#राष्ट्रीयएकात्मता म्हणजे काय?

खंडप्राय प्रदेशातील असंख्य लोकांची मने समान सूत्राने बांधणे म्हणजे राष्ट्रीय एकात्मता! आपल्याला अशी किती सूत्र माहीती आहेत?

तांदूळ, पाऊस आणि रस्ते देशातील एकात्मतेची सर्वात मोठी व महत्वाची सूत्रे आहेत असे म्हटले तर? #Tweet4Bharat @iidlpgp Image
मी २०१७ साली महाराष्ट्रातल्या कोकण प्रांतात एका दुर्गम गडावर एका साधूच्या कुटीत गरम आमटी भात खाल्ला. २०१८ साली सिक्किम राज्यात अभ्यासदौर्या ला वरण आणि भात खायला मिळाला. २०१९ मध्ये कर्नाटकमध्ये एका खानवळीमध्ये अम्मा आग्रह करून भात वाढत होत्या. कोलकत्त्यामध्ये खिचडी खायला मिळाली.
काश्मीर मधील बिर्याणी पासून ते तमिळनाडूच्या पोंगाल पर्यन्त, गुजरातच्या खिचडी पासून ते मणीपुरच्या खिचडी पर्यन्त सगळीकडे आपल्याला तांदूळाचे खाद्यप्रकार दिसतील!
भौगोलिक विविधतेमध्ये देखील #तांदूळ हे एक समान सूत्र दिसते!

#आर्थिकविषमता देखील तांदूळ कमी करतो असे देखील म्हणता येईल! Image
तुम्हाला गरिबाच्या झोपडीत किमान भात खाऊ घालतात. आदिवासी पाड्यावर चटणी सोबत शिजवलेला भात पत्रावळीमध्ये वाढतात. मध्यमवर्गीय घरात सणालासुद्धा भात असतो. पंचतारांकित हॉटेलमध्ये बिर्याणी खायला मिळते.

दिल्लीपासून गल्लीपर्यन्त आपलासा वाटणारा तांदूळ #सदैव वर्षभर विविध रूपात भेटतच राहतो! Image
देशाला #मान्सून एका धाग्यात गुंफतो!
सर्व देशाच्या नजरा मान्सून केरळात येण्यावर असतात. देशातील सर्व वृत्तपत्र आणि माध्यमे हिन्दी महासागर ते हिमालयापर्यंत मान्सूनचे वार्तांकन करतात.

त्यातून नकळत ह्या देशातील सर्वसामान्य व्यक्तीदेखील #आसेतुहिमाचल ह्या राष्ट्राचे दर्शन घेत असतो. Image
मान्सूनमध्ये श्रावण ‘सणांचा राजा’ म्हणवला जावा असा उत्साह आणि जल्लोष संपूर्ण देशात असतो. राष्ट्रीय जल्लोषाचे अप्रत्यक्ष-प्रत्यक्ष कारण मान्सूनच तर आहे!

तिरंग्यातील समृद्धीचा हरित रंग देखील ह्या राष्ट्रावर #मान्सून आगमणानंतरच शोभून दिसतो. Image
राष्ट्राची समृद्धी आणि मान्सून ह्यांचे नाते इतके घट्ट आहे की केवळ पावसाच्या अंदाजावर देशातील शेअर बाजार वर-खाली उसळ्या घेतो!
मान्सून राष्ट्रातील लोकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे!

देशभरात कुठेही गेलात तरी पाऊस-पाण्याच्या गप्पा समोरच्या व्यक्तीशी तुमचे #नाते घट्ट करून टाकतात!
खालील आदर्शांच्या चरित्रामध्ये काय समान आहे?
सर्वांनी आपला देश फिरून त्याचे #एकात्मिक स्वरूप जाणले. आपल्या कार्याने हा विशाल देश #एकत्र सांधला!

श्रीरामचंद्रांचा अयोध्या ते श्रीलंका असा उत्तर ते दक्षिण प्रवास असो किंवा स्वामी विवेकानंदांचा कोलंबो ते अल्मोरा दक्षिणोत्तर प्रवास! Image
रामदासांनी काश्मीर ते कन्याकुमारी फिरत ‘सामर्थ्य आहे चळवळीचे’ दिलेला मंत्र असो की विनोबांचा #भूदान चळवळीचा यज्ञ!
हजारो किलोमीटर फिरल्यानंतर हे राष्ट्र आपल्याला समजायला लागते!

पंचा नेसून काठी टेकवत दरिद्री नारायणाच्या दारात जाऊन #एकरूप झाल्याशिवाय #राष्ट्रपिता होता येत नाही!
आधुनिक काळात रस्त्यांनी हे प्रचंड काम केलेले आहे. रस्त्यांचे विस्तीर्ण जाळे म्हणजे विराट राष्ट्रपुरुषाच्या प्राणवाहिन्या!
टपालापासून पर्यटनापर्यन्त सगळ्याचे माध्यम #रस्ते आहेत!

राष्ट्रात धावणार्या गाड्या, रेल्वे आणि विमाने तर राष्ट्राच्या चैतन्याचे आणि एकात्मतेचे #साधन आहेत! Image
प्रवास केला की तुम्हाला असे एकात्मतेचे धागे सापडतात. #राष्ट्रीयएकात्मता भूतकाळातील ग्रंथांसोबत वर्तमानातील समाजात शोधली तरच अशी एकात्मतेची #सूत्र आपल्याला सहज गवसतील! ह्या संस्कृतीशी आणि परंपरांशी आपले नाते सापडेल.

असे नात्यांचे बंध सर्वांना सापडणे म्हणजेच #राष्ट्रीयएकात्मता!
विविधतेतल्या भेदांपेक्षा आपण तांदूळ, मान्सून आणि रस्त्यांप्रमाणे सहज सापडणार्‍या असंख्य समान गोष्टींवर मने जुळवली तर #राष्ट्रीयएकात्मता वर्धित होईल. मोकळ्या मनाने सारासार विचार करत टोकाच्या भुमिका आपण टाळायला शिकलो की आपल्याला एकतेची असणारी विविध रुपे एका सूत्रात सहज माळता येतात! Image
सर्वांना #एकात्मिक ठेवणारी अशी रेशमी सूत्र आपण शोधणे आणि वाढवणे हेच #राष्ट्रीयएकात्मतेचे काम!

विनोबांनी असेच एक सहज, सुंदर आणि सर्वसमावेशक सूत्र जुळवले आहे! आपणही असे एकात्मतेचे सूर जुळवायचे प्रामाणिक प्रयत्न करुयात!

#Tweet4Bharat @iidlpgp @rmponweb @malhar_pandey @DEVenDrapai Image

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with shreyash phapale

shreyash phapale Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!