हिंदुत्ववादी तर उघड, स्पष्ट "हिंदु"त्ववादी असतात. तुम्ही त्यांना थेट मुस्लिम द्वेष्टे मुकर्रर करून टाकता. ठीक आहे. परंतु - +
मग इतर समूहांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या बाबतीत प्रचंड बोटचेपे का असतात? +
उमरीकर सर म्हणतात :
===
+
आपल्या संबंधांबाबत त्यानं घरी स्पष्ट कल्पना दिली. त्याचा आयुष्याचा जोडीदार कोण तेही सांगितले. +
"आपल्या घरच्यांनी आपल्या जोडीदाराच्या घरच्यांनाही धमकावणे सुरू केले असून हे बंद करण्यासाठी मला मदत करा. मला घरून काहीच नको. पैसे नको, संपत्तीत वाटा नको. फक्त माझ्या व माझ्या जोडीदाराच्या आयुष्यात येवू नका." +
मी आपलं इतरवेळी आम्ही जे धोरण असते त्या प्रमाणे "घरच्यांशी बोलू, संवाद साधू, स्थानिक नेते पोलिसांच्या कानावर घालू" आदी सांगत होता. +
"कुछ नही होनेवाला सर. मेरी कौम मुझे जिंदा नही छोडेगी. बस मुझे बाहर जानेका रास्ता निकाल दो. और मेरे दोस्त के घरवालों तक इनकी तकलीफ ना पहूंचे..." +
काय बोलणार? त्याची रहायची तात्पुरती सोय आम्ही केली आहे. दोन दिवसांत परवानगी मिळवून त्याची रवानगी मोठ्या महानगरात करतो आहोत. +
===
+
+
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com