कारण रणांगणात उतरल्यावर युद्ध करणार नाही म्हणून चालत नसतं. शत्रू जी शस्त्रास्त्र वापरत असेल त्याच प्रकारची - किंबहुना त्याहून सॅव्हेज आयुधं वापरावीच लागतात. हे जिंकण्यासाठी वगैरेचं प्रिपरेशन नाही. कॉमन सेन्स आहे हा. +
महाराष्ट्र भाजपचं याच्या अगदी उलट आहे.
शत्रुपक्ष जितका अधिक चिखलात लोळतो, तितकी अधिक यांना स्वतःच दुधाने अंघोळ करण्याची खुमखुमी येते. +
१० महिन्यांपूर्वी हेच पत्रकार, हाच राजकीय पक्ष एका क्रूर, खुनशी, रक्तपिपासू पक्षाबरोबर सत्तेत होता. रोजच्या रोज हीन वक्तव्यं, टिपण्यांचा रतीब घातला जात होता. पण या फॅसिस्ट, हुकूमशाहीवादी पक्षाने उफ्फ केलं नाही. "मी सामना वाचत नाही" +
अर्थात, राजाने असल्या फालतू प्रकारांवर स्थितप्रज्ञ रहाणंच शोभतं. त्याने या घाणीत स्वतःचे हात बुडवू नयेत. पण राजाकडे सेनापतींची फळी असते ना? त्यांनापण युद्धात उतरवू नये? +
गाढवही गेलं, ब्रह्मचर्यही गेलं.
ही अशी अवस्था २ प्रमुख कारणांमुळे आहे. +
तुमच्या नेतृत्वावर, विचारसरणीवर, दैवतांवर अश्लाघ्य टीका झाली म्हणून ऑन ग्राऊंड सैन्य दातओठ खात लढतं - पण तुमचे सेनापती मात्र एकदाही तलवार काढून आरोळी ठोकत नाहीत. पलीकडे एकजण काही बोलला तर सर्वबाजूंनी आक्रमणं केली जातात. +
मोदी, फडणवीसांवर घाणेरडी वक्तव्यं केल्यावर किती जणांना माफी मागण्याची वेळ आली? किती भाजप नेत्यांनी "तुम्हाला किंमत चुकवावी लागेल" अशी भाषा बोलून दाखवण्याची हिम्मत दाखवली? आज सगळीकडे चक्क हिंसक प्रतिक्रियेच्या धमक्या दिल्या जात आहेत - +
लढतीलच - तुमची स्वतःची लढायची इच्छा हवी. +
एम्पायर कसं उभं रहाणार? कसं टिकणार? कसं वाढणार?!
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com
@threadreaderapp please unroll.