My Authors
Read all threads
मागणी चुकतेय!

आज देशातील रेशनिंग पद्धतीवर थोडं परखड बोलणार आहे. माझे काही प्रश्न देखील आहेत. त्यामुळे थ्रेडवर व्यक्त होण्याआधी त्यांची उत्तरे जरूर शोधावी.

आजवर आपण अनेक मागण्या केल्यात. आरक्षणापासून ते संरक्षणापर्यंत केलेल्या मागण्यांची यादी काढली तर ती फारच लांबलचक होईल. १/१२
त्यातील किती पूर्ण झाल्या किती अपूर्ण राहिल्या तो मुद्दा सध्या बाजूला ठेवू. पण बऱ्याचदा आपण चुकीची मागणी करत राहिलो हे आपल्याला मान्य करावेच लागेल. याच चुकीच्या मागणीच्या शेगडीवर अनेक राजकारणी आपल्या राजकीय पोळ्या अविरत शेकत राहिले. २/१२
‘रेशिंग’ या शब्दाचा भारतीय अर्थ आहे, ‘कमी किमतीत (गरिबांसाठी) सरकार कडून वस्तु, खाद्य पदार्थ मिळणे.’ अमेरिकन शब्दकोशात याचा अर्थ काहीसा असा आहे, ”a limited amount (of something) that one person is allowed to have, especially when there is not much of it available.” ३/१२
खरतर ही रेशनिंग पद्धत युद्धकाळात जावांना जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून निर्माण करण्यात आली. पण आपण काय केले? आपल्याकडे रेशिंग हा शब्द अन्नधान्य पलीकडे जाऊ शकालच नाही. याला जबाबदर आपण की!

मंदिराबाहेर बसणाऱ्या भिकाऱ्याला आपण बऱ्याचदा हिणवतो. ४/१२
‘हात-पाय चांगले असताना कष्ट करायचे सोडून भिक कशाला मागतोय?’ अशा शब्दात जोडीदाराला भिकाऱ्याची कष्ट न करण्याची बाजू उलगडून देतो. मग रेशनिंग साठी रांगेत उभे राहताना आपली तीच बाजू कुठे जाते? रेशिनिंग म्हणजे एक प्रकारे सरकारने जनतेला दिलेली भिकच म्हणावी लागेल. ५/१२
कारण इथे 'आपल्याला काय हवंय', यापेक्षा 'सरकार काय देईल' यावर अधिक भर दिला जातो. जनतेचे पोट भरणे हे सरकारचे काम आहे, हे मान्य. पण याचा अर्थ सरकारसमोर भिक मागणे असा होतो का?

देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा काही काळ ही रेशनिंग पद्धत ठीक होती. ६/१२
पण स्वातंत्र मिळून ७० वर्षे लोटली तरी आपण आत्मनिर्भर होऊ नये? का अजूनही कोट्यावधी जनता यावर अवलंबून आहे? यामागील कारण चुकीची मागणी!

याच रेशनिंग बद्दल थोडी अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. ७/१२
अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी या प्रगत देशात अशी (सध्या जी भारतात आहे) पद्धत तिथे महायुद्ध वगळता निर्माण झाली, असे वाचनात आले नाही. यात आशिया खंडातील देखील देश आहेत. मग आपण नक्की कुठे कमी पडलो? आपल्याला तर ५ ट्रिलियन करायची आहे अर्थव्यवस्था. ८/१२
रविवारी भक्तांच्या जागतिक नेतृत्वाने ८० कोटी जनतेसाठी पुढील ३ महिने रेशन पुरवण्याचे आश्वासन दिले. याचा अर्थ ८० कोटी जनतेच्या खिशात पोट भरता येईल एवढी देखील रक्कम नाही? बरं, पण मग त्या तीन महिन्यानंतर काय? असा प्रश्न एकाला तरी पडला का? ९/१२
नोकऱ्या जाताहेत, बेरोजागरी वाढते आहे, ७८% लघु आणि मध्यम उद्योजक नेस्तनाबूत झालेत याच्यासाठी काय करणार? विकासाला भविष्याचे चित्र आवडते. ते आपण रंगवू शकलो नाही तर तो देशात येणारच नाही. या सगळ्यावर उपाय एकच योग्य मागणी करणे.... १०/१२
‘वर्तमानात रेशन ही परिस्थीची गरज आहे’, असे अनेकांना वाटत असेल. पण खरंच त्याची काही गरज आहे का? जर याचे उत्तर ‘होय’ असेल, तर ती ‘कालची’ही गरजच होती आणि ‘उद्याची’ देखील गरज राहील. जर 'आजची' गरज काही असेल तर ती रोजगार आहे. प्रत्येकाच्या हातात हक्काचा पैसा ही आहे, असे मला वाटते.११/१२
हा विषय इथेच संपत नाहीये. थोडं बाकी आहे..... १२/१२
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with कार्तिक Jadhav

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!