एरवी शास्त्र वगैरे न मानणारी तरुण पिढी pc वर अँटीव्हायरस आवर्जून टाकतातच कारण ती तांत्रिक गरज आहे. मग मानवी मेंदू तर त्या तुलनेत प्रचंड मोठा आहे. तो ही अनेक ठिकाणी कनेक्ट होतो हार्मफुल साईट्स अर्थात जागा जसे की स्मशान, नकारात्मक व्यक्तीचा संपर्क.
उत्तर समोरच होते...
आपण म्हणणारे स्तोत्र मंत्रजप हे आपले अँटीव्हायरस. मंत्रांचा अर्थ समजला काय व न समजला काय.. कॉम्प्युटरचे अँटी व्हायरस प्रोग्रामिंग तरी कुठे समजते आपल्याला?
मंत्र स्तोत्रांचे वेगळे काय आहे? सकाळ संध्याकाळ आपले आवर्तन स्कॅन करत राहायचे... व्हायरस आपोआप जातात...
एव्हाना पी सी व मानवी शरीर आणि अँटीव्हायरस व स्तोत्र मंत्र यातील साम्य आपण जाणलेच असेल...
आणि दुर्लक्ष करत गेलो, तर एकवेळ अशी येते की फॉर्मेट करावं लागतं पण शरीराला, मनाला फॉर्मेट कसं करणार? मग उद्भवतात समस्या, आजार, अडचणी....
रोजचं स्कॅनिंग अर्थात नित्यपाठ आणि आपल्या सद्गुरुंने दिलेले नामस्मरण, नित्यसेवा केली, तर हार्मफुल साईट्सला भेट देताना आपलं संरक्षण, शुचिर्भूतता सांभाळली, की आपलं शरीर, मन नक्कीच छान सुरक्षित राहील.
।। श्री गुरुदेव दत्त ।। 🕉️🙏🏻