My Authors
Read all threads
एखादा अख्खा देशच्या देश किती पर्यावरण स्नेही असू शकतो? नाही म्हणजे आपल्या कुवतीप्रमाणे फारफार तर 'झाडे लावा झाडे जगवा','पाणी आडवा-जिरवा', आणि अलीकडच्या काळात फार फार तर ऑरगॅनिक खायचं आणि रहायचं इथपर्यंतच.. #म #धागा 👇
पण,एका देशातील जनता प्रदूषण,ग्लोबल वार्मिंग,कर्ब वायू उत्सर्जन याविरोधात इतकी इरेला पेटलीय की त्यांच्या महिला नेतृत्वाने तिथल्या सगळ्या औष्णिक विद्युत भट्टयाच बंद करायला घेतल्यात..👇
हे असं करणं एखाद्या प्रगत राष्ट्राला सहज शक्य नसतं..कारण,चालणारी डोलणारी अर्थव्यवस्था अंथरूण धरू शकते या असल्या निर्णयाने..पण तरी या खमक्या बाईंनी तेवढाच खमका निर्णय आमलात देखील आणलाय.👇
तिनं एवढा मोठा निर्णय घ्यायचा तर त्यासाठी तेथील जनतेला विश्वासात घेत साधक बाधक चर्चा जाणीवपूर्वक घडवून आणल्या..त्या बाई अँजेला मर्केल आणि देश अर्थातच जर्मनी.
तो देश हळूहळू त्यांच्या सर्व औष्णिक वीज कारखान्याच्या चिमण्या कायमच्या बंद करेल.. #म 👇
1950 सालच्या पहिल्या कारखान्यातुन अजूनही 300 मेगावॅट वीज तयार होतीय.. तिच्यावर पहिली बंदीची पाळी असेल..येत्या 18 वर्षात सगळ्या 30 वीजभट्टया तो देश बंद करेल..त्यासाठी पर्यायी 4400 कोटी डॉलर ची योजनाच त्यांनी आणलीय.👇
ज्या खाजगी मालकांचे कारखाने बंद होतील त्यांना,राज्यांचा कर बुडेल त्यांना,ज्यांची नोकरी जाईल त्यांना आशा सर्वांना नुकसान भरपाई मिळेल यातून..त्यातच पर्यायी पर्यावरण स्नेहीऊर्जास्त्रोतासाठी त्यांनी झपाटून घेतलंय स्वतःला..👇
जर्मनीवर पडणार प्रत्येक सूर्यकिरण इथे वीज पिकवले,इथल्या वाऱ्याला वीजनिर्मिती केल्याशिवाय वाहताच येणार नाही अशी बळजबरीच केलीय जणू त्यांनी.
2011 ला आपल्यात जैतापूर अणुविद्युत प्रकल्पावरून वाद सुरू होता की,2020 ला महासत्ता व्हायचंय तर अणुविद्युतच कशी गरजेची आहे. #म 👇
नेमकी त्याचवेळी फुकीशीमा दुर्घटना घडली..आणि जर्मनीने एका दमात सगळ्या अणुविद्युत भट्टयाच बंद करायचा निर्णय घेतला आणि त्यावेळी त्यांच्याकडे 2050 सालापर्यंतच ऊर्जा स्त्रोतावरच नियोजन तयार होतं म्हणे..कसली भन्नाट गोष्ट आहे ना ही..इथं आपल्याला उद्या काय होईल हे माहिती नाही..👇
कसं जमलं हे मर्केल बाईंना? कोणती इच्छाशक्ती त्यांना हे सगळं करण्यास भाग पाडत गेली? काल परवा पर्यंत मर्केल बाई आम्हाला अजून काही कार्बन उत्सर्जन कमी करता येणार नाही असं छातीठोकपणे सांगत होत्या...त्यांनी आज असा निर्णय घ्यावा? 👇
बाई पहिल्यापासून धीट आहेतच,पण एवढ्या धीट असतील असं न्हवत वाटलं असे जाणकार बोबडी वळवून सांगत होते या निर्णयावर..
जर्मनीकर हे उत्तर त्याच..ते खंबीरपणे उभे राहिले मर्केल बाईंच्या पाठीशी..तेथील जनमानसांत पर्यावरणासंबंधीत कळवळा मर्केल बाईंना हा निर्णय घेण्याची इच्छाशक्ती देऊन गेला.👇
तेथील समाजाने हे सगळं घडवून आणलं..आपल्याकडे काही महिन्यापूर्वी कोळसाखाणी विषयी कायदे पुरोगामीपणे बदललेत त्याचा आनंद मानावा की जर्मनीसारखे पर्यावरणीय मुद्दे आणि सिंगापूर सारखे अन्न सुरक्षा मुद्दे आपल्या सामाजिक पटलावर नाहीत याचं दुःख करावं अशी द्विधा अवस्था सध्या अनेकांची असेल.👇
एक समाज म्हणून विचारांचा हा वणवा पेटवायला अशा विचारांची एक ठिणगी पुरेशी असते.गरज असते आपण आपल्या प्रायोरीटीज ठरवण्याची..आपलं महासत्ता होण्याचं साल उजडून मावळत आलंय.👇
डॉ.कलामांनी एक स्वप्न पाहिलं 2020 नावाचं.. त्यांनी टाकलेल्या ठिणगीचा वणवा करण्याची सुवर्णसंधी दवडली आपण. प्राक्तन आपलं दुसरं काय? नुसतं राजकारण म्हणजे लोकशाही न्हवे हे बहुदा कधीच कळणार नाही आपल्याला.. असो.❤
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with डेडपूल...

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!