रुद्रम्मा अतिशय कुशल योद्धा आणि तलवारबाजीमधे निपुण होती. हत्ती आणि घोडेस्वारीत तरबेज होती. तिच्या सैन्यात अडीच हजार गजदळ होतं. या युद्धाच्या काळात तिने प्रशासनात अनेक बदल केले. मंत्रीमंडळात अनेक पदे वंशपरंपरागत होती
वरंगळ या राजधानीप्रमाणेच सगळ्या राज्याच्या सुरक्षेसाठी आणि पाण्याच्या सोयीसाठी तिने भरपूर प्रयत्न केले.
इटलीचा व्यापारी मार्कोपोलो तिच्या राज्यात आला होता. सर्वत्र फिरताना त्याने जे काही बघितले ते लिहून ठेवले आहे.
पित्याच्या आज्ञेनुसार, चोख राज्य करणाऱ्या रुद्रम्माचा कपटाने अंत झाला.