आज एक पोस्ट Viral झालेली वाचली. त्यात लिहिलं होतं की, आजच्या या भूमीपूजनाच्या प्रसंगी "बाळ" नावाच्या "बाप" माणसाचं नाव सुद्धा लक्षात असू द्या. जेव्हा बाबरी मशीद पाडल्यानंतर गुन्हे नोंदवत होते तेव्हा हेच "बाळासाहेब" स्वतः पुढे आले होते आणि तुमचे नेते मात्र तेव्हा "चहा विकत" होते.
मला मेसेज मध्ये कोणत्याच नावाची अडचण अशी वाटली नाही किंवा चुकीचं काही वाटलं नाही. जेवढं योगदान "बाळासाहेबांचं" होतं तेवढंच योगदान आमच्या "चहा विकणाऱ्या" नेत्याचं होतं, त्यात काही मतभेद नाही. पण राम मंदिरात कोणाचं किती योगदान आहे ? या विषयावर चर्चा होऊच शकत नाही. ज्या लोकांना शक्य
होतं त्या लोकांनी १९९२ मध्ये अयोध्येत जाऊन कारसेवा केलीच, आणि ज्यांना शक्य नव्हतं त्यांनी घर बसल्या आपल्या रामाला लवकरात लवकर घर मिळावं आणि आपल्या घरातला "कर्ता-धरता राम" सुखरूप घरी परतावा म्हणून करोडो लोकांनी प्रार्थना केली. या उदाहरणात दोघे समूहाचा उद्देश एकच, राम मंदिर.
राम मंदिर हा कधीच एका धर्माचा विषय नव्हता, नाहीये आणि नसेल. राम म्हणजे आस्था, भावना, श्रध्दा, प्रेम, भक्ती अशा मांगलिक नावांची भर पडतच राहावी असा खजिना. त्यामुळे धर्मात तेढ निर्माण व्हावी हा प्रयत्न कारसेवेच्या वेळी सुद्धा झाला नाही आणि आता सुद्धा नाही. फक्त मनातल्या रामाला घरात
ठेवणे हाच त्या मागचा एक उद्देश. ज्याच्यामुळे आपला परमार्थ सुरळीत सुरुय त्याला मात्र "अजूनही" वनवास का ? १४ वर्षे वनवास भोगल्या नंतरही इतके वर्ष "आपला राम" हा एका मंडपात ऊन, वारा, पाऊस झेलत उभा होता, त्याचं स्वतःच घर असताना सुद्धा. आपण एवढे मोठे नक्कीच नाही की देवाला न्याय देऊ
शकू, पण आपली श्रद्धा, आस्था आणि भक्ती मात्र खूपच मोठी आहे याचा प्रत्यय आज प्रत्येक भारतीयाला आला. १९९२ मध्ये जे कारसेवक होते त्यांच्या कडे बघून खरंच प्रेरणा येते मग ते शिवसैनिक असोत, संघ स्वयंसेवक असोत किंवा विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते असोत. अजूनही भरपूर संघटना यात होत्या
परंतु मुख्यत्वे या त्यातल्या काहीशा आहेत. त्या वेळेस मात्र संघटना हा एक "Platform" होता पण प्रत्येक जण मात्र "हिंदू" म्हणून यात सामील झाला होता. आता हिंदू म्हटलं की मग प्रश्न येतो की भारत धर्मनिरपेक्ष देश आहे त्यात हा धर्माचा अडसर कशाला ? ज्या पद्धतीत भारतात मुस्लिम बांधव ईद
साजरी करतात, ख्रिश्चन बांधव नाताळ साजरा करतात, शीख बांधव गुरू नानक जयंती साजरी करतात, बौद्ध बांधव बौद्ध पौर्णिमा साजरी करतात अगदी तशीच पण रामाच्या अस्तित्वाच्या लढाई साठी त्या वर्षी हिंदूंनी "दिवाळी" साजरी केली, यात काही गैर नाही. तो जो मार्ग त्यांनी निवडला तो चुकीचा होता,
अशी टीका या वेळेस झाली पण त्याची शिक्षा सुद्धा भरपूर लोकांनी भोगली आणि प्रायश्चिताला सामोरे गेले. प्रायश्चित झाले म्हटल्यावर त्या गोष्टीचा दोष कुठे उरत नाही आणि संविधानिक पद्धतीने जर तिला "Finishing Touch" दिला गेला तर खूप छान.
आज राम मंदिर भूमीपूजनाच्या वेळी भारतातील लाखो कारसेवक, त्यांचे परिवार, करोडो हिंदू परिवार, इतर धर्मीय सुद्धा आनंदाश्रू वाहून त्या भूमीपूजनाच्या शिलांवर त्याचा अभिषेक करत असतील, याची मला खात्री आहे. या परिस्थितीत सुद्धा अशा पद्धतीतले भूमिपूजन मात्र नक्कीच अनोखे असे आहे.
लवकरात लवकर मंदिराचे बांधकाम पूर्ण होऊन, कोरोना रुपी रावणाचा नाश होऊन, रामराया आपल्या घरात जेव्हा त्यांच्या भक्तांना भेटायला बोलवतील तेव्हा याची देही याची डोळा ते भव्य राम मंदिर बघताना डोळे पाणावले जातील आणि "जय श्रीराम" अशी आपसूक घोषणा दिली जाईल.
"जेव्हा नरेंद्र मोदींना पायजमा (पॅन्ट) घालता येत नव्हता तेव्हा इंदिरा गांधी आणि नेहरूंनी इंडियन आर्मीची भक्कम बांधणी केली."
- मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ कॉँग्रेस नेते कमलनाथ
(दि.१४ एप्रिल २०१९)
(१)
आपण हे लक्षात घ्यायला हवे की प्रत्येक पंतप्रधान त्याच्या किंवा तिच्या कार्यकाळात देशासाठी व देशवासीयांच्या सुरक्षेसाठी आर्मी भक्कम करण्यासाठी सर्वतोपरी योगदान देत असतो. पंतप्रधान असताना काही विषयात नेहरु हे मात्र अपवाद ठरतात. ते कशाप्रकारे हे बघूया.
(२)
प्रसंग १ ला -
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे व इंडियन आर्मीचे असलेले संबंध हे उल्लेखनीय असं काही लिहावं असे नव्हते. यातलेच काही किस्से निवृत्त अधिकाऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रसंगी ऐकायला मिळतात.
अहिंसात्मक उपदेशाचा डोस पाजणारे गांधी, असतील तेव्हाच्या लोकांचे "बापू". समोरच्याने एक गालात मारल्यावर दुसरा गाल पुढे करण्याची बापूंची प्रथा गेली हो. आता दुसरा गाल सुद्धा पुढे केला तर लोकं बत्तीशी काढून हातात द्यायला सुद्धा मागे पुढे
बघणार नाहीत. अशा या परिस्थितीत गांधी उपदेश पाळणं म्हणजे स्वतःच्या हाडांचा सांगडाच करून घेणं योग्य ठरेल.
१९४७ मध्ये पाकिस्तानने भारतावर हल्ला केलेला असून सुद्धा त्या नंतर पाकिस्तानला भारताने ५५कोटी रुपये द्यावेत असा आग्रह धरत "या महात्म्यांनी" चक्क आमरण उपोषण केलं होतं. पाकिस्तान
बद्दल त्यांना प्रेम म्हणून आमचा विरोध नाही, त्या देशाने आपल्या देशावर हल्ला केलेला असून सुद्धा आपण त्याचे चोचले पुरवायचे म्हणजे याला आजच्या युगात हट्टी पोराला स्वतः बापाने माजवायचे असा होतो.
पाकिस्तान मधल्या नरसंहारा मधून वाचून जे "हिंदू" तिकडून भारतात आले, तेव्हा अक्षरशः गटारीवर
सप्टेंबर महिन्याच्या शेवटी भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी भारतीय नागरिकांना एक सुखद बातमी देणार आहेत. सप्टेंबर महिन्याच्या शेवटी मोदीजी "अटल बोगदा" या महत्वकांक्षी प्रकल्पाचं उद्घाटन करतील. नक्की काय आहे अटल बोगदा ? जाणून घेऊया.
(१/१९)
लेह-मनाली महामार्गावरील हिमालयाच्या पूर्व पीर पंजाल या पर्वतरांगेत रोहतांग नावाच्या खिंडीत हा महामार्ग स्वरूप बोगदा बांधला जातोय. ९.२ किलोमीटर लांबीचा हा बोगदा भारतातील सर्वात लांब बोगद्यांपैकी एक असणार आहे. मनाली आणि लेह मधील ४६ किमी अंतर या बोगद्यामुळे कमी होणार आहे.
(२/१९)
समुद्रसपाटी पासून ३१०० मीटर (१०,१७१फुट) उंचीवर हा बोगदा बांधला गेला आहे. रोहतांग पास हा समुद्रसपाटी पासून ३९७८ मीटर (१३,०५१ फुट) उंचीवर वसलेला महामार्ग आहे. भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान व भाजपचे ज्येष्ठ नेते स्व.अटलबिहारी वाजपेयीजी यांच्या नावाने हा बोगदा ओळखला जाईल.
(३/१९)
राम मंदिरावर सुरू असलेला विश्लेषणाचा आखाडा चांगलाच गाजला. वर्षानुवर्षे रखडलेला विषय आज पूर्णत्वास जातोय हे पाहून जनमानसात आनंदी आणि विशेषतः भावनिक लाट उसळी मारतेय. या निमित्ताने भारतातील एकात्मतेचा एक आलेख वर्धिष्णू होताना आपण बघत आहोत.
न्यायालयीन लढाईत बाबरी मशिदीचे मुस्लिम पक्षकार हे भूमीपूजनास निमंत्रित होते. राम मंदिर एका धर्माचा विषय नसून तो आस्था आणि श्रद्धेचा विषय आहे याचे उदाहरण धर्मनिरपेक्ष भारताच्या वहीत लिहिले गेले. हिंदू,मुस्लिम,शीख,जैन,बौद्ध अशा विविध धर्मियांनी भूमिपूजनास साश्रुनयनांनी दाद दिली.
धार्मिक एकात्मता हाच एक मुद्दा नसून आज भारत प्रत्येक क्षेत्रात राष्ट्रीय एकात्मतेच्या नेतृत्वाचा महामेरू होतोय. कोरोना महामारीच्या संकटात सर्व भारतीय एक होऊन प्राण पणास लावून या संकटाचा सामना करताय आणि झुंज देताय, हेच याचे उत्तम उदाहरण आणि भारत यशस्वी होण्याचे कारण आहे.
कोविड-१९ या जागतिक महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. त्याचाच एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पंतप्रधानांनी भारतात लॉकडाऊन जाहीर केला. कोविड-१९चा वाढता प्रादुर्भाव पाहता इतर देशातील भारतीय नागरिकांना सुखरूप घरी आणण्यासाठी "वंदे भारत मिशन" ही योजना आखली गेली.
या मिशनमध्ये दुबई, फिलिपिन्स, अमेरिका, मलेशिया, बांग्लादेश, कुवैत, सौदी अरेबिया, सिंगापूर इत्यादी देशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरूप आणण्याची जबाबदारी Air India Limited या भारत सरकारच्या कंपनीकडे दिली गेली. या मिशन अंतर्गत आता पर्यंत ६लाख ८७हजार लोकं सुखरूप घरी परतले.
मिशन अंतर्गत ५व्या टप्प्यात दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून Air India Ltd चे AXB1344, बोइंग 737 विमानाने १९० लोकांना घेऊन उड्डाण केले.विमानात १८४ प्रवासी होते ज्यात १०लहान मुले,६ टीम मेंबर ज्यात २ पायलट यांचा समावेश होता विमानास कोझिकोड आंतरराष्ट्रीय विमानतळ इथे लँड करायचे होते.