आम्हाला मोदी आवडत नाही. त्याने काही केलेलं, बोललेलं आवडत नाही!
आवडत नाही म्हणून आम्ही ट्रोल करू पाहतो. ट्रोल करायला गेलं की मोदी भक्त आमचीच वाजवतात. अगदी ताला-सुरात वाजवतात. मग आमची अजून ठसठसते
मग आम्हाला मोदी अजूनच आवडत नाही!
मग आम्हाला मोदी अजूनच आवडत नाही!
मग आम्हाला मोदी अजूनच आवडत नाही!
मग आम्हाला मोदी अजूनच आवडत नाही!!
मोदी आम्हाला फॉरेनला नेत नाही. फुकटात स्कॉच पाजत नाही. मनमोहन न्यायचा. आम्ही बिझनेस क्लास मिस करतो. दलाली मिस करतो.
मग आम्हाला मोदी अजूनच आवडत नाही!
मोदी हिंदू नॅशनॅलिस्ट म्हणवतो. तुष्टीकरण करत नाही. मुस्लिम टोपी घालत नाही. इफ्तारी झोडत नाही. तरीही त्याला निवडून यायला अडचण येत नाही.
मग आम्हाला मोदी अजूनच आवडत
मग आम्हाला मोदी अजूनच आवडत नाही!
मग आम्हाला मोदी अजूनच आवडत नाही!
आम्हाला संविधान आवडतं. आम्हाला संविधानाचे दाखले द्यायला आवडतात. पण मोदी संवैधानिक पदावर आहे. लोकशाही मार्गाने निवडून आला आहे.
मग आम्हाला मोदी अजूनच आवडत नाही!
- सूरज नरेंद्र उदगीरकर