My Authors
Read all threads
काहीतरी करावं अशी खुमखुमी असलेल्या वयात हातात पडण्यासाठी सर्वात योग्य पुस्तक म्हणजे अनिल अवचट यांचे "कार्यरत". सामाजिक जाणिवेसाठी ज्ञात असलेले अवचटसर या पुस्तकातून आपल्याला अविरत कार्यरत अशा सात दिग्गज व्यक्तिमत्त्वांची ओळख करून देतात.

@LetsReadIndia
#LetsReadIndia
#मराठी
१.मुंबई कायमची सोडून पनवेलजवळच्या तारा गावात राहून रायगड परिसरातल्या कातकरी जनतेसाठी पाडोपाडी मैलोनमैल अर्धपोटी चालण्याऱ्या सुरेखाताई दळवी यांची गोष्ट विलक्षण आहे. लाकडी कोळसा उद्योगात कातकरी लोकांना अक्षरश: पिळणाऱ्या आणि डोंगरच्या डोंगर उजाड करणाऱ्या मालकांविरुद्ध दिलेला लढा,
बेसुमार आणि पर्यटनवादी शहरीकरणामुळे लगतच्या आदिवासी जीवनावर येणाऱ्या दबावाविरुद्ध दिलेला लढा, सरकारी
-सावकारी संगनमताने हडपलेल्या "दळीच्या" जमिनी पुन्हा त्या कसणाऱ्या कातकरी जनतेच्या नावावर करण्यासाठी लढा लढणाऱ्या लढाऊ सुरेखाताईंची गाथा वाचनीय.
२.प्रसिद्ध वनज्योती चूल बनवणारे IFS अधिकारी काका चव्हाण यांनी नोकरीत राहून प्रसंगी वरिष्ठांचा रोष पत्करून वनसंगोपनाचं केलेलं प्रचंड काम थक्क करणारं आहे. गवत संवर्धन, चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, लळिंग कुरण, सामाजिक वनीकरण अशा संकल्पना राबवणाऱ्या काकांचा प्रवास सर्वांना प्रेरक आहे.
३.महाडजवळ बिरवाडीला प्राथमिक आरोग्य केंद्रात लॅन्सेटमध्ये संशोधन प्रसिद्ध झालेला डॉक्टर आहे याची उत्सुकता लेखकाला वाटली आणि त्यातून आपल्यासमोर येतात कोकणातील विंचवांच्या दंशाने होणाऱ्या मृत्यूंवर इलाज शोधणारे डॉ. हिम्मतराव बावस्कर. विंचू चावला की माणूस गेला हा समज त्यांनी बदलला
ग्रेज अनाटॉमीचे पुस्तक तोंडपाठ असणाऱ्या बावस्करांचे विंचूदंशावर उपचारपद्धतीचे अनेक लेख लॅन्सेटमध्ये छापून आल्यावर भारत सोडून अनेक देशोदेशीच्या संशोधकांची त्यांना पत्रे आली. सुरुवातीला ३०-४०% असणारा मृत्युदर त्यांनी ०% वर आणला होता. जागतिक दर्जाच्या संशोधकाची ही गोष्ट वाचनीय आहे.
४.यानंतरचा लेख आहे समाज परिवर्तन समुदायचे संस्थापक एस आर हिरेमठ यांच्या तुंगभद्रा नदीच्या प्रदूषणास कारण बिर्ला केमिकल फॅक्टरीविरुद्ध दिलेल्या प्रदीर्घ कायदेशीर लढाईबाबत. आधी प्रदूषण आणि नंतर निलगिरी लागवडीसाठी ३०००० हेक्टर जमीन बिर्लाच्या घशात घालण्याचा सरकारी प्रयत्न..
पोखरलेल्या व्यवस्थेत कोणीतरी चांगला असतो आणि योग्य मार्ग सापडत जातो यावर विश्वास ठेवत आजही हिरेमठ सर बेकायदा खाणी, खाजगी कंपन्यांना जंगले, पडीक जमिनी कवडीमोलाने देणे याविरुद्ध आवाज उठवत असतात.
५.सोलापूरजवळ अंकोली गावात आहे अरुण देशपांडे यांचे विज्ञानग्राम. 'रुर्बन' लाइफस्टाइल हाच जगण्याचा मंत्र ते मानतात. अफाट शहरीकरणाची ऊर्जेची भूक भागवताना उलट अधिक ऊर्जा खर्च होत आहे आणि तो हिशेब ते पदोपदी मांडताना दिसतात. इकोसिस्टिमचा भाग बनत विज्ञानाची कास धरत केलेले अनेक प्रयोग
हा अरुण देशपांडेंवरच्या लेखातील वाचनीय भाग. झाडाचे पान हेच सूर्यप्रकाश वापरण्याचे सर्वोत्तम पॅनल, आजूबाजूचा जैविक कचरा हेच जळण, मलमूत्र हेच इंधन यासारख्या खऱ्या अर्थाने ऑरगॅनिक जीवनशैलीचीच गरज पटवून देणारा हा अवालिया. आपण यातलं किती घेणार हा एक प्रश्नच आहे. :)
६.शेवटी आपल्याला सुपरिचित असणारे, आरामात अमेरिकेत जीवन व्यतीत करण्याची संधी असताना गडचिरोलीच्या दुर्गम भागात "सर्च" संस्था काढून आरोग्यसेवेसोबत आदिवासींचे जीवनमान उंचावण्याचा ध्यास घेणारे डॉ अभय आणि राणी बंग यांच्या कार्याचा लेखाजोखा मांडणारा लेख. त्यांच्याबद्दल अधिक काय लिहावं.
या सर्व वल्लींमध्ये एक समान सूत्र आहे ते म्हणजे परिवर्तनाचे, दुर्दम्य आशावादाचे, नेहमीचे प्रश्न वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचे, प्रचंड कष्ट घेण्याच्या तयारीचे, लोकहितासाठी स्वहित त्याग करण्याचे. मॅजेस्टिक प्रकाशनचे "कार्यरत" हे पुस्तक संग्रहास व भेट म्हणून देण्यास सर्वोत्तम आहे.
हे पुस्तक अक्षरधारा बुक गॅलरीमध्ये ऑनलाइन ही उपलब्ध आहे. अनिल अवचटसर स्वतः "कार्यरत" मधल्या या हिरोज् नी माझे डोळे उघडले असे म्हणतात. त्यांची कार्यरतबद्दलची ही युट्युबवरची मुलाखतसुद्धा ऐकू शकता.

सर्व फोटो सौजन्य गुगल :)

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with पुस्तक-प्रवाह

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!