"म्या हाय ना रे तुमास्नी..नका काळजी करू!!"🔥🔥♥️♥️
कालच पहिल्या तिमाहीचा(1996 पासुन आपण दर तिमाहीला GDP घोषीत करतो त्याच्याआधी वर्षाच्या शेवटी सांगितला जायचा) GDP घोषित झाला आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेच की '-23.9' हा पहिल्या तिमाहीचा GDP आहे जी की अत्यंत चिंताजनक बाब आहे
त्याआधी तुम्हाला आणखी एक महत्त्वाची बातमी सांगतो की भारताच्या GDP ने पहिल्यांदाच negative आकडा गाठला नसुन 1957-58 ला '-1.2%',1965-66 ला '-3.7%' आणि 1972-73 ला '-0.3%' ही आर्थिक स्थिती होती आणि ज्यावेळीस 1977-79 साली मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात पहिले बिगर
काँग्रेसी सरकार(जनता पार्टी सरकार) आले त्यांच्यावेळीही 1979-80 साली देशाचा GDP '-5.7%' पर्यंत खाली गेला.
GDP साधारणपणे 8 क्षेत्रांच्या प्रगतीवरून काढला जातो उदा.कृषी,उद्योग,हाॅटेल सेवा,खाणी इ..
तर ह्या तिमाहीत सगळे sectors negative मध्ये गेले आहेत फक्त 'कृषी' एकमेव क्षेत्र
आहे जे '+3.4%' ने खंबीरपणे उभे आहे!! सध्या प्रत्येक क्षेत्र अस्तित्वासाठी लढत असताना शेतकरी आपल्या मातीशी नाळ जोडुन टिकुन आहे ज्यामुळे भारत एक कृषीप्रधान देश असल्याची ओळख जागतिक पातळीवर आणखी ठळक होत आहे!!ह्या आलेल्या संकटातुन बळीराजा आपल्याला नक्की बाहेर काढेल हा मला विश्वास आहे
: पु.ल.चा अतिसुंदर लेख
" क्षणांचे सोने.."
जमिनीला पाठ टेकताच ज्याला गाढ झोप लागते तो या जगातला सर्वांत सुखी माणूस. झोपताना त्याच्या मनावर कालच्या अपयशाचं मळभ किंवा उद्याच्या अपेक्षांचं ओझं नसतं. झोप हा त्याचा वर्तमान असतो आणि त्याचा तो पुरेपूर आनंद मिळवित असतो. @MarathiDeadpool
असा शांतपणे झोपणारा माणूस सकाळी लवकर उठतो, आयुष्यातील नव्या दिवसाच्या आगमनानं आनंदी होतो आणि त्या बक्षिसाबद्दल जीवनाप्रती कृतज्ञता व्यक्त करत नव्या उमेदीनं कामाला लागतो.
असा माणूस शेअर्सच्या चढ-उतारांमुळं भयभीत होत नाही, सोन्याच्या भावातील चढ-उतारांमुळं विचलित होत नाही. #मराठी
घरांच्या वाढत्या किंमतीमुळं अस्वस्थ होत नाही.
भावनांच्या घातक चढ-उतारावर टीआरपीचं गणित असणाऱ्या दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांवरील उथळ कार्यक्रमांनी तो भावविवश होत नाही.
त्याच्या घरात ब्लडप्रेशरच्या गोळ्या नसतात, पोट साफ करण्याची चूर्णं नसतात. अंगारे-धुपारे, मंत्र-तंत्र असल्या
#आमदार विकले जाणं,पैश्यासाठी मुल्य हवेतसे वाकवणं हे #लोकशाही ला कमकुवत करण्यास कारणीभूत आहे..
लोकं आपापल्या कामांमध्ये व्यस्त असतात.शेतात राबणे,दररोज काम करून महिन्याअखेर पगार पाडणे आणि हफ्ते भरणे,दवाखाना,लाईटबील,घरातील तत्सम खर्च,शिक्षण इ.भागवण्यातुन उसंत मिळत नाही सामान्य
जनतेला..
दिवसभर काम करुन थकल्यावर आपल्या कुटुंबाकडे नीट लक्ष द्यायला लोकांना वेळ नसतो ही तर राजकारणी मंडळी..यांच काय चाललय याकडे लक्ष देणं तर दुरापास्तच!
म्हणुन दर पाच वर्षाला अद्दल घडवण्यासाठी लोकशाहीने #मतदान रूपी अल्टीमेट अस्त्र दिले आहे लोकांना..
पण जर चालु सरकारमध्ये
घोडेबाजार होऊन जर रात्रीत सत्तापालट होत असेल तर त्या अस्त्राचाही फोलपणा ठळक होतो आणि सत्ताधार्यांना चाप बसवायला जो मोठा उपाय आहे तोच निष्क्रिय ठरला तर सत्तेचा माज वाढायला वेळ नाही लागणार!!उद्या अंबानी-अदाणी पैसे फेकुन रात्रीत आपले सरकार लोकांच्या उरावर बसवतील..
भयंकर चाललय हे 😥!
#CongressToolkitExposed हा हास्यास्पद ट्रेंड असुन स्वताला काही जमलं नाही म्हणुन #भाजप रडीचा डाव खेळत आहे.
म्हणजे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे..स्वता गंगेत हजारो प्रेत सोडुन दिलीत,भाजपशासित राज्यातली आकडेवारी लपवली,तुमच्या अडाणीपणा चा फटका संपुर्ण देशाला बसला आहे आज
बाहेरची दुनिया
भारतावर हसत आहे,मिम्स बनवत आहे कारण आपल्या इथल्या बहुसंख्य लोकांनी विज्ञानाला फाट्यावर मारलय आणि गोमुत्र पिऊन आणि शेण थापुन लोकं अक्षरशः अमरत्व प्राप्त करण्याचा बालिश प्रयत्न करत आहेत.
इकडं अख्खा देश जळत असताना तुम्ही तिकडं #मोदीमहाल बांधण्यात व्यस्त आहात कोरोना झाल्यावर डार्क
चाॅकलेट खाण्याचा सल्ला देत आहात.१९० दिवस झाले आज शेतकरी बांधव ३ कृषी कायद्याविरोधात ऊन-वारा-पाऊस झेलत आंदोलन करत आहेत तरी तुम्हाला पाझर फुट नां!!!
कोरोना चा नवीन स्ट्रेन सापडला तरी पश्चिम बंगालमध्ये लाखों नी रॅली घेत राहिलात,सुपर स्प्रिडर झालात.निवडणुक संपली की जिवाला घाबरून
या दोघांच नाव आहे अहमद आणि नना!
इस्त्राईल-पॅलेस्टाईन मध्ये जे युद्ध चालले आहे त्यात इस्त्राईल कडुन गाझा पट्टीवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले गेले.
गाझामधील या दोघांचे घर पुर्णता उध्वस्त झाले असुन आपला आवडता 'मासा' आपण वाचवु शकलो याचे विलक्षण समाधान यांच्या चेहर्यावर झळकत आहे!!
माणसाची महत्त्वाकांक्षाच माणसाचा बळी घेण्यास कारणीभूत ठरते हे तेव्हढच जळजळीत वास्तव आहे पण त्या महत्वकांक्षेपोटी जे हजारो लाखो निष्पाप माणसं मारली जातात,त्यांचा सर्रास बळी घेतला जातो.अपरिमित नैसर्गिक,आर्थिक,भौतिक हानी होते.
शेवटी युद्धानंतर युद्धात गुंतलेले असे प्रदेश
शेकडो वर्षे मागे फेकले जातात.सत्तेच्या हव्यासापोटी प्रचंड नरसंहार कितपत योग्य???
काय साध्य होणार यातुन?त्यामुळे वैयक्तिक मला गांधीजींबद्दल भयंकर अप्रुप वाटत.गांधीजींच्या विचारसरणी शिवाय जगात शांतता नांदणे अशक्यप्राय आहे...
१)#BPCL खासगीकरण,कंपनी माहिती
२)#share सरकारला फायदा
३)BPCL अस्तित्व
२०२०-२१ बजेटनुसार सरकारला खासगीकरणातुन २.१लाख करोड रु. उभे करायचे आहेत पण सध्या ते अशक्यच आहे..सरकारने #BPCL विकायला काढलीय पण आश्र्चर्याची गोष्ट #RelianceIndustries ने बिडींगमध्ये सहभाग घेतला नाही.रिलायन्स सोबत
जगभरातील नावाजलेल्या कंपन्या जसेकी #saudi_aramco,इंग्लंडची #BP(british petroleum) व फ्रांन्सची #total यांनीही बिडींगमध्ये निरूत्साह दाखवला आहे.
**BPCL बद्दल थोडी माहिती:-
१८८६ साली भारत पेट्रोलियमची नोंद स्काॅटलॅंडमध्ये करण्यात आली कारण तेव्हा भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते..
आज आपण जी भारत पेट्रोलियम (BPCL) पाहतोय तिचे सुरूवातीचे नाव 'Rangoon(रंगुन) oil and exploration company' असे होते.त्यावेळीस आसाम व बर्मा(आजचा म्यानमार) मध्ये तेलाच्या खाणी शोधण्यासाठी कंपनीची स्थापना करण्यात आली होती.आज कंपनीत १२,१५७ कामगार काम करतात.#BPCL मध्ये सरकारची ५२.९%
जेव्हढं लागत त्यापेक्षा जास्त संचय करणे हा मनुष्याचा स्वभाव गुणधर्मचं.आपली व आपली येणारी पिढी जास्तीत जास्त प्रमाणात निश्चिंत कशी राहील ह्यासाठीचा सगळा खटाटोप.उपलब्ध क्षेत्रात उत्पादनाला मर्यादा यायला लागल्या की माणसाने विस्तारीकरण अंगिकारले व स्वतामध्ये बाकीच्या @faijalkhantroll
प्राण्यांपेक्षा जास्त असलेल्या उपजत बुद्ध्यांकाचा वापर करून प्रगती साधली.हे सगळे करताना दुसर्या बाजुला समांतरपणे चालु असलेले निसर्गाचे नुकसान जाणीवपूर्वक डोळेझाक करुन टाळत आला.पण म्हणतात ना जखमेवर आवश्यक ते दवापाणी न करता ती तशीच झाकली तर एक दिवस ती चिघळणारच.. @AtulAmrutJ
'मीच श्रेष्ठ आविर्भाव' विनाशाकडे घेऊन जातो हे अगदी प्राचीन काळापासून सउदाहरण दिसत आले आहे.
'Karma is real'. कर्मा ही संकल्पना माहित असेलच...कर्मा समजण्यासाठी एक उदाहरण सांगतो.रामायणामध्ये बाली/वाली नावाचा वानर होता.त्याला हरवणे खुप अवघड होते परंतु