My Authors
Read all threads
एबीपी माझा वृत्तवाहिनीवरच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे आणि मुलाखतीची संपूर्ण चित्रफीत :
#माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन #राजठाकरे #मनसे #एबीपीमाझा #MajhaMaharashtraMajhaVision #RajThackeray #MNS #abpmajha
• लॉकडाऊन उठवण्याचा नक्की आराखडा काय? अजून किती काळ लॉकडाऊनमुळे लोकांची फरफट करणार? खरंतर आता सगळं सुरळीत करावंच लागेल. कोरोना विषाणूसोबत आपल्याला जगावंच लागेल.
• कोरोनाबाबत लोकांच्या मनात कमालीची भीती निर्माण झाली आहे, माध्यमांनी देखील ही भीती वाढवली. कोरोनाचा संसर्ग गंभीर आहे पण त्याचा बाऊ खूप केला गेला. ज्यांची घरं प्रशस्त आहे त्यांचं ठीक आहे पण झोपड्यांमध्ये, लहान घरांमध्ये कशी लोकं क्वारंटाईन राहणार?
• सुरुवातीला ह्या आजाराचं गांभीर्य कळत नव्हतं, त्यामुळे सुरुवातीला जे झालं ते झालं. पण आता अनलॉक करावंच लागेल, आणि घराबाहेर पडण्यासाठी लोकांमध्ये हुरूप निर्माण करावा लागेल. लोकं भीतीच्या वातावरणातून बाहेर येणं महत्वाचं आहे.
• अर्थव्यवस्था आज जवळपास ठप्प झाली आहे, लोकांच्या नोकऱ्या जात आहेत त्यामुळे आता ही परिस्थिती बदलण्यासाठी सरकार नक्की काय करणार आहे? ह्या विषयी सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे.
• परराज्यातील कामगार त्यांच्या राज्यात लॉकडाऊनच्या काळात परत गेलेत आता तिथे मराठी मुलांनाच नोकऱ्या मिळाव्यात ह्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना काम करत आहेत. माझे सहकारी कंपन्यांशी पाठपुरावा करत आहेत पण ह्यासाठी राज्य सरकारने धोरण आखायलाच हवं.
• कोरोनाच्या ह्या संकटकाळात गेल्या ४ महिन्यात अन्नधान्य, औषधं, सुरक्षा साहित्याचं वाटप असो वा रुग्णांच्या कुटुंबीयांबरोबर ठाम उभं राहणं असो सर्व पद्धतीने माझा महाराष्ट्र सैनिक जनतेच्या मदतीसाठी अहोरात्र काम करत होता.
• कोरोनाच्या काळात मी घराबाहेर जाणं टाळलं कारण मी बाहेर गेलो असतो तर माझ्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली असती त्यातून संसर्गाची भीती होती पण शासकीय पदांवर असलेल्या नेत्यांनी मात्र घराबाहेर पडणं आवश्यक होतं.
• मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांच्या कारभाराचं मूल्यमापन सध्या करता येणार नाही कारण ह्या सर्व काळात ते बऱ्याचदा फक्त टीव्हीवरच दिसत होते.
• राज्य केंद्राकडे बोट दाखवतंय, केंद्र राज्यांकडे बोट दाखवतंय, पण लोकांना ह्याविषयी देणं-घेणं नाही. लोकांची एकच अपेक्षा आहे की आम्हाला ह्या बंदीवासातून, मानसिक विवंचनेतून सोडवा.
• कोरोनाचं संकट अभूतपूर्व होतं किंवा आहे पण त्या काळात सरकारवर टीका करण्याची वेळ नव्हती. दोन्ही सरकारच्या चुका झाल्या पण ती वेळ राजकारण करण्याची नव्हती म्हणून विरोधी पक्षांनी जबाबदारीने वागायला हवं हीच माझी भूमिका होती. भविष्यात ह्यावर सविस्तर बोलूच.
• कोरोनाच्या काळात खाजगी रुग्णालयांनी रुग्णांची वारेमाप लूट केली पण त्यांच्यावर सरकार चाप लावू शकलं नाही. खाजगी रुग्णालयांना वीज, पाणी, दळणवळण सर्व संसाधनं सरकारांकडून मिळत असतं मग त्यांना रुग्णांना ते नाकारतातच कसे?
• राममंदिर व्हायलाच हवं, ज्यासाठी असंख्य करसेवकांनी प्राणांची आहुती दिली त्यामुळे राममंदिराचं भूमिपूजन व्हायला हवं पण सध्याची परिस्थिती बघता भूमिपूजनाची वेळ योग्य नाही.
• लोकांच्या मनातील कोरोनाची भीती दूर झाल्यावर, सगळं स्थिरस्थावर झाल्यावर राममंदिराचं धुमधडाक्यात भूमिपूजन व्हायला हवं. राम मंदिर उभारणी लोकांच्या आनंदाची, अभिमानाची बाब आहे त्यामुळे त्याचं ई-भूमिपूजन नको त्याचं जल्लोषातच भूमिपूजन व्हायला हवं.
• सोनू सूद चांगलं काम करतोय त्याबाबत दुमत नाही परंतु हे एकट्याने शक्य नाही, सोनूला आर्थिक पाठबळ कुणाचं हेही पहावं लागेल अर्थात ते भविष्यात कळेलच. कारण अशी मदत करण्याची इच्छा अनेकांची असते पण आर्थिक परिस्थितीमुळे ते करता येत नाही.
• मनोरंजन क्षेत्राला आता मोकळीक द्यायला हवी, मात्र तिथे उगाच काही अतार्किक नियम लावता कामा नये, आज जगातील अनेक देशांत सगळं सुरळीत झालं आहे. पुरेशी काळजी घ्यायला पाहिजे पण आता बंद ठेवणं हा मार्ग नाही.
• राज्यातील तीन पक्षांचं सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही कारण ह्या तिन्ही पक्षांमध्ये कोणताही संवाद दिसत नाहीये ताळमेळ जाणवत नाहीये.
• माझ्या मनातील महाराष्ट्र कसा असावा ह्याचं चित्र माझ्या महाराष्ट्राच्या विकास आराखड्यात मांडला आहे, जेंव्हा माझ्या हातात सत्ता येईल तेंव्हा मी तो घडवेन. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणं माझा स्वप्न आहे त्यासाठी जनतेने आशीर्वाद द्यावा.
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with Raj Thackeray

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!