My Authors
Read all threads
इतिहासाची मढी उकरून त्यावर मतांच्या पोळ्या भाजायला गेलात तर फक्त तुमच्या मतलबाचे आणि सोयीचे सांगाडे बाहेर पडणार नाहीत, तर तुमचेच वाभाडे निघतील...
खिलजीच्या सैन्याला फितूर होऊन देवगिरीचा अभेद्य किल्ला शत्रूच्या हातात अलगद देणारा आणि देवगिरीचं साम्राज्य पराभूत व्हायला कोण कारणीभूत
होत ? #हेमाद्री_पंडित ? सांगा कसा पुसणार हा इतिहास ?
राणा प्रतापाचा सेनापती होता #हकीमखान सुरी नावाचा पश्तून पठाण आणि अकबराचा सेनापती होता #राजा_मानसिंग. अकबर जिंकला तर मानसिंग पण जिंकतो आणि राणा प्रताप जिंकला तर हकीमखान पण जिंकतो. सांगा कसा पुसणार इतिहास ?
इथिओपियाचा हबशी
गुलाम स्वकर्तृत्वावर उच्चपदाला पोहोचला त्या #मलिक_अंबरने खापरी नळाने खडकीला पाणी पुरवठा योजना केली, अहमदनगर शहराला पाणीपुरवठा योजना केली. याच मलिकने #जमीन_मोजणी आणि #महसूल_आकारणीची यंत्रणा उभारली. कसा पुसणार हा इतिहास ?
अहमदनगरजवळचा शाह शरीफ दर्गा माहितेय का ? #मालोजीराजे
भोसलेंनी नवस बोलला आणि झालेल्या दोन मुलांची नाव ठेवली #शहाजी आणि #शरीफजी, या दर्ग्याला आजही दिवाबत्ती भोसले कुटुंब करत ? कसा पुसणार इतिहास ?
शहाजी राजांना #फर्जंद म्हणजे राजपुत्र किताब देणारा, #सरस्वतीची प्रार्थना करणारा #आदिलशहा, शिवाजी महाराजांना भाऊ म्हणून मैत्री जपणारा
गोवळकोंडा किल्ल्याचा कुतुबशहा, सांगा कसा पुसणार इतिहास ?
शहाजी राजांना अटक करणारा #मुधोळकर बाजी घोरपडे ?
पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवून गाव बेचिराख करून वेशीत पहार खुपसून त्यावर चप्पल बांधणारा *मुरार जगदेव ?*
शिवाजी राजांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पराभव करणारा #मिर्झा_राजे ?
सांगा कसा पुसणार इतिहास ?
शिवाजी महाराजांचा वकील काझी हैदर आणि अफजलखानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी ? सांगा कसा पुसणार हा इतिहास ?
शृंगेरी च्या मठाला लुटून नुकसान करणारं पेशव्याचं मराठी सैन्य आणि त्या मठाला दुरुस्ती करायला निधी देणारा टिपू सुलतान सांगा कसा पुसणार
हा इतिहास ?
पानिपतावर झालेल्या तीन लढाया, तिन्ही लढायांमध्ये स्थानिक आणि परकीय असा संघर्ष झाला. शेवटच्या लढाईत मराठी सैन्याच्या बाजूने होता इब्राहीमखान गारदी, सांगा कसा पुसणार इतिहास ?
#सरहद्द_गांधी किताब अभिमानाने छातीवर बाळगणारा, शेवटपर्यंत फाळणीला विरोध करणारा म्हातारा
#खान_अब्दुल_गफार_खान
ब्रिटीश सत्तेशी झुंज घेणारे #अशफाकउल्लाखान आणि #कुर्बानहुसेन
गांधींचा जीव वाचवणारा #बतकमिया_अन्सारी
आझाद हिंद फौजेचा #शाहनवाज_खान (शाहरुख खानचा आजोबा) फाळणीच्या दस्तऐवजांवर स्वाक्षरी न करता शेवट पर्यंत विरोध करणारे #मौलाना_आझाद
पाकिस्तान
विरुद्धच्या युध्दात परमवीरचक्र मिळवणारा #अब्दुल_हमीद
सांगा कसा पुसणार हा इतिहास ?
इतिहासाची मढी उकरताना आपल्या सोयीचे सापळे कधीही निघत नाहीत हेच त्रिवार सत्य. कापड विणल जात उभ्या आडव्या धाग्यांनी, एकाच आडव्या धाग्यांनी किंवा एकाच उभ्या धाग्यांनी नाही.
भारत हा या उभ्या
आडव्या धाग्यांनी घट्ट विणलेले महावस्त्र आहे. त्याच्या चिंध्या करायला निघालेले कोण आहेत... #स्वातंत्र्यलढ्यात_शून्य_योगदान देणारे आणि स्वातंत्र्य मिळाल्यापासून #७०_वर्षात_धार्मिक_दंगली करून लाखभर नागरिक मारणारे, तेवढीच कुटुंबं उध्वस्त करून देशाच्या लाख कोटीच्या मालमत्तेचे
नुकसान करणारे देशाचे खरे शत्रू यात आपला आपणच अर्थबोध घ्यायचा.
- व्हाट्सएप विद्यापीठ
@Manoj2211Khare @Girish_javeer @SahilVastad @RajeshGawai12 @niyati613 @AtulAmrutJ @dreamzunite @Nilesh_P_Z @AAP_speaks @Kranti_evince @sub_naikade @AshwiniTatte @Surajmadye13 @Digvijay_004
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with Moin Ali Mujawar

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!