मात्र हा आनंद पाच वर्षेच टिकला.
राज्यकारभार हाती घेताच तिने पंचमडीजवळच्या चौरागड येथे राजधानी हलवली. चौरागड किल्ल्यावर युद्धाला आवश्यक ते सर्व बदल केले. राज्यातील २३ हजार गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचे काम हाती घेऊन यशस्वीपणे पूर्ण केले. जबलपूरजवळ रानीताल हा तलाव बांधला.