पुस्तक-प्रवाह Profile picture
प्रामुख्याने मराठी भाषेतील पुस्तकांची ओळख करून देण्यासाठी आणि घेण्यासाठी हा प्रपंच!
Jul 30, 2020 13 tweets 4 min read
काहीतरी करावं अशी खुमखुमी असलेल्या वयात हातात पडण्यासाठी सर्वात योग्य पुस्तक म्हणजे अनिल अवचट यांचे "कार्यरत". सामाजिक जाणिवेसाठी ज्ञात असलेले अवचटसर या पुस्तकातून आपल्याला अविरत कार्यरत अशा सात दिग्गज व्यक्तिमत्त्वांची ओळख करून देतात.

@LetsReadIndia
#LetsReadIndia
#मराठी १.मुंबई कायमची सोडून पनवेलजवळच्या तारा गावात राहून रायगड परिसरातल्या कातकरी जनतेसाठी पाडोपाडी मैलोनमैल अर्धपोटी चालण्याऱ्या सुरेखाताई दळवी यांची गोष्ट विलक्षण आहे. लाकडी कोळसा उद्योगात कातकरी लोकांना अक्षरश: पिळणाऱ्या आणि डोंगरच्या डोंगर उजाड करणाऱ्या मालकांविरुद्ध दिलेला लढा,