हातरस येथील घटना गंभीर आणि दुर्मिळ असली तरीही या घटनेवरून केवळ योगी,यूपी,बीजेपी यांना पाहून आगपाखड आणि विरोध करणाऱ्यांनी ध्यानात घ्या..
थोर संतांचा वारसा लाभलेल्या याच पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात विहिरीत पोहायला गेले म्हणून खालच्या जातीतल्या
मुलांना नागडं करून ढुंगणावर बसवलं होतं तापलेल्या फरशीवर, मजुरी वाढवून मागितली म्हणून आईशी संभोग कर किंवा विष्ठा खा हे प्रकरण सुद्धा इथंच घडलंय..
नितीन आगे या विद्यार्थ्यांच्या हत्येप्रकरणात रयत शिक्षण संस्थेतील शिक्षकांनीं जबानी फिरवली,
याच पुरोगामी महाराष्ट्रात खैरलांजीत निर्दोष सुटणाऱ्यांची मिरवणूक काढली, प्रियांका,सुरेखा या भगिनींवर बलात्कार होताना किमान अडवण्याची आणि त्यांची अब्रू झाकण्यासाठी कपडा टाकण्याची हिंमत कुणा महिलेत झाली नाही,
कोवळ्या स्वप्नील सोनवणे ला जीवानिशी मारहाण करताना कुणी आडवं आलं नाही, ना दंगलीशी ना द्वेषपुर्ण लिखाणाशी संबंध तरीही मोहसीन नावाच्या निष्पापाचा खून झाला, रमाबाई नगरातील निरपराध असणाऱ्यांवर गोळीबार करूनही मोकाट असलेला मनोहर कदम आणि
त्याला पाठीशी घालणारे राजकारणी ही याच महाराष्ट्राच्या मातीतले..
नालासोपारा इथं दारूगोळा सापडला तरिही आरोपीच्या समर्थनार्थ मोर्चा काढणारे याच महाराष्ट्रातले..
भीमा कोरेगावस्मारकाला वंदन करायला जाणाऱ्या निरपराध लहान लेकरं, महिला आणि वृद्धांवर त्यांच्या गाडीवर दगडफेक करणारे,
त्यांनी उपाशी रहावं, पाणी ही मिळू नये म्हणून बंद पाळणारे ही याच महाराष्ट्राच्या मातीतले....
आणि अगदी नुकताच प्रेमप्रकरणापायी जातीयतेचा बळी ठरलेला विराज जगताप ही याच महाराष्ट्राच्या मातीतला..
सगळं लिहण्याचं कारण एवढंच की सिलेक्टिव्ह भूमिकेत नसावं माणसानं..🖋️नितेश शेलार
झुंड सिनेमा फक्त झोपडपट्टी आणि फुटबॉलवर नाहीये. तर जातीय विषमतेचे बळी गेलेल्या समुहाचा आंतरिक संघर्ष आहे. फुटबॉल फक्त एक रुपक आहे जे इथे समान संधीच्या निमित्ताने दाखवलं. झुंड मधे संधी नाकारणे ते संधी मिळणे यामधला जो प्रवास आहे तो वर्णित करण्याचा प्रयत्न केला आहे.
काही दिवसांपूर्वी कोविडच्या प्रभावात आॅनलाईन शिक्षणाचा फार्स आला मोबाईल असणं गरजेचं पडलं विद्यार्थ्यांना. किती शोषित मागास विद्यार्थ्यांना मोबाईल व डेटा मिळु शकला ? कितीना आॅनलाईन शिकता आलं ?
आॅनलाईन शिक्षण मोफत केलं तरी मोबाईल व डेटाची पुर्व अट करणं पण हजारो विद्यार्थ्यांना शक्य होतं का ? त्यात छोटं घर, घरातली किलबिल, किंवा ग्रामीण भागातील दुरावस्था मन आॅनलाईन अभ्यासात लागणं कितपत शक्य होतं ?
झुंड... या चित्रपटातील प्रमुख पात्र आहे भिंत! एक अशी भिंत जी लोकांना विभागते. त्या भिंतीला असलेला एक लोखंडी दरवाजा आणि तिथे असलेलं एक कुलूप हा या कहाणीचा आत्मा आहे... बाकी कथा, पात्र, अभिनय ही सगळी माध्यमं आहेत!
ही भिंत प्रातिनिधिक स्वरूपात असली तरी चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेममध्ये नागराजने अशी एक वेगळी भिंत दाखवली आहे आणि त्या प्रत्येक भिंतीच्या दरवाजावर लावलेलं कुलूप त्याला तोडायचं आहे आणि शेवटी ती भिंतच उध्वस्त करायची आहे जी समाजाला कोणत्याही दोन गोष्टीत विभागाते!
फोटो:
सोसायटीच्या भिंतीच्या बाजुला ही झोपडपट्टी आहे. हा लहान मुलगा रोज दिसतो, त्याचं नाव 'शेरू' आहे... काहीतरी लिहीत बसलेला असतो. पाठीमागे 'स्मार्ट सिटी' असं लिहीलेला दगड आहे!
#गुरूवर्य_कृष्णाजी_केळुस्कर_जयंती.
गुरूवर्य कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांचा जन्म कोकणातील वेंगुर्ले तालुक्यातील केळूस येथे दि.२० आॅगस्ट १८६० रोजी झाला.त्यांचे पूर्वज लष्करात होते.त्यांचे प्राथमिक शिक्षण सावंतवाडीत झाले.
१८८१ ते १९२५ पर्यंत त्यानी विल्सन हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नौकरी केली.त्यानी संत तुकाराम, गौतमबुध्द, शिवाजी महाराज,गुणाजी घुले,एल्लपा बाळाराम आदी चरित्रग्रंथ लिहिले.महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीत त्यानी काम केले.ते नेहमीच डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभे राहिले.
१९०७ साली भीमराव आंबेडकर जेंव्हा मॅट्रिकची परीक्षा पास झाले तेंव्हा त्यानी रावबहाद्दर सी.के.बोले यांच्या समवेत भीमरावांच्या बी.आय.टी.च्या चाळीतील घरी जाऊन भीमरावाचे अभिनंदन केले.इतकेच नव्हे तर अस्पृश्यातील पहिला मॅट्रिक पास विद्यार्थी म्हणून बोले यांच्या अध्यक्षतेखाली भीमरावांचा
बरं झालं अफगाणिस्तान सारखी परिस्थिती नाही म्हणून धन्यता मानणाऱ्यांनो ही परिस्थिती त्याच दिशेने चालली. अफगाणिस्तान किंवा सिरीया बनायला जे लागतं तेच ब्राम्हणवादी मोदींच्या नेतृत्वात तुमच्या झोळीत देत आहे. शिक्षण व्यवस्था उध्वस्त करणे, नंतर बेरोजगारी वाढवणे,
महागाई आणि जीवनावश्यक वस्तू आवाक्याबाहेर बाहेर, सामाजिक सुरक्षा नाकारणे, न्याय व्यवस्था जटिल शक्यतो तो न्याय नाकारणारी बनवने म्हणजे नागरिक भुक, बेरोजगारी, दारिद्र्य, असुरक्षित जीवन, नाकारलेले न्यायाची सुड भावना किंवा आत्मरक्षण वाट्टेल त्या कारणाने हिंस्रक बनतील. टोळ्या बनवतील.
पोटाला मारायची व्यवस्था बनली की सामान्य लोकांचा विवेक आपोआप मरतो. संयम, शांतता, सृजनशीलता मेंदुत नाही तर पोटाच्या आताड्यातुन येते. जेवढी भुक, भाकरीची असुरक्षितता तेवढा व्यक्ती चिडखोर बनतो. न्यायाची, जगण्याची व्याख्या परिस्थिती सापेक्ष बदलली जाते.
1)खोले नावाच्या ब्राम्हण बाईने मराठा समाजातील महिलेवर जात लपवून खोले बाईच्या घरी स्वयंपाक केला म्हणून पोलिस केस तरीही ब्राम्हण द्वेष करु नका. 2) कुणबट संसदेत जाऊन नांगर हाकणार आहेत का? असे बाळ टिळक अथणीच्या सभेत बोलले. ब्राम्हण द्वेष करु नका.
3) सावित्रीमाईवर दगड आणि चिखलाचा मारा करणारे, क्रांतीबा फुले यांना वरातीतुन हाकलणारे जरी ब्राम्हण होते तरीही ब्राम्हण द्वेष करु नका. 4) स्त्री, अस्पृश्य यांच्यावर अन्याय करणारा मनुस्मृती या ग्रंथाचे नाव पुण्यातील ब्राम्हणाच्या घराला दिले जाते. ब्राम्हण द्वेष करु नका.
5) शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकात डाव्या पायाच्या अंगठ्याने राजतिलक गागो भट्टाने पैसे घेऊन केला होता. ब्राम्हण द्वेष करु नका . 6) शाहू छत्रपतींना आयुष्यभर त्रास ब्राम्हणांची दिला तरीही ब्राम्हण द्वेषाचा अतिरेक करु नका.
पाणिपत मराठ्यांचे झाले आणि अटकेपार झेंडे पेशव्याने लावले.फासावर भगतसिंग,सुखदेव,राजगुरु गेले आणि माफीवीर, स्वांतंत्र्यवीर बनले. शिवरायांवर तलवार चालवली ती कृष्णाजी भास्कर ने पण तो कृष्णाजी कुलकर्णी होता हे लपवले जाते.
शिवराय व रामदास गोसाव्याची कधी भेटच झाली नसताना शिवरायांचे गुरु बनवण्याचा हरामीपणा केला जातो. शिवरायांच्या सर्व लढाया केवळ राज्यविस्तार करण्यासाठीच होत्या पण त्याला हिंदु मुस्लिम जातधर्मिय तेढ बनवले गेले.
शिवरायांच्या हातात देवी तलवार देते आणि यवनांचा नाश करायला सांगते असाही खोटे लिहीले जाते. यशवंत घोरपडे यांच्या नावाची वाट लावली जाते आणि घोरपडीला नाव यशवंती देऊन दोरखंड घोरपड घेऊन कडा चढुन जाते असे पण लिहीले जाते.