अश्या प्रेमाने तुम्ही आपणहोऊन हिंदूंना अधिक दुखावताय, चिथावताय, कट्टर करताय - इतकी साधी अक्कल नाहीये का तुम्हाला?
स्वतःला पुरोगामी, लिबरल म्हणवणारे आपल्या कर्माने हिंदू मन अधिकाधिक जहाल कसं करत नेतात याचं लेटेस्ट प्रात्यक्षिक म्हणजे +
तुम्ही असे उपद्व्याप केल्यावर त्यावर प्रतिक्रिया येणारच. ती तशी आलीच.
विविध प्रत्युत्तरं लिहिली गेली, प्रसिद्ध झाली. पण कुंभोजकर अँड कंपनी बधेल तर ती पुरोगामी कशी ठरेल? त्यांनी आणखी री ओढायला सुरुवात केली. +
ही यांची "मतभेद स्वातंत्र्याची" पद्धत! +
या लोकांना सतत औरंगजेब उदात्तीकरणाची एवढी हौस का असावी बरं?
"औरंगजेबाच्या निमित्ताने मुस्लिम द्वेष केला जाऊ नये" - हे पोपटपंची कारण दिलं जातं. +
एक चित्र छापलं म्हणून लोकमत कार्यालयावर हल्ला होतो. कुठल्याश्या देशात अप्रिय घटना घडली म्हणून आमच्या आझाद मैदानावर धिंगाणा होतो. फेसबुकवर मिम टाकली म्हणून २०० जणांचा समूह एका पोराला ठेचायला जातो...त्याला पोलीस आपल्या ताब्यात घेतात म्हणून +
अहो आश्रित-निर्वासित म्हणून आलेल्या लोकांच्या छावण्यांमध्ये हिंदू स्त्रियांवर काय वेळ येते याच्या बातम्या तुम्हाला दिसत नसतील - आम्हाला दिसतात. +
बरं, तुम्हाला फार काळजी आहे ना मुस्लिमांची?
मग त्यांना शहाणं करा जरा. कट्टर इस्लामी मूलतत्वांपासून त्यांना दूर कसं करता येईल हे पहा. +
एकीकडे मी जात-धर्म मानत नाही, मानवता हाच धर्म म्हणता. तिकडे सातासमुद्रापार कृष्णवर्णीयांवर होणाऱ्या अत्याचाराशी स्वतः "रिलेट" होऊ शकता. मग +
अशी तुमची साधनशुचितेची वल्कलं गळून पडून, तुमचं खरं फॅसिस्ट, बीभत्स रूप उघडं पडतं. +
तुम्ही औरंगजेबाचं खरं रूप मान्य केलं नाही - की मग आमच्यासमोर ते खोटं खोडण्याची जबाबदारी उभी रहाते. तुम्ही इस्लाम प्रश्न साफ नाकारत राहिलात म्हणून आम्हाला त्याचा वारंवार उल्लेख करत रहावा लागतो. +
मध्ययुगीन औरंगजेबाचं खरं धर्मांध रूप समोर आल्याने आज समाजात फूट का पडावी? असा विकृत माणूस, तो विकृत होता हे माहित असूनही जर कुणाला आवडत असेल तर त्यांचं प्रबोधन आवश्यक आहे +
एरवी तर तुम्ही हजारो वर्षांपूर्वी ब्राह्मणांनी काय केलं या कथा रंगवून रंगवून आज ब्राह्मणद्वेष पोसताय. तो जातीय अत्याचारांचा इतिहास - आणि आजही देशात कुठे घडत असणाऱ्या घटना - या सर्वांचा निषेध करणारे, त्या विरुद्ध लढणारे - +
हाच निर्लज्ज विरोधाभास हिंदूंना चिथावतो - हे कळत नाही का तुम्हाला?
इतकं सगळं कळत, दिसत असूनही तुम्हाला औरंगजेब प्रेम कायम आहे.
इथेच तुमचे हेतू उघड होतात.
ते काय आहेत हे आता लपून राहिलेलं नाही. +
तुमच्याच कर्माने तुम्ही संपत चालले आहात.
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com
@threadreaderapp please unroll.