फौजदारी प्रक्रिया संहिता (Code of Criminal Procedure)
थ्रेड-३ #निर्मिती
थ्रेड क्र.२ मध्ये आपण फौजदारी प्रक्रिया संहितेचा थोडक्यात इतिहास व कायद्याच्या कक्षा पाहिल्या होत्या.
आज आपण कलम २ मधील काही महत्त्वाच्या तरतुदी पाहणार आहोत.
कायद्याच्या कलम २ मध्ये काही महत्त्वाच्या शब्दांच्या व्याख्या दिल्या आहेत, त्यापैकी
'दखलपात्र गुन्हा (Cognizable offence) ही महत्त्वाची संज्ञा दिली आहे - याचा अर्थ CrPC च्या अनुसूची १ नुसार अथवा ईतर कोणत्याही कायद्यातील तरतूदी नुसार, पोलीस अधिकारी गुन्ह्यातील संशयितास..
वॉरंट शिवाय अटक करू शकतात
उदा. चोरी, खून, बलात्कार इ.
अदखलपात्र गुन्हा (Non Cognizable offence)- कायद्यात याचा अर्थ दिला नसला तरी, दखलपात्र गुन्हे सोडून सर्व गुन्ह्यांचा यात समावेश होतो.
या गुन्ह्यात, न्यायाधीशांच्या आदेशाशिवाय अटक करण्याची परवानगी पोलिसांना नसते
उदा. शिवीगाळ, किरकोळ भांडणे, इ.
दखलपात्र गुन्ह्याच्या नोंदीची कार्यपद्धती कायद्याच्या कलम १५४ मध्ये दिली आहे
कलम १५४- दखलपात्र गुन्ह्याची माहिती संबंधित व्यक्तीने तोंडी दिल्यानंतर पोलीस ठाणे प्रमुखाने अथवा त्याच्या देखरेखीखाली, लेखी स्वरूपात दाखल करून घेणे बंधनकारक आहे....
यालाच आपण , 'FIR (प्रथम खबरी अहवाल) म्हणतो'
सदर FIR नोंदणी झाल्यानंतर, तो फिर्यादीस वाचून दाखवून त्यावर फिर्यादीची स्वाक्षरी घेऊन, त्याची एक प्रत फिर्यादीस विनामूल्य देणे बंधनकारक आहे.
🔴 महिलांसाठी विशेष तरतूद- एखाद्या महिलेविरोधात असा गुन्हा घडला असल्यास
(उदा. IPC चे कलम ३५४,३५४अ, इ) , सदर महिलेकडून FIR , महिला पोलीस अधिकाऱ्यांनीच नोंदविणे बंधनकारक आहे.
🔴 दिव्यांगांसाठी विशेष तरतूद-
दिव्यांग व्यक्ती विरोधात असा गुन्हा घडला असल्यास दिव्यांग व्यक्तीच्या घरी किंवा तिला सोयीस्कर असेल अशा ठिकाणी FIR नोंदविणे बंधनकारक आहे.
FIR दाखल करताना घ्यावयाची दक्षता
💠 FIR कोणत्याही पोलीस चौकीमध्ये दाखल करता येतो
💠 तक्रारीची एक प्रत आपल्याकडे ठेवावी, त्यावर संबंधित अधिकाऱ्याची सही घ्यावी
💠 FIR दाखल करून घेण्यास टाळाटाळ होत असेल तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अथवा न्यायालयास कळवावे
💠 FIR स्वतः वाचून अथवा इतरांकडून वाचून घेवून सही करावी
💠 तक्रारीत सर्व नोंदी आल्याची खात्री करावी
सौजन्य-गूगल
टीप- कायदेशीर बाबी असल्याने काही चुकीचे असल्यास जाणकारांनी दुरुस्त कराव्यात #निर्मिती #चला_बदल_घडवूया
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh