इसरुन येदना म्हन्नारांच्या पानी पानी
सावकार खातूय माज्या मढ्यावरच लोणी
रावाचा रंक जाहला दुष्काळाच्या भडीमारानं
जीव झालाय कवडीमोल लटकायच्या पर्यायानं

(१)
म्हातारीगत भाव पिकांचा आकसून गेला
खताबियांनी खिसा माजा फाटून गेला
हमीभावाची गाडी कधी घावलीच न्हाई
कोरडी पाईपलाईन आन काळी भेगाळल्याली आई
गावातल्या लोडशेडिंगला खरच तोड न्हाई
कुनालाच पुढा-यागत वाईट खोड न्हाई

(२)
आगीतन फुफुट्यात तसं पोरीच लगीन
समदच गहान सावकारीत रानं माळं दागीनं
ऐरावत रत्न थोर तसं पोरीच सासर
हुंड्यापाई इकलं लाखमोलाच शिवार

(३)
शाळा कालेजाची फी जणू चाललो बाजारा
कर्जबाजारी बापाचा पोर अडानी -हायाला
ईक घेतल्याबिगर मला वाटच दिसना
रेनव्याच्या वज्यान लाडू गोडच लागना

(४)
कर्जमाफीच धोरन न्हाई डोस्क्यात शिरलं
निस्त टीवीवर पॅकेज काई म्हाईत कूट झिरपलं
हुंबरा वाड्याचा जप्तीची खेटरं
आता कुटं जायाचं म्या
वसुलीच्या भेनभेन वश बुडला
आता कसलं आलय भ्या

(५)
कापडं फाटकी कंठ दाटूनिया आला
नशिबाचा डावसुदिक निसटून गेला
रडायला पन न्हाई आधाराची कूस मला
भाऊ शहरातला ईसरला कसा आपुल्या भावाला
(६)
आज माज्यासाठी दावा थोडी तुम्ही बांधिलकी
माज्या गाण्याकडं जरा समद्यांनी ध्यान द्या
सानभूतीपरिस मला आधारच द्या....

(अंत)

- चंद्रशेखर जगदाळे

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Chandrashekhar Jagadale

Chandrashekhar Jagadale Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @C_D_Jagadale

31 Aug
सत्ता टिकवायची असेल तर अर्थव्यवस्थेचं अपयश लपवायला धार्मिक तेढ वाढवणं हा एकच पर्याय राहीलाय आता त्यांना. लक्ष ठेवा, लोकांना जागृत करा. GDP Rate हा वाढीचा दर असतो उदा. ४%,५% म्हणजे जरी तो धिम्या गतीनं वाढला तरी धोकादायक स्थिती मानली जाते, इथं तर २२% नी घटलाय GDP आपल्या देशाचा. (१)
१९२९ च्या जागतिक महामंदीत जे लोक तरुण होते त्यांची अख्खी पिढीच बरबाद झाली होती. अर्थशास्त्रात त्यांना Lost Generation म्हणतात. आपण तरुण ह्या शतकातली Lost Generation आहोत. आपली जबाबदारी हजार पटींनी वाढली आज. शिक्षण, मतदान, शिस्त अशा आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला बदलून (२)
नवा देश घडवावा लागणारे आपल्याला. संकटाची जाणीव होऊन आपल्यावर ही वेळ का आली, कुणाच्या कृत्यांमुळे आली त्याचा शांत बसून विचार करा. राज्यसत्ता, न्यायसत्ता, पत्रकारिता, धर्म अशा सगळ्या गोष्टींनी आपला बळी घेतला आज. (३)
Read 4 tweets
24 Jun
नोकरीत मन का लागत नाही ?
Job Satisfaction नाही, कामामधे रस नाही, नोकरी करायची म्हणून करतो, जॉब करतो रे पण मन लागत नाही, का जन्माला आलोय असं वाटत ऑफिसमधे ? असे खूप सारे प्रश्न माझ्यासारख्या ९० च्या दशकात किंवा त्यादरम्यान जन्मलेल्या ब-याच तरुण मुलांना मुलींना पडतात. (1)
त्यामागचं सर्वात जास्त जाणवलेल कारण शोधण्याचा प्रयत्न करतोय. मी IT मधे गेली 5 वर्षे काम करतोय त्या अनुषंगाने हे मुद्दे मांडलेत.
१. Henry Ford आणि Frenderick Taylor ह्या दोघांनी जेव्हा Assembly Line चा शोध लावला त्यामागची त्यांची धारणा अशी होती की जास्तीत जास्त Surplus-वाढावा (2)
हवा असेल तर कामगारांचे मन आणि शरीर एकत्र आले नाही पाहिजे किंवा कृती आणि विचार कामाच्या ठिकाणी एकत्र येऊ नयेत.
२. हेच तत्त्व भारतीय IT Companies साठी लागू आहे. सर्व प्रमुख भारतीय IT कंपन्या Service based आहेत, म्हणजे तुरळक अपवाद वगळता त्यांचे स्वत:चे असे products नाहीत (3)
Read 13 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!