'२०१४ च्या विधानसभेच्यावेळी शिवसेनेची भाषा आणि त्याचा रागरंग, अपरिहार्यतेतून झालेली/केलेली युती' ह्या सर्व गोष्टी विसरून २०१७ च्या मुंबई मनपाच्या निवडणूकीत निसटत्या बहुमताने का होईना पण सेनेनं महापौरपद राखलं, तेंव्हा विरोधी पक्षनेतेपद +
भाजपाने नाकारलं होतं. का? तर राज्यात युती असताना मनपात कसं विरोधात कसं बसायचं? विरोधी पक्षनेतेपद कसं स्विकारायचं? मग ते विरोधी पक्षनेतेपद गेलं काँग्रेसकडं. हा असला विचार ही बाबरसेना युतीत असताना कधीच करत नव्हती. सतत खिशातल्या राजीनाम्याचे कवित्व रोज नवा आकार घेत होतं. +
किंबहुना सत्तेत असताना विरोधाचं शेण कसं खायचं ह्याचा अध्याय महाराष्ट्र रोज अनुभवत होता, ह्याच सेनेकडून.
हे सारं असताना सुद्धा केवळ सद्गुणविकृतीपायी हातचं विरोधीपक्षनेतेपद भाजपनं घालवलं..
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाचे डोळे उघडले आणि झालेल्या दगाबाजीचा बदला घेण्यासाठी +
(उशिरा आलेली अक्कल) भाजपनं दोन वर्षानंतर विरोधी पक्षनेतेपदावर दावा ठोकला आणि तशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली.
जी याचिका मुंबई हायकोर्टाने शिस्तीत फेटाळून लावली आहे.
कशी फेटाळून लावलीये? अगदी शिस्तीत..
कोर्टाने अगदी योग्य कारण दिलंय.. कोर्ट म्हणालं, +
"विरोधी पक्षनेत्यासारखं महत्त्वाचं पद एखाद्या व्यक्ती किंवा पक्षाच्या लहरीप्रमाणे बदलणं कायद्यात बसत नाही.."
"काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद सर्व नियम पाळून आणि कायद्याने मिळालं असल्यानं तेच विरोधी पक्षनेतेपदी राहतील.."
एवढा गोंधळ झाला असूनसुद्धा भाजपा प्रदेशाध्यक्षांना अजूनही +
सेनेसोबत जायचे संकेत (त्यांनी नंतर घूमजाव केलं) द्यावेसे वाटतात.. ही हाईट्टे.. हाईट्ट..
ही एवढी सद्गुणविकृती अनंत करमुसेंना मारहाण झाली तेंव्हा कुठे गेली होती देव जाणे.. तिथेसुद्धा आव्हाढांना लगेच नंतर जेंव्हा कोरोना झाला तेंव्हा फडणवीसांनी त्यांची चौकशी करायला फोन केला तेंव्हा+
ही विकृती दिसलीच.. कट्टर भाजपाविरोधक ताटीयाची नेमणूक कायदेशीर सल्लागारसह प्रमुख म्हणून करणं, हे कशात मोडतं? अर्थात ह्याच परत काय झालं हे विचारण्याचा मला अधिकार नाहीच..
कदाचित दिलदार समर्थकांपेक्षा दगाबाज विरोधक प्रदेश भाजपाला जवळचे वाटत असावेत..
लाथा मारणाऱ्यांना प्रदेश भाजपा
जवळ का करते?
ह्या अश्या बाबतीतला 'मोदी-शहा'इझम ह्यांना कधी कळणारे?
विरोधकांना 'व्यवस्थित ओळखून' बांबू लावायचा असतो, त्यांना बांबूचे घर बनवायला मदत करायची नसते. हे प्रदेश भाजपाला आतातरी कळणारे? का परत "येरे माझ्या मागल्या?"
उद्धव नाही तर मग राजला घेणारच का? +
लाथ एका नवीन पॅकिंगमधून?
हे पोहोचणारे का वरपर्यंत? कि एक फुटकळ पोस्ट म्हणून नेहमीप्रमाणे दुर्लक्षिली जाणारे? देव जाणे.
कालच्या निवडणुकीत एका वृद्ध व्यक्तीचा कमळ कुठाय, मला कमळालाच मतदान करायचं आहे चा विडिओ वायरल झाला होता. ह्यावर बर्याचजणांनी प्रदेश भाजपवर तोंडसुख घेतलं होतं, कि राजकीय तडजोडी तळागाळार्यंत न्यायला ते कमी पडले. त्यांचं चूक कि बरोबर ह्यात मी पडणार नाही. पण (१/९)
अंतिम मत बनवायच्या आधी हा लेख वाचा..
ह्या एका व्हिडिओवरून जर जनरलायजेशन करायचं ठरवलं तर (अर्थात ते चुकीचं आहेच) जे भाजपसमर्थक आहेत ते काहीही झालं तरी कमळाला मतदान करणार हे सिद्ध होतं. म्हणजे काही झालं तरी भाजपमागे उभा असणारा हा वर्ग सुटणार नाहीच. कितीही प्रचार आणि (२/९)
प्रसार केला तरी एक असा वर्ग आहे ज्याला समकालीन राजकीय घडामोडींची फारशी कल्पना नसते. कमळ दिसलं कि बटन दाब, कुठलाही दुसरा विचार नाही करत. असे समर्थक प्रत्येक पक्षात असतात.
हा मुद्दा राष्ट्रवादी आणि शिवसेनेसंदर्भात वापरून बघू.
राज ठाकरे आणि भाजपमध्ये जे काही चाललं आहे त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे.. (अर्थात मी कोण?)
येन केन प्रकारेण "तो" आकडा मिळवण्यासाठी जे काही केलं जाईल त्याला माझी कसलीच ना नाही.. (अर्थात पुन्हा मी कोण?)
मोदी शहा आणि फडणवीस ह्यांच्या दूरदृष्टीबद्दल मलाच काय (१/७)
कोणालाही शंका असल्याचे कारण नाही. विरोधाला विरोध करायला गुलाम्स येतीलच पण ज्यांना त्यांचे मालकच मानत नाहीत त्यांच्याबद्दल मी पामराने काय बोलावे?
फक्त २०१९ हे वर्ष, जाहीर सभांमधून पातळी सोडून केलेली वक्तव्ये, "त्या" नेत्याच्या वैयक्तिक जीवनात त्याचे पडलेले प्रतिबिंब (२/७)
आणि त्याची झालेली जाहीर वाच्यता (पुत्राच्या लग्नाच्यासंबंधीचा किस्सा जगजाहीर आहे), भाजपच्या कार्यकर्त्यांना/समर्थकांना सोडू नका सारखी जाहीर आवाहने, ला वा री स आणि सोबतची सगळी कार्ड्स संपल्यावर अपहार्यतेतून हिंदुत्वाकडे वळलेली पावले ह्याकडे दुर्लक्ष करता येत नाही.. (३/७)
गुजरातच्या मार्गाने प्रदेश भाजपचा प्रवास सुरु आहे..
बऱ्याच जणांना भाजपमध्ये जो काही विरोधी पक्षातील नेत्यांचा प्रवेश सुरु आहे त्यावरून वाईट वाटतंय. विरोधीपक्षातले कार्यकर्ते आता कसं वाटतंय? म्हणत खिल्ली उडवण्यात समाधान शोधत आहेत, आत खोलवर झालेली (१/६)
जखम विसरायचा केविलवाणा प्रयत्न करत...
हे जे काही प्रदेश भाजपात सूरु आहे ते अगदी गुजरातच्याच मार्गाने सुरु आहे. गुजरातेत गेल्या वीस वर्षात भाजपा प्रबळ झाली आणि काँग्रेस दुर्बळ झाली ह्यामागे काँग्रेसला त्यांचे नेते टिकवता आले नाहीत हे जेवढे मोठे कारण आहे (२/६)
तेवढेच हे सगळे मोठे नेते भाजपात आले हेही आहे.
यादी पाहुयात..
१. शंकरसिंह वाघेला - काँग्रेस पाठिंब्यावरचे पूर्व मुख्यमंत्री (त्याआधीचे जनसंघी)
२. केशूभाई पटेल - काँग्रेस पाठिंब्यावरचे पूर्व मुख्यमंत्री (त्याआधीचे जनसंघी)
३. नरहरी अमीन - काँग्रेसचे नेते, पूर्व (३/६)
अश्यात राजकारणावर काही व्यक्त व्हायचं नाही असं ठरवलं होतं. अश्यात बातम्यासुद्धा बघत नाहीये. बघायच्या म्हटलं तरी ते प्रकरण बघवत नाहीये. पण आज पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आणि तळपायाची आग मस्तकात गेली. (१/१०)
जेवढे लाड अजित पवारांचे काकांनी केले नसतील तेवढे लाड फडणवीसांनी चालवले आहेत कि काय? अशी शंका यावी असे तमाशे राज्याच्या राजकारणात सुरु आहेत. मी भाजपसमर्थक आहे पण गुलाम नाही. जे पटत नाही ते बोलणारच. आता जे काही लिहितोय ते पक्षाच्या कट्टर कार्यकर्त्यांशी बोलून (२/१०)
लिहितोय. ते भयंकर अस्वस्थ आहेत.
पुण्यासाठी ११०० कोटी मंजूर झालेले अजित पवारांनी थांबवलेत. अजित पवारांना पुणं - पिंपरी चिंचवड किती आवडतं हे जगजाहीर आहे. जेंव्हा ते सत्तेत आले तेंव्हाच चर्चा सुरु झाली होती कि पवारांना पुण्याचं पालकमंत्रीपद मिळणार म्हणून. आतलं मन (३/१०)
सुरुवातीलाच सांगतोय, लेख खूप मोठाय.. वेळ घेऊन वाचा..
१ डिसेंबर २०१९ रोजी एक लेख लिहिला होता. (लेखाची लिंक पहिल्या कमेंटमध्ये). देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या दगाबाजीनंतर विरोधी पक्षनेता म्हणून जे भाषण केले होते त्यातले काही मुद्दे इथं परत मांडतोय.. (1/20)
१. विरोधी पक्ष वार करत असतात. जवळचा मित्र वार करतो तेंव्हा झालेली जखम तेवढ्या उघडपणे जगाला दाखवता येत नाही.. १०५ जागा येऊनसुद्धा सत्ता स्थापन करता आली नाही. कारण कोणी बाहेरचं नव्हतं तर घरातलंच होतं, तेही प्रचंड अव्यवहार्य.. ही भावना जेंव्हा जेंव्हा ते 'हरकत नाही' (2/20)
म्हणायचे तेंव्हा जाणवायचीच..
२. "मी परत येईन", ह्या त्यांच्या विधानावर अजून ठाम रहात येत्या काळातल्या सर्व शक्यतांसाठीची दारे खुली असल्याची ग्वाहीच दिली..
३. देवेंद्रजींचे भाषण सुरु असताना, छगनराव "मी पुन्हा येईन" तेवढं फक्त म्हणू नका जेंव्हा म्हणाले तेंव्हा, (3/20)
दादा भाजपात येणार... आता फक्त मुहूर्ताची वाट पाहणे शिल्लक..
दादा राष्ट्रवादीची संस्कृती धोक्यात आणत आहेत. दादा भाजपात येण्याच्या मार्गावर आहेत.. साधारणपणे भाजपच्या कोणत्याही नेत्याच्या विरोधात कोणी काही बोललं तर भाजपवाले शांत बसून ऐकून (१/६)
घेतात नाहीतर दुर्लक्ष करण्याचा मास्टरस्ट्रोक मारतात. पण अजितदादांनीसुद्धा तेच करावं?
काल श्रीकांत शिंदेंवर प्रश्न विचारताच पत्रकाराच्या कॅमेरावर संजय राऊत थुंकले..
ह्यावर अजितदादा म्हणाले, "आपली काही संस्कृती आहे, परंपरा आहे, हैचं भान सर्वांनी ठेवावं.."
ह्यावर (२/६)
संजय राऊत भडकले आणि "धरणात मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं" म्हणत दादांच्या तोंडावर शब्दशः थुंकले..
ह्यावर दादा म्हणतात, "ते काही बोलल्याने आम्हाला काही भोकं पडत नाहीत. ती मोठी माणसं आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो.."
अजितदादा जर भाजपचे असते तर आश्चर्य वाटलं नसतं कारण (३/६)