निलगिरी पर्वतरांग परिसरात उंच शिखर दोडाबट्टा इथं राहणारी आदिवासी जमात 'तोडा'. हिमालय पर्वत आणि निलगिरी पर्वत यांच्यात साम्य असण्याच आणि इथल्या उत्क्रांतीचं गूढ फक्त याच आदिवासी लोकांना ज्ञात आहे. म्हशींचे कळप हे यांचं दैवत आणि सर्वस्व. १/४ #मराठी #जागतिक_आदिवासी_दिन
वेताची छडी वगळता इतर कोणतेही हत्यार ते वापरत नाही. खोटं न बोलणारी, चोरी न करणारी, बहुपत्नीत्व असणारी जमात.लोकसंख्या नियंत्रण आश्र्चर्यचकित करणारं .पिरॅमिड रूपी घर, मधल्या जागेत तिरिरी हा गोठा असतो.अंधाऱ्या खोलीत देवघर असावे, तेही अद्याप गूढ.तिथे स्त्री विवाहीत पुरूष यांना बंदी.
रात्रीच्या मुक्कामासाठी ते गावात येतात. सूर्यास्तानंतर परत ते रात्री कधीही घराबाहेर पडत नाही. म्हैस वगळता अन्य प्राणी पाळत नाही.आपल्या म्हशी कुणाला विकत नाही. कोंबडा कुत्रा झोपमोड करतात असा समज आहे.ते शेती करत नाही पैशाचा त्यांना मोह नाही. सर्व महिलांना माता म्हणूनच संबोधतात.
वंशपरंपरेसाठी किती स्त्री पुरुष लागतात हे त्यांना अवगत आहे. भ्रूणहत्या तेथे अस्तित्वात नाही. ही एक सर्वात वैशिष्ट्यपूर्ण
जमात आहे. त्यांचा पूर्वोतिहास ,धर्म,भाषा,संस्कृती अद्यापही गूढ आहे. #जागतिक_आदिवासी_दिन
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
@LetsReadIndia #महाराष्ट्रदिन #खाद्यसंस्कृती
विषय जिव्हाळ्याचा आहे म्हणल्यावर व्यक्त व्हायला हवं. महाराष्ट्रात परिपूर्ण आहार जितका समृद्ध आहे तितकेच महत्त्वाचे इतर पदार्थ सुद्धा आहेत. चटण्या लोणची या जेवणाची अधिक लज्जत वाढवतात.१/५
लाल तिखटाची शेंगदाणा चटणी, काराळ्याची चटणी, जवसाची चटणी, तिळाची चटणी अत्यंत आवडीची. काही ठिकाणी कवठाची, चिंचेची गोड चटणी करतात. ओला नारळ किसून केलेली चटणी तर अप्रतिम. पेरू चिरून त्याला फोडणी देऊन केलेली चटणी तोंडाला पाणी आणते.२/५
पणजी, आजी आणि आई तिघींकडून जुन्या उत्तमोत्तम पाककला शिकायला मिळाल्या. साध्या जिन्नसांपासून तयार केलेले महाराष्ट्रीयन पदार्थ आजही तेवढेच प्रिय. हिवाळ्यात हुलग्यांपासून बनवलेलं तिखट माडगं, शिंगोळे तर पणजीची खासीयत. १/n #महाराष्ट्रदिन @LetsReadIndia
आजी लाल जोंधळ्यांची जाड भाकरी करायची त्यावर पाट्यावर वाटून केलेला हिरव्या मिरची लसणाचा झणझणीत खर्डा, तेल मिरची कच्चा कांदा टाकून केलेले तोंडलावणी म्हणजे केवळ अमृतचं. दोडका वाटून त्यात हिरवी मिरची ,लसूण टाकून दोडक्याचा ठेचा व्हायचा बाजरीच्या भाकरीसोबत खायला मजा यायची.२/n
उन्हाळ्यात केलेला सांगा वर्षभरासाठी आयत्या वेळेची भाजी म्हणून तयार असायचा. गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या कुरडया सणासुदीला कुरकुरीत पणा आणायच्या. गव्हाच्या शेवया उन्हाळ्यात आमरसाबरोबर साजूक तूप टाकून तृप्ती द्यायच्या.३/n
Covid-19 या आजाराने सध्या थैमान घातलं आहे. याच आजारातून बरे झालेल्यांना अजूनही बरीचशी लक्षण दिसत आहेत. आतापर्यंत केलेल्या सर्वेक्षणात हाती आलेले काही निकष या थ्रेडमध्ये मांडत आहे. कोविड होऊ न देणं आणि मास्क सॅनिटायझर चा वापर करणं हाच सध्या रामबाण उपाय आहे.१/n
खालील लक्षणे:-
लक्षणे सौम्य ते तीव्र आढळून येतात
१.मेंदूशी संबंधित लक्षणे- चक्कर येणे, विसराळूपणा, दुःखी वाटणे ,गोंधळ होणे, लक्ष केंद्रित करण्यात अडचणी, निद्रानाश, चव आणि वासाची संवेदना बदलणे, अनामिक भीती वाटते, चिडचिडेपणा.
२.केस गळणे.
३.अंगदुखी, थंडी वाजून ताप येणे,अंग थरथरणे, वजन कमी होणे.२/n
४.Herpes शी निगडीत आजार, EB व्हायरस शी संबंधित आजार, ट्रायजेमिनल न्यूराल्जिया, हार्मोन( संप्रेरक)मधील चढ-उतार, उष्णता सहन न होणे.
५.सांधेदुखी
६.लघवीतून प्रथिने उत्सर्जित होणे.
७.फुफ्फुसावरील परिणाम-
दम लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे,श्वास पुरेसा घेता न येणे. धापा टाकणे.
३/n
आपण: आपले ताणतणाव- एक चिंतन - अंजली नरवणे
मनावर विजय- एकनाथ ईश्वरन ( वैशाली जोशी)
चार शब्द द्यावे घ्यावे- संजीव परळीकर
मुलांवरचे संस्कार- शं.व्यं.काश्यपे
द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग- डेव्हिड श्वार्त्झ ( प्रशांत तळणीकर)
शांततेने काम करा- पॉल विल्सन (सुनंदा अमरापूरकर)
१/४
नापास झालेल्यांची गोष्ट- अरूण शेवते.
अजब गजब जगणं वागणं-. राजन खान
इकिगाई- हेक्टर गार्सिया, फ्रान्सिस मिरेलस
15 secrets successful people know about time management- Kevin Kruse.
आपण एक विश्वस्त - डॉ बाबा नंदनपवार
तरूणांना आवाहन- स्वामी विवेकानंद
३/४
मुलींच्या शिक्षणाचा पाया रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ,राजमाता जिजाऊ यांच्यावरील सर्व पुस्तके वाचनीय.
मी मलाला- मलाला युसुफजाई
मैत्रेयी - अरूणा ढेरे
नवी स्त्री- वि.स खांडेकर
आई समजून घेताना- उत्तम कांबळे
बियॉन्ड अग्ली- कॉन्स्टन्स ब्रिस्को
१/५
संस्कृत भाषा अत्यंत मधुर , प्राचीन ज्ञानामृत असणारी आहे. बऱ्याच भाषांचा उगम संस्कृतमध्ये सापडतो. आयुर्वेद, पशुपक्षी, आहारविहार, नीतीमुल्ये यांचं चपखल वर्णन सुभाषितांमध्ये आढळतं. चरक, सुश्रुत,वाग्भटांच्या आरोग्यचिकित्सा आयुर्वेद आजही उपयुक्त आहेत. १२वी नंतर
हा अभ्यास थांबला १/n
या थ्रेडमध्ये काही दुर्मिळ आणि आवर्जून वाचावे अशा महत्त्वपूर्ण ग्रंथाची माहिती देतेय.
कालिदासाचे मेघदूत हे महाकाव्य आजही सर्वोच्च रचना मानली जाते.
बाण- हर्षचरित
गुढाण- बृहतकथा
सोमदेव- कथासरितसागर
जयदेव-गीतागोविंद
दंडी- दशकुमारचरित्र
२/n