक्राने गौरवले गेले !
(24/28) Image
आपल्या सुरक्षेसाठी किती किती सैनिकांनी स्वतःचे प्राण गमावले आहेत ! भारत मातेच्या रक्षणासाठी लाखो सैनिकांनी आहुती दिलेल्या भूमी मध्ये आपण राहतो याचं भान आपल्या प्रत्येकाला असणं अत्यंत गरजेचं आहे.
(25/28)
,जेव्हा जेव्हा या देशाबद्दल काही गैरविचार मनात येतील तेव्हा तेव्हा ह्या कहाण्या आठवा.
या आहुत्या व्यर्थ जाणार नाहीत याची काळजी घ्या,तुम्ही सैन्यात नसला तरी सैन्यासारखे मनोबल आणि देशभक्त पिढी घडवण्यामध्ये कार्यरत राहा,
(26/28)
कॅप्टन विक्रम (शेर शहा) सारख्या अनेक सैनिकांच्या कहाण्या मी कायम घेऊन येत राहीन #अमर_सैनिक या हॅशटॅग अंतर्गत !
एकदा स्वतःच्या मनातल्या मनात म्हणा,
"भारत माता कि जय"
जय हिंद !
(27/28)
(28/28)


Image
Image
Image
Image
Link to Facebook Post :

m.facebook.com/story.php?stor…

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Malhar Pandey

Malhar Pandey Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @malhar_pandey

Mar 31, 2023
बरोबर 100 वर्षांपूर्वी, काल छत्रपती संभाजी नगर, वडोदरा आणि इतर काही ठिकाणी हिंदू सणाच्या दिवशी दंगली घडवल्या गेल्या तश्याच दंगली घडवल्या गेल्या होत्या. नागपुर दंगल 1923 म्हणून इतिहासामध्ये हा प्रसंगाची नोंद आहे.
(1/7)
हिंदू सण मोठ्याने साजरे करायचे आणि त्या निमित्ताने भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा उभा करायचा असा एक मानस त्या काळातील नेत्यांचा होता, हे आपण लोकमान्य टिळक व इतर नेत्यांच्या चरित्रातून वाचतोच. 1923 मध्ये, गणेशोत्सवाच्या वेळेला, नागपूर मधील मुसलमानांनी तत्कालीन ब्रिटिश कलेक्टरकडे
हिंदू सणांवर बंदी घालण्यासाठी दबाव टाकला. तो दबाव यशस्वी ठरला. परंतु, 30 सप्टेंबर 1923 रोजी ही बंदी झुगारात, मोठ्या हिंदू नेत्यांनी अर्थात Dr.B.S.Munje, Dr.Hedgewar यांनी हिंदूंना एकत्र येण्याचे आवाहन केले आणि शांतपणे 'मिरवणूक' काढली.
Read 7 tweets
Mar 30, 2023
This is how Propaganda is spread ! There's absolutely zero evidence to any so called facts Stated in the thread below. There's one famous incident in history, which was mentioned by my friend @AjaatShatrruu in one of his extensively thread.
(1/6)
Dr.Ambedkar made this claim in one of his speech that is mentioned in the thread. To this, historian Y.N.Kelkar asked Dr.Ambedkar to provide evidence to what he is claiming. Babasaheb, after a few days mentioned that he has no such 'evidence' !
He stated this as answer in a form of letter to Y.N.Kelkar dated 6 July 1936. It was a much needed gesture by Dr.Babasaheb Ambedkar. Later, after his death, many so called Historians to propagate their Anti-Hindu agenda .
Read 6 tweets
Mar 30, 2023
Post : सह्याद्री, असे शक्तीदाता 🚩🙏

काही दिवसांपूर्वी माझ्या मित्राचा फोन आला ! 'या विकेंड चा काय प्लॅन ?' मी आपलं मोघम उत्तर दिलं, " काही नाही, आपलं असंच, बुलेट काढून कुठेतरी निघायचं' ! त्यावर तो म्हणाला ,"ट्रेकिंग ला जायचं का ?" मी लगेचच हो म्हणालो ! 1/18
मला उंचीची भीती आहे ! खरं तर सह्याद्री वर अलोट प्रेम असणाऱ्या मला, सह्याद्रीची भीती असूच नये, पण तरीही लहानपणी घडलेल्या काही गोष्टींमुळे ती भीती 'या ट्रेक' पर्यंत कायम होती !

ट्रेक ठरला, किल्ला ठरला ! पवन मावळातील, नुकताच शोधलेला 'किल्ला मोरगिरी'. 2/18
मोरगिरी, हा किल्ला आणि त्याचे ऐतिहासिक महत्त्व अजून म्हणावे तितके प्रकाशात आले नाही, त्यामुळे 'गुगल' करून फारशी माहिती मिळाली नाही !

शनिवारी सकाळी 3.30 ला अलार्म वाजला, क्षणाचाही विलंब न करता उठलो, अंघोळीला गेलो, बॅग अवरली, आणि मित्राच्या घराच्या दिशेने निघालो. 3/18
Read 18 tweets
Feb 17, 2023
#Post
१९९९ साली, एन.डी.टी.व्ही ला दिलेल्या मुलाखतीत बाळासाहेब म्हणाले होते, 'ज्या माणसाचा (शरद पवार) वाजपेयी सरकारच्या पाडण्यात हात आहे, त्या माणसासोबत मी (शिवसेना) जाणार नाही'' !
(1/12)
आणि त्यांनी त्या वेळेला 'स्काउंड्रल' (बदमाश, बेभरवशी) असा शब्द प्रयोग राष्ट्रवादी काँग्रेस च्या सर्वेसर्वांबद्दल केला होता. बाळासाहेबांनी, त्यांच्या हयातीत तरी कधी, शरद पवारांसोबत, राजकीय हातमिळवणी केली नाही कारण त्यांना ज्ञात होतं कि जिथे
यांचा हात लागतो तिथे ज्याच्या सोबत हात मिळवला जातो त्याचा ऱ्हास होतो !
भाजपा आणि शिवसेने मध्ये सुरुवातीपासून वाद होते का ? ह्या प्रश्नच उत्तर निश्चितच 'हो' असं आहे, आणि यात काहीही वावगं नाही, कारण दोन राजकीय पक्ष म्हणलं कि मतभेद हे होणारच !
Read 12 tweets
Jan 24, 2023
#Thread :
स्वातंत्र्यानंतर जिथे म्हणून आपल्या नावाचा झेंडा गाडता येईल तिथे तिथे गांधी परिवाराने संधी सोडली नाही. गोष्ट १९८४ सालची आहे. इंदिरा गांधी, अंदमान निकोबार बेटांच्या प्रवासावर यायला सज्ज होत्या. १९ फेब्रुवारी ला त्या तिथे पोहोचल्या. 1/11
गांधी पॉईंट’ ला सकाळपासून ताटकळत उभे असलेल्या अंदमानातील रहिवासीयांसमोर त्यांचे भाषण झाले आणि त्या पिगमेलियन पॉईंट साठी रवाना झाल्या. 2/11
काँग्रेस च्या स्थानिक लोकसभा उमेदवाराच्या संकल्पनेतून, या जागेचे नाव पिगमेलियन पॉईंट पासून इंदिरा पॉईंट, इंदिरा गांधींच्या साठी, इंदिरा गांधींच्या समोर ठेवण्यात येणार होते व याच साठी इंदिरा गांधी तिथे गेल्या होत्या. 3/11
Read 12 tweets
Jan 23, 2023
नमस्कार !
येत्या प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन केल्यानंतर काय करताय ? इतिहास हा विषय म्हटलं की प्रत्येकाच्या मनात कुतूहल निर्माण होतं, इतिहासातली पात्र डोळ्यांच्या समोर उभी राहतात, काही प्रसंग आपली छाती फुलवतात तर काही प्रसंग डोळ्यात आसवे आणतात,
या सगळ्या गोष्टी आपल्या समोर मांडण्याचे कार्य जो करतो त्याला आपण इतिहासकार असे म्हणतो...

पण, इतिहास म्हणजे नेमकं काय ? तो समजून घेणं का गरजेचं आहे ? इतिहास लिहताना, वाचताना काय दक्षता घ्यावी, हे असे सगळे प्रश्न आपल्या मनात वेळोवेळी पडत असतात !
अश्याच सगळ्या गोष्टींची उत्तरं देण्यासाठी, झुंज संस्थेने "सुप्रसिद्ध लेखक व इतिहासकार श्री. Kaustubh Kasture" यांचे "इतिहास समजून घेताना" हे व्याख्यान आयोजित केले आहे.
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(