मला माझा राजीव परत द्या, मी निघून जाईन आणि जर तुम्ही माझा राजीव परत देऊ शकत नसाल तर मला शांतपणे त्यांच्या आजुबाजुला ह्याच मातीत मिसळून जाऊ द्या. #मराठी#राजीव_गांधी #धागा 👇
तुम्ही पाहिलं होतं ना त्यांना! उंच कपाळ,बोलके डोळे,उंच शरीर आणि त्यांचं हास्य.
जेंव्हा मी त्यांना पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हा पाहतच राहिले होते. मैत्रिणीला विचारलं कोण आहे हा हँडसम तरुण? मैत्रीण बोलली होती तो भारतीय आहे, पंडित नेहरूंच्या कुटुंबातला! 👇
मी पाहतच राहिले ह्या पंडित नेहरूंच्या कुटुंबातील तरुणाला.
काही दिवसांनंतर विद्यापीठातील कॅन्टीनमध्ये जेवणासाठी गेले.खूपच मुले होती.तिथे मी कोपऱ्यात एक टेबल घेतला.तिथे ते सुद्धा दुसऱ्या मित्रांबरोबर होते मला वाटलं ते मलाच पाहत आहेत.मी नजर तिकडे फिरवली तर खरच ते मलाच पाहत होते.👇
क्षणभर नजरानजर झाली आणि दोघांनीही नजरा हटवल्या परंतु हृदय जोरात धडधडत होतं. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी कॅन्टीनमध्ये गेले,ते आज पण तिथे उपस्थित होते. ते पहिल्या नजरेतलं प्रेम, खरंच तो दिवस खूप खास होता. त्यानंतर आम्ही एकत्र फिरायचो.नदीच्या किनाऱ्यावर जायचो.कारमध्ये दूर चक्कर मारून👇
यायचो.हातात हात घेऊन रस्त्यावर फिरणे. चित्रपट पाहणे.मला आठवत नाही आम्ही एकमेकांना कधी प्रपोज केलं होतं, कारण गरज पडली नव्हती सगळं काही नैसर्गिकरित्या घडून आलं होतं आम्ही एकमेकांचे बनून गेलो होतो. आम्हाला फक्त कायमस्वरूपी एकत्र राहायचं होतं.
त्यांची आई प्रधानमंत्री झाली होती.👇
जेव्हा त्या इंग्लंडला आल्या होत्या, तेव्हा राजीवनी मला त्यांना भेटवलं होतं. आम्ही त्यांच्याकडे लग्नाची परवानगीही मागितली. इंदिराजींनी आम्हाला भारतात यायला सांगितलं. भारत? हा देश जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात असता तरी राजीवजी सोबत मी तिथे राहण्यास तयार होतेच.👇
मी भारतात आले खादीची खास गुलाबी साडी खुद्द नेहरूंजींनी वीणली होती. इंदिराजींनी लग्नात तीच साडी नेसली होती. तीच साडी नेसून मी राजीवच्या कुटुंबाचा घटक बनले आणि मी राजीवची झाले त्यानंतर राजीव माझे आणि मी इथलीच होऊन गेले. दिवस पंख लावल्याप्रमाणे निघून गेले. राजीवजींचे भाऊ अपघाती 👇
मृत्यू पावले. इंदिराजींना आधाराची गरज होती. राजीव राजकारणामध्ये सहभागी होऊ लागले. राजीवजींनी राजकारणात जाणे मला अजिबात मान्य नव्हते. मी त्यांना विरोध केला.त्यांना राजकारणापासून लांब ठेवण्यासाठी खूप प्रयत्न केले.परंतु तुम्ही हिंदुस्तानी माणसं आईसमोर बायकोचं थोडीच ऐकणार? 👇
राजीवजी राजकारणात गेले आणि माझ्यापासून वाटले गेले, त्यांच्यामधील माझा वाटा घटला गेला. एके दिवशी इंदिराजी बाहेर निघाल्या असता गोळ्यांचा आवाज आला. धावत पळून जाऊन पाहिलं तर त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या.हिंदुस्थानातील लोकांनी त्यांना गोळ्या घातल्या होत्या.👇
त्यांना धावत जाऊन उठवण्याचा प्रयत्न केला.दवाखान्यात घेऊन गेले. त्यांच्या रक्ताने माझे कपडे भिजत होते. माझ्या हातातच त्यांचं जीवन संपलं होतं.त्यादिवशी माझ्या कुटुंबातील एक नाही तर दोन सदस्य कमी झाले होते.एक म्हणजे, इंदिराजी जगातून गेल्या होत्या आणि दुसरी व्यक्ती म्हणजे राजीवजी 👇
आता पूर्णपणे देशाचे झाले होते. मी भोगलं, साथ दिली, जे माझं होतं ते मी देशासोबत वाटलं होतं. काय मिळालं?एक दिवस त्यांचं मृत शरीर माझ्यासमोर आणलं, कपड्याने झाकलेला चेहरा, एका हसणाऱ्या गुलाबी चेहऱ्याला मांसाचा गोळा बनवून तुम्ही सर्वांनी माझ्यासमोर ठेवलं होतं. 👇
त्यांचा शेवटचा चेहरा मला विसरायचा आहे. त्या कॉलेजच्या कॅन्टीनमधली ती पहिली नजर, त्या गाडीत बसून दूर चक्करा मारलेल्या सांजवेळा, ते हास्य फक्त तेवढेच मला लक्षात ठेवायचं. या देशात मी जितका वेळ राजीवजींसोबत घालवला आहे, त्यापेक्षा अधिक वेळ मी त्यांच्याशिवाय या देशात घालवला आहे. 👇
एखाद्या यंत्राप्रमाणे माझी कर्तव्य पार पाडली आहेत.जोपर्यंत ताकत होती त्यांची स्वप्ने तुटू दिली नाही. या देशाला समृध्द व गौरवशाली क्षण दिले. मी घर आणि कुटुंब सांभाळलं आहे. मी जबाबदारीने आयुष्य जगले आहे. मी माझं कर्तव्य केलं आहे. राजीवजींना जी वचने मी कधीच दिली नव्हती ती देखील 👇
मी निभावली आहेत.सरकारे येतात जातात. तुम्हाला वाटतं का, आता या हरण्या जिंकण्याचा माझ्यावर काही परिणाम होत असेल? तुमच्या शिव्या, विदेशी म्हणून मारलेले टोमणे, बारबाला, जर्शी गाय, विधवा, स्मगलर, गुप्तहेर....या सगळ्याचे मला दुःख होतं? 👇
एखाद्या टीव्ही चैनल वर दिल्या जाणाऱ्या शिव्यांनी मला दुःख होतं?ट्विटरवर आणि फेसबुकवर चालवल्या जाणाऱ्या घाणेरड्या ट्रेण्डवर मला दुःख होतं? नाही हो, मला दुःख होत नाही.परंतू या लोकांवर कीव जरूर येते!! लक्षात ठेवा, ज्याच्यावर प्रेम केलं होतं. त्याचा मृतदेह पाहून दुःख होते.👇
त्यानंतर दुःख नाही होत. मन दगडाचे होऊन जाते. तुम्हाला माझ्यावर राग असेल माझा तिरस्कार करत असाल तर करा. मी आजच निघून जाईल, फक्त मला माझा राजीव परत द्या आणि जर का तुम्ही माझ्या राजीवला परत देऊ शकत नसाल तर मला शांतपणे राजीवच्या आजूबाजुला ह्याच मातीत मिसळून जाऊद्या. 👇
या देशाच्या सुनेला एवढा हक्क तर मिळाला पाहिजे ना!
(सोनिया गांधी यांच्या पत्राचा एक भाग) (Posted by-The unreal realities) (हा मराठीतला लेख आनंद भुसे याच्या फेसबुक वाँलवरुन काँपी पेस्ट केला आहे.) या लिखाणाची सत्यता मी तपासली नाही..पण मला हे विचार पटले म्हणून इथं #copied केले.🙏
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
ठाणे-बोरिवली बोगद्याची १४४०० कोटींची निविदा.. तांत्रिकदृष्ट्या एकच निविदाकार पात्र ठरतो.. दुसरा त्याविरोधात लवादाकडे जातो..पण तिथून त्यास पिटाळले जाते..तो पात्र निविदाकार मेघा इंजि. आणि पिटाळलेला L&T..ही घटना मे-२०२३ ची.
महिनाभरापूर्वी मेघा ने १४० कोटींचे रोखे घेतलेले असतात.
१/न
ते रोखे कोणत्या पक्षाला गेले हे उद्या स्पष्ट होईलच..पण आज आत्ताही शेंबड्या पोरानेही योग्य उत्तर द्यावं..असाच हा प्रश्न आहे..याच मेघाला समृद्धी महामार्गाचे काही काम वर्धा जिल्ह्यात मिळालेलं..त्यात वन्यजीवांसाठी ये-जा करणारा उन्नत मार्ग कोसळला होता.. पण काहीच कारवाई झालीच नाही.
२/न
मेघाने आपल्या गत ४ वर्षीच्या एकूण निव्वळ नफ्याच्या तब्बल १५% इतकी रक्कम रोखे खरेदीसाठी वापरली आहे..बिनदिक्कत कंत्राट मिळणे, अक्षम्य त्रुटीवर क्षमा मिळणे..ही त्या १५% चीच कृपा म्हणायची..गेल्या पाच वर्षात ९६६कोटींचे रोखे मेघाने घेतलेत.
३/न
अखंड एक पिढी तुझा खेळ बघत लहानाची थोर झाली.. एखाद्या खेळाशी भावना जुळण्याची ती त्या पिढीची पहिलीच वेळ.. तुझा खेळ पाहतानाचे 'नेल-बाईटिंगचे' अनेक प्रसंग आजही जशाच तसे आठवतात.. तत्कालीन जाहिरातीमधील पेप्सीसारखा थंडावा सापडणारी.. तुझी प्रत्येक नजाकत रसिकांची मनं शांत करत गेली..❤️
अजून मिसरुटही न फुटलेला 'सच्या' ते पोक्त 'मास्टर ब्लास्टर सचिन' या प्रवासाचे यथासांग सहप्रवासी होण्याचे भाग्य आमच्या पिढीने अनुभवले..तो बावनकशी अनुभव पारिजातकाच्या सड्याप्रमाणे सदैव आमच्या आयुष्यात सुगंधी पिंगा घालत राहील..पण त्या समृद्ध अनुभवाच्या भरजरी पदराला एक मात्र डाग आहे..
तो डाग म्हणजे..मूकसंमतीचा.
क्रिकेट माणसांनीच बनवलेला खेळ आहे.. माणूस म्हणून जे अवगुण असतात ते त्या खेळातही येणारच.. एक क्रिकेट रसिक म्हणून क्रिकेटच्या त्या अवगुणी वृत्तीविरोधात सचिनने काही बोलावं..ही एकमात्र आशा तेंव्हा अपूर्ण राहिली..तुझी ती मुकसंमती तेंव्हाही वेदनादायक होती.
तिन्हीसांजेची लगबग रस्त्यावर दिसत होती.. रस्ता फार काही वर्दळीचा न्हवता.. हार-फुलांची दोनचार दुकानं आणि शांत चहापानासाठी कौलारू एकदोन हॉटेलं.. अधूनमधून कुंपणाच्या आतील घरं..तुरळक एखादं किराणा मालाचं दुकानं..आणि रस्त्याच्या टोकाला छोटेखानी कसलं तरी मंदिर.. बस् संपला रस्ता.. #Love
परिसर तुलनेत शांत होता.. कुठंतरी लांब चंदन अगरबत्ती धुराची काडी हवेत सोडत होती..ती काडी संपता संपता सायलेंट सुगंध त्याच्यापर्यंत पोहचवत होती..त्या सुगंधाने दिवसभराची ओढाताण हलकी होत होती..दिवेलागणीला असतो तो आभाळातला भडक तांबूसपणा आता विझत आला होता..त्यातच थंडीची धांदल सुरू होती.
नगराच्या मध्यवर्तीत असूनही हा तळ मनाला भुरळ पडणारा होता..वाहतूक अगदी शिस्तीत जात होती.. मंदिराकडे जाणारी माणसं दुर्मिळ असणाऱ्या शांत चेहऱ्याने लगेच ओळखू येत होती.
फुलांच्या दुकानात 'मेरे दिल में आज क्या है.. तू कहे तो मैं बता दूँ।' वाजणारं गाणं फुलांना अजूनच खुलवत होतं..
दिवसाच्या पहिल्या प्रहराची सुरवात..रात्री बाराला गडगडाटी पाऊस पडून गेला होता..घरी सगळे साखर म्हणावी अशा झोपेत..रातकिड्यांची किरकिर शांत वातावरणाची शांतता भयाण रातीत परावर्तित करत होती.. मधूनच एखादं कुत्रं रडायचं..पण ते कोणीतरी तोंड दाबून धरल्यागत लगेच शांत पण व्हायचं. #Annabelle
मला जाग आली तेंव्हा घरात सगळे आपापल्या रूममध्ये झोपले होते..फॅनची घरघर सोडता कसलाच आवाज न्हवता..अजून थोडा वेळ आहे, पडावं..या हिशोबाने मी कलंडलो..इतक्यात लहान मुलांच्या सायकलचं ते इंग्लिश संगीत वाजायला सुरवात झाली..पहिल्यांदा मला बाहेरून आवाज येतोय वाटलं..पण ते फक्त पाचच मिनिट.
कारण आवाजाची दिशा ही आपल्याच घरातून होती..आणि इतक्या उशीर आमच्या घरात एकसारखं ते संगीत वाजायची ही पहिलीच वेळ..आणि एवढं घाबरायचीही ही पहिलीच वेळ.. अगदी The Conjuring, Annabelle एका दणक्यात आठवावी इतकी.
काय करावं कळत न्हवतं..आणि खोलीचं दार उघडलं आणि काही दिसलंच तर करायचं काय?
उघड्या माळावर कुसळं उगवून वाळून जायची..ती खायला जनावरं सुद्धा नसायची..नजर जाईल तिथवर चिटपाखरूही न्हवतं..उघडे डोंगर-माळ ज्यांच्या मालकीचे..ते ही काही करू शकत नव्हते..अशात त्यावर नजर पडली एका बड्या पवनचक्की कंपनीची..आणि एका रातीत लोकांना पैशे ठेवायला नव्या ट्रंका घ्याव्या लागल्या.
जमिनीचे सौदे ठरतील तसं एका एका घराचे वासे फिरू लागले.. लाकडी तुळई जळणात गेल्या..त्या जागी RCC पिलर आले.. सायकलची चैन पडायची त्याच जागेवर धूळ आत येऊ नये म्हणून चारचाकी काचा वर करू लागल्या.. ३ डोकी घरात असूनही दारात ४-४ दुचाकी आणि २-२ चारचाक्या सर्रास दिसू लागल्या.
मळलेल्या कॉलर गेल्या..व्हाइट कॉलर आता ड्रायक्लीन होऊन येऊ लागल्या..पाण्याच्या घोटासाठी वाट बघणारे.. आता बार मालकाला खिशात ठेऊ लागले..सो कॉल्ड बरकतीने गाव सारा फुलून उठला..भावंडात हिश्श्यावरून धराधरीही झाली..हा सगळा गोंधळ चांगला दशकभर सुरू राहिला..खर्चापेक्षा जमा जास्त होती.
रशिया-युक्रेन कुस्ती फक्त ५६" किंवा इंधन महागाई एवढ्यापुरती मर्यादित नाही..युक्रेन पट्टीचा गहूनिर्यातदार देश आहे..सूर्यफूल,सोयाबीन इ. तेल ही तो पिकवतो.. सांगायचा मुद्दा आहे..युक्रेन युद्ध धांदलीत अडकल्याने.. आंतरराष्ट्रीय बाजारात त्या जिन्नसांचा तुटवडा आहे..❤️ #farm
आपल्याकडे आत्तापासूनच खाद्यतेल महागाई जाणवत आहे ती त्यामुळेच..खाद्यतेलाच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण नाही..त्यास पर्याय नाही..पण, गव्हाचे तसे नाही.. सद्यस्थितीत भारत गव्हाचे चार दाणे बाळगून आहे.. शिवाय यंदाचे रब्बी उत्पादन ही येईल..तेंव्हा केंद्राने निर्यातबंदी न करता हा योग साधावा.
शेतकऱ्यांना चार पै ज्यादाचे मिळतील त्याने.. पण, केंद्राची शेतकऱ्यांप्रति असलेली भावना यापूर्वी कांदा आणि साखर निर्यातबंदीत दिसलीच आहे..अन्नसुरक्षा या सदराखाली शेतकऱ्यांचा जीव घेऊनच स्वस्त धान्य दुकानांची शृंखला चालवण्याची परंपरा यंदा तरी खंडित व्हायला हवी.