करून पोलीस बोलवून अपमानित केले.
देशपांडे यांना दुकानदाराने आणि पोलिसांनी दुकानाच्या बाहेर काढले म्हणून आज सायंकाळ ५ वाजल्यापासून दुकानासमोर ठिय्या मांडून बसल्या आहेत...
पोलिसांनी अपमानित केले म्हणून मुंबई पोलीस आयुक्त स्वतः जो पर्यंत येत नाहीत,आणि दुकानदार परवाना दाखवत नाही तो 👇
पर्यंत इथून हलणार नाही अशी त्यांची भूमिका आहे, त्या पोलिसांचे देखील ऐकण्यास तयार नाहीत, मराठी एकीकरण समिती संघटनेचे काही मराठी शिलेदार यांनी देखील घटनास्थळी जाऊन उपस्थित राहून ही बाब समजून घेतली, पोलिसात तक्रार दाखल करू असे समजावले परंतु त्यांचा पोलिसांवर विश्वास नाही आणि मी 👇
इथून हलणारच नाही यावर त्या ठाम असून ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत...
रात्रीचे १२ वाजले आहेत अजूनही त्या याच जागी आहेत.
७५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या शोभा देशपांडे विना अन्नपाण्याच्या त्याठिकाणी आंदोलन करत आहेत.
शोभा देशपांडे एक लेखिका आहेत, मराठी प्रेमी आहेत आणि मराठीचा नेहमी आग्रह 👇
करत असतात, त्यातुनच सदर दुकानाच्या गुजराती मालकासोबत त्यांचे खटके उडाले, आणि मराठी माणसाचा अपमान केला गेला म्हणून आंदोलन करतेय असे त्यांचे म्हणणे आहे.