🔥वसुसेन🔥 Profile picture
विविध विषयांवर व्यक्त होण्यास आवडतं. #वसुसेन #threadकर #study_iq fan of महारथी कर्ण, विविध ब्लाॅगची लिंक 👉 https://t.co/0PWzn4W2lm

Sep 2, 2020, 6 tweets

"म्या हाय ना रे तुमास्नी..नका काळजी करू!!"🔥🔥♥️♥️
कालच पहिल्या तिमाहीचा(1996 पासुन आपण दर तिमाहीला GDP घोषीत करतो त्याच्याआधी वर्षाच्या शेवटी सांगितला जायचा) GDP घोषित झाला आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेच की '-23.9' हा पहिल्या तिमाहीचा GDP आहे जी की अत्यंत चिंताजनक बाब आहे

त्याआधी तुम्हाला आणखी एक महत्त्वाची बातमी सांगतो की भारताच्या GDP ने पहिल्यांदाच negative आकडा गाठला ‌नसुन ‌1957-58 ला '-1.2%',1965-66 ला '-3.7%' आणि 1972-73 ला '-0.3%' ही आर्थिक स्थिती होती आणि ज्यावेळीस ‌1977-79 साली मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात पहिले बिगर

काँग्रेसी सरकार(जनता पार्टी सरकार) आले त्यांच्यावेळीही 1979-80 साली देशाचा GDP '-5.7%' ‌पर्यंत खाली गेला.
GDP साधारणपणे 8 क्षेत्रांच्या प्रगतीवरून काढला जातो उदा.कृषी,उद्योग,हाॅटेल सेवा,खाणी इ..
तर ह्या तिमाहीत सगळे sectors negative मध्ये गेले आहेत फक्त 'कृषी' एकमेव क्षेत्र

आहे जे '+3.4%' ने खंबीरपणे उभे आहे!!‌ सध्या प्रत्येक क्षेत्र अस्तित्वासाठी लढत असताना शेतकरी आपल्या मातीशी नाळ जोडुन टिकुन आहे ज्यामुळे भारत एक कृषीप्रधान देश असल्याची ओळख जागतिक पातळीवर आणखी ठळक होत आहे!!ह्या आलेल्या संकटातुन बळीराजा आपल्याला नक्की बाहेर काढेल हा मला विश्वास आहे

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling