My Authors
Read all threads
फ्रेशर्स मुलांनी नौकरी शोधताना नौकरीची आवश्यकता,मिळणारी संधी,मार्केटची परिस्थिती,स्वतःचे कौशल्य ह्याचा विचार करून पगाराच्या अपेक्षा ठेवायला हव्यात. केवळ अवास्तव पॅकेजेसचे हट्ट पकडून चांगल्या संधी सोडून देण्याने केवळ तुमचा मौल्यवान वेळ वाया जातो. #मराठीनोकरी @iamShantanu_D
फ्रेशर्स मुलांकडे इंडस्ट्रीचा अनुभव नसल्याने त्यांना ही जाणीव नसते की हे क्षेत्र,ह्या कंपन्या काम कसे करतात.त्यांना त्याबद्दल योग्य मार्गदर्शन मिळालेलं नसतं आणि त्यातून ह्यांच्या मनात त्या त्या क्षेत्राकडून चुकीच्या अपेक्षा निर्माण होतात.
सर्वांना असं वाटतं की आयटी म्हणजे बक्कळ पैसे! वस्तुतः तसे नसते,शंभरातल्या केवळ २-३ जणांना एक फ्रेशर म्हणून भरपूर पॅकेज असणाऱ्या नौकऱ्या मिळतात,पण बाकीच्या सर्वांची सुरुवात एका बेसलाईन पॅकेजनेच होते.बहुतांश कंपन्या ह्या बेसलाईनच्या आसपास पॅकेज देतात,जे सर्वच ठिकाणी समानच असते
त्यामुळे ह्या कंपनीत पॅकेज खूप कमी आहे म्हणून तुम्ही दुसऱ्या मोठ्या पॅकेजची वाट पाहण्यात वेळ घालवला तर वेळही जाणार आणि नंतर येणाऱ्या कंपनी देखील त्याच बेसलाईन किंवा थोडेफार अधिक पॅकेज देतील.
पण ह्या मधल्या काळात गेलेला वेळ तुमच्या प्रोफाईलवर स्पष्ट दिसतो.
त्यातही पॅकेजची अपेक्षा आपण 'फ्रेशर' आहोत हे लक्षात घेऊनच केली पाहिजे.अनेक फ्रेशर्स च्या पॅकेजेसच्या अपेक्षा ह्या काही वर्षांचे अनुभवी लोकांना मिळणाऱ्या पगारांपेक्षाही जास्त असतात.
जेव्हा कंपन्या फ्रेशर्सना नौकरी देतात,त्यांच्यासाठी तो एक प्रकारचा जुगार असतो. फ्रेशर्सकडे पूर्वीचा काहीच अनुभव नसतो,ईमेल लिहिण्यापासून सर्व शिकवावे लागते. सुरुवातीचे काही महिने फ्रेशर्सना जबाबदारीचं असं काही काम देता येत नाही,मात्र त्यांना पगार तर द्यावाच लागतो.
फ्रेशर्सचे केवळ ज्ञान चांगले आहे म्हणजे तो उत्तम कर्मचारी असेलच असे नसते,त्यांना तांत्रिक,व्यावहारिक गोष्टी शिकवण्यात वेळ आणि पैसे कंपनी घालवते.त्यावर फ्रेशर्स त्याच कंपनी सोबत किती काळ काम करतील ह्याची शाश्वती नसते.
म्हणून असे जुगार खेळताना कुठलीही कंपनी कमीत कमी पैसे गुंतवायचे बघते.एक फ्रेशर व्यक्तीवर कुठलीही कंपनी अवास्तव खर्च करणार नाही.त्यामुळे मार्केटची स्थिती,कंपनीची गरज वगैरे सर्व काही बघून एका बेसलाईन नुसार पॅकेज दिले जातात.हे पॅकेजेस कर्मचाऱ्यांना पुरतील असेच असतात.
दुसरे असे की आपण फ्रेशर असताना आपली कौशल्ये विकसित करणे जास्त महत्वाचे असते.कंपनीत काम केल्याच्या अनुभवातून शिकता येणारी कौशल्ये खूप महत्त्वाची असतात. पुढचं करिअर सगळं ह्या कंपनीत काम केलेल्या अनुभवावर अवलंबून असते.
आज मी काही वर्षे अनुभवी आहे, माझं पुढचं करिअर हे पूर्णतः माझ्या आत्ताच्या अनुभवावर अवलंबून आहे. मी इंजिनियरिंग मध्ये किती उत्तम गुण मिळवले हे केवळ फ्रेशर असे पर्यंतच उपयोगी असतात.तिथून पुढे ते कुणीही विचारणार नाहीत. त्यामुळे कामाचा पहिला अनुभव घेणं फार महत्त्वाचं असतं.
आणि कामाचा पहिला अनुभव घेण्यात आपण विनाकारण पैश्यांची आडकाठी आणत राहिलो तर तो अनुभव घेण्यात उशीर होत जाईल. आणि जितका ह्यात उशीर होईल तितका पुढच्या करिअरवर परिणाम होईल.
शिक्षण संपल्या नंतर आपण किती महिने/वर्ष रिकामे होतो ह्यावरून तुमची गुणवत्ता कमी ठरवण्याचा प्रघात आयटी मध्येतरी आहे. म्हणून कमीत कमी वेळ दवडून नौकरी ला लागणे कधीही चांगले.पैसे कमी मिळाले तरी कागदावर अनुभव असल्याचे दिसून येतं आणि शिकायला मिळतं त्याचा भविष्यात फायदाच होणार आहे.
ह्याच अनुभवाच्या जोरावर तुम्ही पुढे चालून भरपूर पॅकेज मिळवू शकता.कारण तुमच्याकडे अनुभव आणि ज्ञान भरपूर जमलेलं असतं. आशा लोकांना कंपनी नक्कीच भरपूर पैसे देऊ इच्छित असते, कारण जबाबदाऱ्या सांभाळायला तुम्ही सक्षम झालेले असता. त्यावेळी मात्र तुम्ही तडजोड न करता पैसे मागायला हवेत.
मी वरती सर्वत्र फ्रेशर्सच्या पॅकेजबद्दल असणाऱ्या अवास्तव अपेक्षांबद्दल लिहिलं आहे.पण ह्या 'अवास्तव पॅकेजेस' ह्या शब्दाची व्याख्या मी स्पष्ट केलेली नाही.अवास्तव अपेक्षा म्हणजे अशा ज्या जॉब मार्केटला सुसंगत नाहीत.
आपले शिक्षण काय,स्किल काय,करिअर डोमेन कुठलं,डोमेनला किती मनुष्यबळाची गरज आहे,कंपनी कुठली,कंपनीला तुमची गरज किती,सध्या मार्केटचे आर्थिक गणित कसे आहे अशा अनेक गोष्टींवर आपले करिअर अवलंबून आहे. आणि ह्याच सर्व गोष्टींवर कंपनी किती पॅकेजेस देऊ शकते,आणि देऊ इच्छिते ते ठरतं.
थोड्याफार फरकाने, एखादा लाखभर रुपये मागे पुढे करून सर्वच कंपन्या स्टारटिंग पॅकेज देतात. त्यालाच मी बेसलाईन असा शब्द वापरला. आता ह्या बेसलाईन पेक्षा दीड दोन पटीने जास्त पॅकेजेसची मागणी आपण करत असाल तर त्याला मी 'अवास्तव' असा शब्द वापरला आहे.
तर आपली पॅकेजेसची अपेक्षा अवास्तव नसून रास्त आहे किंवा नाही हे कसे ओळखायचे? तर ह्यासाठी तुम्ही ज्या करिअर डोमेन मध्ये जात आहेत, त्यात आधीच काम करत असलेल्या व्यक्तींना विचारा.अशा व्यक्ती वेगवेगळ्या कंपन्यांत असतील तर तुम्हाला अधिक उपयुक्त होईल.
त्यात आपल्याच डोमेनची व्यक्ती जास्त योग्य उत्तर देऊ शकते, कारण ती व्यक्ती त्याच परिस्थितीतून गेलेली असते. आणि अशाच व्यक्तींना सध्याच्या मार्केटची स्थिती,कंपन्यांकडे किती प्रोजेक्ट्स आहेत ह्या सर्वांची माहिती घ्या.
अशी माहिती घेऊन त्याविरुद्ध आपण किती समर्पक आहोत ह्याचा एक अंदाज लावा. लक्षात घ्या कंपन्यांना तुमची गरज किती आहे हे खूप महत्वाचे आहे. कंपनीला गरज असताना तुमच्या स्किल लेव्हल ची इतर माणसे किती उपलब्ध आहेत हे देखील महत्वाचे आहे.
अर्थात ह्याला एक ना अनेक कारक आहेत.सध्या कोव्हीड परिस्थिती पाहता,मार्केट बऱ्यापैकी डाउन आहे.आणि त्याचा परिणाम नौकऱ्यांवर आणि पॅकेजेसवर होणार हे स्पष्ट आहे.
फ्रेशर्स मुलांच्या कंपनी कडून मिळणाऱ्या पॅकेज बद्दल अपेक्षांवर लिहिण्याचा एक छोटा प्रयत्न मी केला आहे. अर्थात ह्यात अनेक गोष्टींचा उल्लेख केला नाही त्यामुळे ही सर्व माहिती केवळ एक अंदाज देऊ शकेल, ही परिपूर्ण माहिती नाही.कदाचित एकाच बाजूला झुकलेली वाटते.
हे केवळ एका निरीक्षणावरून मी लिहिलेलं आहे. फ्रेशर्स मुलांना ह्यातून थोडे मार्गदर्शन होईल अशी अपेक्षा करतो. ह्याचे इतर अनेक पैलू आहेत जे ह्यात समाविष्ट केलेले नाहीत, त्यामुळे ह्यात त्रुटी असण्याची शक्यता आहे हे लक्षात घ्यावे.
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with आशुतोष

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!