🔥वसुसेन🔥 Profile picture
Sep 27, 2020 14 tweets 8 min read Read on X
सर्वांनी नक्की‌ वाचा..
तुम्ही ऐकलच असेल की काल #Vodafone विरुद्ध भारत सरकार च्या केसचा निकाल आला आणि व्होडाफोनचे जवळपास 22,100 करोड रुपये वाचले.आज या धाग्यामध्ये आपण ती केस नक्की काय होती व आता सरकारने vodafone ला किती रुपये द्यायचे आहेत हे पाहुया..#म #मराठी #रिम Image
काल बातमी आली की Vodafone ने भारत सरकारविरुद्ध असलेली 22,100 करोड रू.ची केस आंतरराष्ट्रीय लवादामध्ये जिंकली.
सुरूवातीला एक संकल्पना स्पष्ट करू इच्छितो:-
'Capital gain and withholding tax‌' म्हणजे-
समजा तुम्ही 1 लाखाला सोनं खरेदी केल आणि भविष्यात तुम्ही ते 1.5 लाखाला विकत असचाल
तर जो 50 हजारचा अतिरिक्त लाभ तुम्हाला झालाय त्याच्यावरच्या कराला capital gain tax असे संबोधले जाते🙏
उदा.व्होडाफोनने 'हच' 50 करोडला खरेदी केले आणि हच ला capital gain झाल्यामुळे त्यांनी सरकारला 1 करोड tax द्यायचा आहे,तर व्होडाफोनने
ते 1 करोड सरकारला देऊन 49 करोड 'हच' ला द्यावेत,ते 1 करोड रुपये म्हणजे withholding tax(पुढे आपल्या वाचनात येईल,काळजीपूर्वक वाचा🙏)

आता विषय असा की 2007 साली व्होडाफोनने हच कंपनीतले 67% शेअर 11अब्ज डाॅलरला विकत घेतले.हच कंपनी सर्वांना माहितीच आहे ज्यांची जाहिरात खुप गाजली होती.. Image
ही खरेदी मे,2007 ला झाली व सप्टेंबर,2007 ला सरकारने व्होडाफोनला सांगितले की हच आणि तुमच्यात झालेल्या डिलमध्ये तुम्ही जो withholding tax भरायचा आहे(7990 करोड) तो त्वरित भरावा.सरकारच्या आदेशावर व्होडाफोन नाराज झाले आणि त्यांनी सांगितले की Income tax,1961 नुसार आम्ही सर्व प्रक्रिया Image
पार पाडलीय त्यामुळे आम्ही सरकारला कोणताही कर देणे लागत नाही.पण सरकारकडुन वाढत्या दबावामुळे शेवटी व्होडाफोनने मुंबई उच्च न्यायालयात मदतीसाठी याचिका दाखल केली.तिथे सरकारच्या बाजुने निकाल लागल्यामुळे व्होडाफोनने मदतीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.. Image
२०१२ साली ‌सर्वोच्च न्यायालयाने मुंबई
उच्च न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरवला व व्होडाफोनच्या बाजुने निकाल दिला.न्यायालयाने सांगितल की व्होडाफोनने कायद्याच्या अंतर्गत राहुन सगळ केल आहे तरी सरकारने पैश्यांची मागणी सोडावी..आता इथुन पुढे खर्या घटना घडायला सुरुवात झाली..😉😉🙏🙏 Image
२०१२ साली सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यावर तेव्हाचे अर्थमंत्री श्री.प्रणब मुखर्जी यांनी income tax,1961 मध्ये 'retrospectively' बदल करत असल्याची घोषणा केली.. retrospectively म्हणजे तुम्ही 2012 मध्ये असुनसुद्धा 1961 च्या कायद्यात बदल करू शकताय.आणि त्यांनी तसा बदल केला.. Image
ह्या बदलामुळे व्होडाफोनकडे भारत सरकार परत पैसे मागु शकत होते.जगभरातुन या नवीन कायद्याची मोठ्या प्रमाणात निंदा झाली.थोडक्यात काय की तुम्ही परिक्षेची तयारी करताय आणि परिक्षेला बसल्या बसल्या तुम्हाला समजले की अचानक syllabus बदलुन paper set केलाय..त्यातला हा प्रकार😉🙏😬😬..
त्यानंतर 2014 साली भाजप सरकार आले आणि त्यांनी निवडुन येताना जनतेला जशी आश्र्वासनं दिली होती तशीच कंपनीला आश्वासन दिले होते की आम्ही निवडुन आलो तर तुमची केस बंद करू इ.
पण व्हायच तेच झाल..भाजपाचं आश्वासन पोकळ निघाल आणि त्यांनी केस चालुच ठेवली.. Image
आता व्होडाफोनने त्यांचे फासे टाकायला सुरू केले..6 नोव्हे,1995 मध्ये भारत आणि नेदरलँड या दोन देशांमध्ये Bilateral Investment Treaty(BIT) नावाचा एक करार झाला होता ज्यात दोन्ही देशांमधील व्यवसाय,उद्योगधंदे व गुंतवणूक वाढावी म्हणुन वेगवेगळ्या गोष्टी मान्य करण्यात आल्या होत्या. Image
त्या करारात 'clause 9' नुसार कंपनीला जर सरकारच्या उद्दिष्टांचा फटका बसत असेल तर ती कंपनी 'Permanent Court of Arbitration' जी की 'हेग नेदरलँड' ला स्थित आहे या न्यायालयात याचिका दाखल करू शकत होती.त्याप्रमाणे मी वर सांगितले तसे काल या केसचा निकाल व्होडाफोनच्या बाजुने लागलाय व Image
लवादाच्या म्हणण्यानुसार भारत सरकारने कायद्यात जो Retrospective बदल केला होता तो अयोग्य असुन सरकारनेच व्होडाफोनला कोर्टकचेरीचा खर्च म्हणुन '40 करोड' रूपये द्यायचे आहेत🙏🙏..
#म #मराठी #रिम #Vodafone #VodafoneIdea #BJP #ModiGovernment #Congress #Netherlands #SupremeCourtOfIndia

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with 🔥वसुसेन🔥

🔥वसुसेन🔥 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Mrutyyunjay

Mar 16
Electoral bond बद्दल तत्कालिन अर्थमंत्री स्व.अरूण जेटली नी 2017 च्या अर्थसंकल्पात प्रथम उल्लेख केला.ज्यावेळी वेंकटेश नायक या RTI कार्यकर्त्याने(Right To Information, 2005)याबद्दल विचारणा केली होती तेव्हा अर्थ मंत्रालय,निवडणूक आयोग व रिझर्व बँक ऑफ इंडिया ने आम्हाला
#ElectoralBond Image
Electoral Bond बद्दल कोणतीही कल्पना नव्हती अस सांगितलं.
Electoral bond आणण्याच्या आधी सरकारने निवडणूक संदर्भातील, उत्पन्न कर संदर्भातील आणि RBI संबंधित असणार्या कायद्यामधी बदल केला आणि मग electoral bond आणला. सुरुवातीला सरकारने मोठ मोठ्या बाता मारत देशाला सांगितले होते की Image
आम्ही electoral bond आणण्यापूर्वी सगळ्या समभागधारकांशी, निवडणूक आयोगाशी तसेच रिझर्व्ह बँकेसोबत चर्चा करू आणि मगच आणु परंतु आपल्या नेहमीच्या हेकेखोर स्वभावाला जागुन सरकार कोणाशीही कसलीच चर्चा न करता electoral bond घेऊन आले.
बर..या विषयाच्या खोलात जाण्यासाठी RTI कार्यकर्ते नायक Image
Read 19 tweets
Sep 24, 2023
आपल्या घरातील गणपतीवर विश्वास ठेवा!

'घरातल्या आणि घरी आणून पूजलेल्या गणपतीला कमी लेखून दुसरे "राजे" पुजायला जाऊ नका.

वाचा आणि सहमत असाल तर अंमलात आणा.

घरात गणपतीची मूर्ती किंवा फोटो नाही असं आस्तिकाचं एकही घर सापडायचं नाही. पण गणपती जवळ आले की त्या घरातल्या मूर्तीवरचा Image
विश्वास उडतो का काय होतं माहित नाही. पण घरातली मंडळी पहाटे उठून, वशिले लावून, व्हीआयपी दर्शनासाठी पैसे मोजून वगैरे xxxचा राजा, तमुक बादशहा, अमुक सम्राट गणपतीच्या दर्शनाला जातात. का तर म्हणे तो जागरूक आहे.

घरातला गणपती जागरूक नाही.....???

अहो, गणपती म्हणजे देव एकच असतो.
जागरूक, निद्रिस्त वगैरे प्रकार का मानता तुम्ही......???

तो एकच आहे. तुमची श्रद्धाही एक असू द्या. जागरूक म्हणून स्पेशल श्रद्धा, घरातला निद्रिस्त म्हणून त्यावरची श्रद्धा गुंडाळायची असं करू नका.

बहुसंख्य मंडळी घरात चांगली मूर्ती आणतात, मनोभावे पूजाअर्चा, आरत्या, नैवेद्य
Read 7 tweets
Sep 18, 2023
म्हातारीचा चौदावा झाला आणि पोरानं घराला मोठा टाळा लावून म्हाताऱ्याला एस.टीत घालून कायमचा शहराकडे आणला. पण उभं आयुष्य रानामाळात गेल्यानं त्याच मन काही इथे रमत नाही. तो खुर्चीत बसून गरगर फिरणाऱ्या पंख्याकडं नुसता एकटक बघत राहतो. जगून झालेल्या आयुष्यावर विचार करत Image
सकाळी पाच वाजता
उठून अंथरुणात बसून राहतो. आतील नळाला पाण्याचा आवाज आला की बादलीभर थंड पाणी रापलेल्या देहावर मारून घेतो. तसा तो सहा पासूनच चहाची वाट पाहत बाहेरच्या हॉल मधे टांगलेल्या घड्याळाकडे बघत बसून असतो, आतल्या बेडरुमचा दरवाचा उघडण्याची वाट बघत कित्येक वेळा तो हलणाऱ्या
मानेने आत डोकावूनही
बघतो. मग एके काळी भल्या पहाटे बाहेरच्या चुलीवर म्हातारीने चहासाठी ठेवलेलं जर्मनचं पातेलं त्याच्या डोळ्यासमोर दिसू लागतं दहा वाजता सुनेनं कपातून दिलेला चहा थरथरत्या हाताने घश्यात ओतून तो धोतर सावरत जिन्याच्या पायऱ्या उतरुन सोसायटीच्या गार्डन मध्ये थकलेल्या Image
Read 9 tweets
Aug 27, 2023
येणार्या दोन दिवसात अदाणी ग्रुपला एकतर अप्पर किंवा लोवर सर्कीट लागेल कारण २९ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाचा अदाणी संदर्भात निर्णय येणार आहे.
या थ्रेडमध्ये आपण
जाॅर्ज सोरोस कोण आहेत?
OCCRP म्हणजे काय?
SEBI ने सर्वोच्च न्यायालयात जमा केलेला अदाणी रिपोर्ट काय आहे?
'हिंडनबर्ग 2.0'? Image
ज्यावेळी 24 जानेवारीला 'हिंडनबर्ग'ने अदाणी ग्रुपचा रिपोर्ट बाहेर काढला होता तेव्हा अदाणी ग्रुपमध्ये काय धुर्रळा झाला ते सगळ्या जगाने पाहिले होते. कंपनी एव्हढी कोसळली की आजतागायत अदाणी ग्रुपला उभारी घेता आलेली नाहीय..
तर ज्यावेळी हिंडनबर्गने रिपोर्ट बाहेर काढला त्यावेळी 'जाॅर्ज Image
सोरोस' ही ९३ वर्षीय व्यक्ती पुन्हा प्रकाशात आली.
सोरोस यांच्याबद्दल सांगायचच तर मार्केटमध्ये ते Short seller म्हणुन प्रचलीत आहेत आणि त्यांना 'The man who broke the Bank Of England' म्हणुन ओळखले जाते. 16 सप्टेंबर, 1992 साली युनायटेड किंग्डमचे चलन(पाऊंड स्टर्लिंग) कोसळत असताना Image
Read 13 tweets
Aug 25, 2023
आयुष्याच्या एका वळणावर आपल्यालाच जाणवायला चालु होत की "माझा मार्ग चुकलाय का? नेमकं काय चुकतय माझ्याकडुन? मलाच का वेळ लागतोय? मला हवय ते मिळेल का नाही??"
या विचारांनी तुम्ही एव्हढे त्रस्त होता की तुम्हाला झोप लागत नाही. रात्रभर विचार करत निपचित पडुन राहण्याची इच्छा होते तर पहाटे Image
आवर्जून जाग येते, आणि जेव्हा भल्या पहाटे जाग येते तेव्हा या नकारात्मक विचारांचे चक्र पुन्हा फिरायला चालु होते. अस वाटत की 'राव, आपल्याला आपल शरीर हे विचार येण्यासाठी मुद्दाम झोपेतुन उठवतय, रातभरपण झोपुन देत नाही..'
शेवटी आपल्या मनाची घालमेल व्हायला चालु होते, आपलं कशातच मन लागत
नाही. शांत शांत बसुन राहायला आवडत, संवाद साधण्याची इच्छा मरायला चालु होते, आपल्या लोकांसोबतही बोलणं जीवावर येत आपल्या..
अस वाटत सगळ सोडुन निघुन जावं कुठतरी शांत ठिकाणी..डोकं जड होत, मन गहिवरून येत..डोळे पाणावतात. असह्य व्हायला चालु होत सगळं..त्यात मनाच्या जखमेवरची खपली खपकन
Read 9 tweets
Aug 8, 2023
छपरी हार्पिक दांड्याने तिलकचा फोकस हालवायचा प्रयत्न केला. तिलक 44 वर असताना बिनाकामाचं 'तुला नाॅट आऊट राहायच आहे' असली बडबड करून पांड्यानं त्याचा बॅट फ्लो थांबवला.
पांड्या स्वतः स्ट्राईकवर आल्यावर हागरा शाॅट मारून हिरो बनण्याचा प्रयत्न करायला गेला पण त्याचं नशीब चांगलं त्याचा Image
कॅच सुटला.
पुन्हा तिलक स्ट्राईकवर आल्यावर त्याने १ रन काढुन हार्पिकला स्ट्राईकवर आणलं आणि पुन्हा एकदा हार्पिकने हागरा शाॅट मारून हिरो बनण्याचा असफल प्रयत्न केला. स्वताला स्ट्राईक पाहिजे म्हणुन हातात असणार्या बाॅलवर तिलकला २ धावा काढण्यासाठी बोंबलायला लागला. तो हाच पांड्या होता जो
२ बाॅलपुर्वी तिलकला नाॅट आऊट राहण्याबद्दल ज्ञान पाजळत होता.
शेवटी तिलकने लायकी नसलेल्या हार्पिक दांड्याला विचारलं की "मी काय करू?? एक काढू का मोठा शाॅट मारु?" यावर निर्लज्ज हार्पिक त्याला म्हणतोय "तुला काय करायचं ते कर"..
शेवटी २० वर्षीय तिलकने वयापेक्षा जास्त प्रगल्भता दाखवुन
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(