My Authors
Read all threads
*बौद्धांची कोंडी संपली दिशाभूल करणारी बातमी*

नुकतीच एक स्थानिक वर्तमानपत्रात एक दिशाभूल बातमी छापण्यात आली बौद्धांच्या दाखल्याबाबत

तर अशी काही कोंडी वैगरे सुटली नसून कोंडी निर्माण करण्यात आली आहे या बातमीचा उद्देश दिशाभूल करणे आहे व मूळ समस्येवरून लक्ष दुसरीकडे
1)
वळविण्याचे प्रयत्न आहेत.

आता सध्या चक्क महार किंवा 37 लिहून दाखला दिल्या जातो आणि म्हणतात कोंडी सुटली?

बौद्ध असून सुद्धा माहार लिहून देणे ही बौद्धांची कोंडी नव्हे काय? हे बौद्ध धम्मात जाती घुसवण्याचा कट आहे

त्या दाखल्यावर बौद्ध उल्लेख कुठेही नसतो
1990 दुरुस्ती आदेश चा
2)
उल्लेख सुद्धा नसतो

त्या मध्ये

तुम्ही महार होतात was असा उल्लेख नसून महार आहात is असा उल्लेख असतो

महार लिहलेले जाती चे प्रमाण पत्र तर आधीही मिळत होते व आताही तसेच दिल्या जाते मग बदल कोणता झाला????? मग नवीन काय झाले
फक्त फॉर्म भरताना तुम्ही हिंदू ऐवजी बौद्ध किंवा शीख या
3)
पैकी काहीही लिहू शकता धर्माच्या रकान्यात
पण जात तीच लिहावी लागेल जी हिंदू धर्मात असताना होती अर्थात as it is 37 महार
मग नेमका काय उपयोग झाला??
कोणती कोंडी सुटली??

बौद्ध धम्मात तर कोणतीही जात नाही

केंद्र स्वतः म्हणत आहे कि 1956 ला ज्या अनुसूचित लोकांनी धर्म परिवर्तन
4)
केल्याने ते धर्मातरित बौद्ध समूह आहेत मग तोच धर्मातरित बौद्ध शब्द अनुसूचित समाविस्ट करण्याचे सोडून
उलट जुन्या जाती बौद्ध धम्मात घुसडण्याचे कारस्थान कोण कोण करत आहेत हे या बातमी मधुन दिसत आहेच
त्या पेडन्यूजर ने बौद्धांच्या आरक्षणाचा मुद्दा सोडविला म्हणणाऱ्या ने आताचे
5)
किमान एक तरी प्रमाण पत्र दाखवावे की ज्या वर धर्मांतरित बौद्ध अनुसूचित जाती लिहून आहे.

अरे उलट असा दाखला पूर्वी दिल्या जायचा नमूना 7 ज्या मद्धे धर्मांतरित बौद्ध उल्लेख होता तो बंद पाडला व आता फक्त नमुना 6 महार 37 लिहून दाखला दिल्या जातो
यावर कुणी फारसे बोलत तर नाहीच पण
6)
अश्या चुकीच्या बातमीला बळी पडतात .

बस आता यावर ठोक भूमिका घ्यावी लागेल...

म्हणून या विषयावर आमची भूमिका काय असायला पाहिजे ते बघा..

🔷 *धर्मांतरित बौद्ध संविधानिक ओळख आणि त्या नुसार आमच्या हक्क/आरक्षण बाबत आमची भूमिका* 🔷

⬇️⬇️⬇️⬇️⬇️

*अनुसूचित जाती यादीत स्थान निर्माण
7)
करायचे आहे*
*Sc60 converted buddhist*

🔹 *दि. 14 ऑक्टोबर 1956 ला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अस्पृश्य महार बांधवांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली त्या नंतर आरक्षण बंद झाले.*

🔹 *1960 ला महाराष्ट्र सरकारने परत बौद्धांना आरक्षण दिले.त्या नंतर केंद्र सरकारने 1990 ला
8)
बौद्धांना अनुसूचित जाती च्या सवलती दिल्या पण केवळ बौद्ध लिहून आरक्षण दिले जात नाही*
*जात तर महार लिहणे गरजेचे आहे .*प्रमाण पत्राचा अर्जदार हा महार आहे असे लिहून दिल्या जाते *.महार म्हणून आरक्षण दिले जाते. आमची तक्रार नेमकी येथेच आहे*. *बौद्धांना अनुसूचित जाती च्या 9)
सवलती 1990 च्या कायद्याने तर दिल्या पण जातेय परंतु हिंदू धर्मातील महार जात लिहावे लागते*
*त्या ठिकाणी महार होते असे म्हटले तरी चालेल पण माहार आहे*
*He belongs to Mahar caste* *म्हणजे आताही आहे असे लिहल्या शिवाय केंद्र सरकारचे आरक्षण दिले जात नाही.*
10)
🔹 *धर्मांतरित ख्रिश्चन समूहाला त्यांची जुनी जात न लिहता ओबीसी आरक्षण दिले जाऊ शकते*

🔹 *चर्मकार लोकांनी स्वीकारलेल्या आदिधर्म किंवा रोहिदास नावाने चर्मकार न लिहता अनुसूचित जाती चे आरक्षण दिले जाऊ शकते*
*त्यांना ते ज्या जातीचे आहे ते लिहणे बंधनकारक नाही*
11)
*कारण धर्मांतरित ख्रिश्चन ईस्ट इंडियन ख्रिश्चन हे ओबीसी सूचित आहेत*

🔹 *आदिधर्म व रोहिदास(2007 ला) हे अनुसूचित जाती च्या सूचित आहेत.*

🔹 *कबीरपंथी, रोहिदास शीख, मजहबी शीख हे पूर्व चर्मकार असलेल्या लोकांच्या समुहाचे सुद्धा आरक्षण त्यांना चर्मकार न लिहिता त्यांच्या
12)
ग्रुप चा उल्लेख करून प्रमाणित होत आहे*

🔹 *त्याच प्रमाणे धर्मांतरित बौद्ध जर अनुसूचित आले तर महार आहे असे कुणी प्रमाण पत्र घेण्याची नामुष्की कोणावर येणार नाही.*

🔹 *या मुळे आमचा बौद्ध म्हणून स्वाभिमान कायम राहील आणि आमचे संविधानिक हक्क सुद्धा अबाधित राहील .*
13)
🔹 *डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणा बाबत म्हटले की,*
*आरक्षण हे समतेसाठी आहे गरिबी हटाव साठी नाही .*

🔹 *संविधान कलम 341 नुसार शेंडूल्ड कास्ट ही केवळ जाती ची सूची नसून त्यात गट सुद्धा समाविष्ट केले जातात.*

🔹 *आदिधर्म, रोहिदास, धर्मांतरित ख्रिश्चनobc , कबीरपंथी मजहबी*
14)
*शीख रोहिदास शीख तसेच मुस्लिम चे काही घटक obc*

*ही उदाहरने वर दिलेले आहेत.*

🔹 *म्हणून आम्हाला आमची ओळख ही महार नसून धर्मांतरित बौद्ध आहे हवी आहे आणि ते ही आमचे अनुसूचित असलेल्या हक्का सहित*

*ही आमची प्रमुख मागणी आहे*

🔹 *पण काही बौद्धांना आरक्षण तर पाहिजे
14)
पण शेडूल्ड कास्ट म्हणून नको म्हणतात त्यांच्या शेंडूल्ड कास्ट बाबतच्या कन्सेप्ट बरोबर क्लिअर नाही ते मनुवाद्यांनी केलेल्या अप प्रचाराचे बळी आहेत.*

🔹 *मग यांना दुसऱ्या नावाने आरक्षण पाहिजे म्हणजे sc ,st,obc सोडून*

🔹 *पण अडचण अशी आहे कि या व्यतिरिक्त आरक्षण गटाची
15)
संविधानात तरतूदच नाही.*

🔹 *तुम्ही या पैकी एका समूहातील असला पाहिजेत 1950 पूर्वी तरच तुम्हला आरक्षन घेता येईल.*

🔹 *काही काही लोक डॉ बाबासहेब लिखित स्टेट and मायनॉरिटी वाचून ठरवतात कि आम्हाला अल्पसंख्याक बौद्ध म्हणून 341 मध्ये जसे आहे तसेच आरक्षण द्या*
16)
🔹 *पण त्यांना लक्ष्यत येत नाही कि सदर पुस्तक हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत ठेवलेल्या 70 मागण्या आहेत ज्या मधुन केवळ 7 ते 10 गोष्टीच वोटिंग मध्ये टिकल्या बाकी नाही*
*आत्ता डॉ बाबासाहेब नाहीत आणि त्यांचाइतकं 1 टक्के ही विद्वान नीतिविना व्यक्ती तो ही बौद्ध
17)
राजकारणात नाही आणि कधी सत्तेत ही आम्ही येणार नाही म्हणून अल्पसंख्य बौद्ध म्हणून आम्हला as it is मिळेल हे सत्यं नाही*

🔹 *जेवढं इतर अल्पसंख्य लोकांना त्यांचं लोकसंख्या प्रमाणे मिळत ते अल्पसंख्य बौद्ध लोकांना लोकसंख्या च्या प्रमाणत मिळत असेल जे तुटपुंज आहे*
18)
🔹 *अल्पसंख्य असणे आपल दुखणं नाही*

🔹 *2000 वर्षाचा मागासलेपणा आमच्यावर लादला आहे इथल्या मनु ने ते आमच्या समाजाचा दुखणं आहे*

🔹 *हिंदू धर्मा सोबत महार जात सोडून आम्ही बौद्ध तर स्वाभिमान करिता झालो ती घाण आता आम्हला नको*

🔹 *याचा अर्थ राज्यघटना लागू होऊन 6 वर्षातच आम्ही
19)
बरोबरी ला आलोत असे नाही तस असत तर*
*डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण ची तरतूद 6 वर्षच केली असती पण* *नाही तो अमर्यादित आहे कारण 2 हजार वर्षाचा हिसाब आहे तो काय 6 वर्षात तर क्लिअर होणार नाही*

🔹 *म्हणून आपण आपल्या संविधानिक हक्कावर पाणी सोडता कामा नये*
20)
🔹 *बौद्ध अल्पसंख्याक म्हणून शासकीय किंवा निमशासकीय नोकरीचे व शैक्षणिक संस्थेत आरक्षण नाही.*

🔹 *आर्थिक आधारावर 10 टक्के आरक्षण दिले ते ओपन ला दिले त्यातूंन. sc st obc बाद केले आहेत अल्पसंख्याक ला नोकरीत व शैक्षणिक आरक्षण नाही*

🔹 *सामाजिक प्रतिनिधीत्व जर समजले
21)
तर हा विषय समजेल*

🔹 *विषय आहे सामाजिक, शैक्षणिक मागास असलेल्या धर्मांतरित बौद्ध यांचा*

🔹 *हा समूह पूर्वी अस्पृश्य होता, त्यांच्यावर आजही अत्याचार होतात व जातियवाद होतो.*

🔹 *तर दुसऱ्या बाजूने अल्पसंख्याक बौद्ध हे भारतातील पारंपरिक बौद्ध सुद्धा आहेत.जे मूळचे अनुसूचित
22)
जाती चे नाहीत अशा अल्पसंख्याक ला सरकार आरक्षण देण्याचा प्रश्नच नाही व त्यांची मागणी ही नाही*

🔹 *आपल्या देशात अल्पसंख्याक केवळ बौद्ध आहेत असे नाही*

🔹 *मुस्लिम, शीख, ख्रिश्चन जैन,पारशी आणि लडाख काश्मीर बंगाल मधील जुने बौद्ध सुद्धा अल्पसंख्याक आहेत पण ते
23)
सामाजिक मागासलेले नाहीत*

🔹 *मुस्लिम सोडले तर ख्रिश्चन, पारशी,जैन हे शक्षणिक दृष्टीने मागासलेले सुद्धा नाहीत.*

*मग केवळ बौद्धांना अल्पसंख्याक उचलून आरक्षण कसें काय देणार?*
*इतरांचे अल्पसंख्य लोकांचे काय?*

🔹 *ते जुने(पूर्वीचे) बौद्ध हे अल्पसंख्याक आहेत पण ते
24)
धर्मांतरित बौद्ध नाहीत*

🔹 *पण आपण हिंदू महार अनुसूचित जातीतून धर्मांतरित बौद्ध आहोत*

🔹 *अल्पसंख्याक म्हणजे काय? तर ते संख्येने कमी आहेत.*

🔹 *अल्पसंख्याक लोकसंख्येने कमी आहेत म्हणून त्यांना सरकारी नोकरी व शिक्षणात आरक्षण देने हे संविधानातच नाही.*
25)
🔹 *बहुसंख्याक लोकांनी अल्पसंख्याक लोकांना त्यांच्या सांस्कृतिक अधिकारात ढवळाढवळ करू नये*
*आणि त्यांना आपला सांस्कृतिक ठेवा जतन करता यावा म्हणुन अल्पसंख्याक ही तरतूद संविधानात केली आहे.*

🔹 *अल्पसंख्याक यांना आरक्षण नसणार हे संविधान सभेत ठरले होते.*
26)
*अनुसूचित जाती जमातींना आरक्षण देण्याचे ठरलेच होते.*

🔹 *इत्यादी बाजूंचा अभ्यास केल्यावर 1990 च्या बौद्धांना दिलेल्या सवलती मध्ये माहार न लिहत धर्मांतरित बौद्ध म्हणूनच आरक्षण मिळावे ही अगदी साधी मागणी आहे ती कायदेशीर व तात्विक आहे.*

🔹 *जर कुणाला अल्पसंख्याक म्हणूनच
27)
नोकरीचे व शिक्षणाचे व संविधानिक लोकप्रतिनिधी च्या जागेवर आरक्षण मागायचे असेल तर आमचा विरोध नाही .*
*पण अशा मागणी ला बेस काही नाही.*
*तरीही कोणत्याही नागरिकालात मागणी करण्याचा अधिकार आहे*
28)
🔹 *पण आमच्या संवैधानिक मागणीला त्यांनी विरोध करणे चुकीचे आहे.*
29)


Mahendra_A_Bansode

*धर्मांतरित बौद्ध ओळख आणि आरक्षण कृती समिती, मुंबई*

*The universal buddhist soceity of india*

*whatsapp & Call 9322554095*
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with @Jollyboy

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!