अभक्त - अशक्य आहे, मोदी पंतप्रधान आवास सोडून इथे कशाला येतील...भ भ भूत तर नाही ना?
मोदी - मित्रा, मी हल्ली इथेच असतो...
अभक्त - ई ई इथे म्हणजे कुठे...?
मोदी - इथे म्हणजे तुझ्या डोक्यात...!(1/8)
अभक्त - नाही नाही हे कसं शक्य आहे, माझ्या डोक्यात केमिकल लोचा नाही, मी वेडा नाही, मी वेडा नाही...
मोदी - तू वेडा मुळीच नाही, पण तुझ्या मनन, चिंतन, लेखन, वदन यात सतत मीच असतो, त्यामुळे मी तुला सर्वत्र दिसतो...
अभक्त - अरे देवा, मग यावर उपाय काय...?
मोदी - फार सोपा उपाय आहे, (1/2)
तू तुझा अमूल्य वेळ, तुझी सारी क्रयशक्ती माझ्यावर खर्च करतो आहे...
माझं राजकारणात काय बरं वाईट व्हायचं ते होऊ दे, पण तू पहिले स्वतःचा विचार कर...
माझा विकास गंडवणाराअसेल किंवा नसेल, ते लोक ठरवतील, पण तू तुझी प्रगती कशी होईल याचा विचार कर...
मी किती वाईट आहे हे सांगत असताना तू (3)
लोकांपुढे सक्षम पर्याय उभा कर. दुसरा कसा चांगला आहे, हे लोकांना पटवून दे. माझे समर्थक तर माझा प्रचार करतातच, पण तुझ्यासारखे विरोधकही अप्रत्यक्षपणे माझाच प्रचार करतात...
अभक्त - मी कुठे तुमचा प्रचार करतो, मी तर तुमच्यावर प्रचंड टीका करतो...
मोदी - कुणी माझी प्रशंसा करो वा निंदा, 4
पण सर्व प्रसार माध्यमांमधील चर्चा, फेसबुक पोस्ट्स, कमेंट ट्रोल्स, ब्लॉग्ज, वर्तमानपत्र यात केंद्रबिंदू कोण असत...?
अभक्त - मोदी...म्हणजे तुम्ही!!
मोदी - मित्रा, राजकारणात एनी पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी म्हटल्या जाते. मला सोनियाबाईंनी "मौत का सौदागर" म्हटले होते,(1/5)
त्याचा फायदा कुणाला झाला...?
अभक्त - मोदींना, म्हणजे तुम्हाला...!
मोदी - तू दिवसभर किती पोस्ट टाकतोस...?
अभक्त - दहा ते बारा...!
मोदी - कुणाबद्दल टाकतोस...?
अभक्त - तुमच्याच विरोधात...!
मोदी - तुझ्या आवडत्या नेत्याच्या समर्थनार्थ किती पोस्ट्स टाकतोस...?
अभक्त - एकही नाही...!(6)
मोदी - मग ज्या वर्गात माझ्याखेरीज अन्य कुणी विद्यार्थीच नाही, तिथे मी पास झालो अथवा फेल झालो, काय फरक पडतो...?
अभक्त - काहीच नाही...!
मोदी - मग माझ्या समर्थकांपेक्षा मला अधिक फायदा कुणाचा होतो...?
अभक्त - विरोधकांचा म्हणजे आमचा...!
मोदी - मग अशाने दिवसेंदिवस अधिक बलशाली कोण होत
जाईल...?
अभक्त - तुम्हीच...!
मोदी - मग लोक कर्मदरिद्री कुणाला म्हणतील...?
अभक्त - आम्हाला आय मीन तुमच्या विरोधकांना...!
मोदी - मग मनोरुग्ण किंवा नमोरुग्ण होऊन माझा द्वेष करण्यापेक्षा माझे राजकीय विरोधक होणे योग्य नाही का...?
अभक्त - पण मला उठता, बसता, खाता-पिता, दिवसरात्र तुम्हीच
दिसता, यावर उपाय काय...?
मोदी - स्वतःमधील नकारात्मकता सोडून सकारात्मक विचार करणे. मोदी किती वाईट आहे, हे सांगण्यात सर्व ऊर्जा दवडण्यापेक्षा मी कसा चांगला आहे किंवा होऊ शकेल याचे चिंतन करणे...
अभक्त - धन्यवाद मोदीजी, तुम्ही माझे डोळे उघडले. आता मी तुमचीच भक्ती करणार...!
मोदी - हा हा हा गेट वेल सून मामू!!
तुला तसे करायची गरजच नाही, फक्त स्वतःवर, स्वतःच्या पक्ष्यावर, स्वतःच्या नेत्यावर विश्वास ठेव...
अभक्त - हो हो पण तुम्ही मला दिसता हे गुपित कुणाला सांगू नका हं प्लिज!!
हॅलो...मोदीजी...हॅलो...कुठे गायब झालात...??
*(मी तुझ्या डोक्यातच आहे मित्रा,😂
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
ह्या एवढ्या थापा मारल्या होत्या उध्वस्त साहेबांनी निवडणूका च्या वेळेस बघा यातून कोणी लाभार्थी आहेत काय तर.
1)प्रत्येक जिल्ह्यात 10 रुपयांत थाळी देणारे कॅन्टीन उभारणार
2)1000 भोजनालयं बनवणार त्यात 10 रुपयांत उत्तम भोजन
3)शेतकऱ्यांसाठी दरवर्षी दहा हजार रूपयांची योजना
4)एका रुपयात 200 पेक्षा अधिक आजारांवर आरोग्य चाचणी
5)आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण विनामूल्य करणार
6)मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री शहर सडक योजना
7)15 लाख पदवीधर युवकांना 'युवा सरकार फेले अंतर्गत शिष्यवृत्तीची संधी देणार
8)शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार
9)प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय 10)महाविद्यालयासह सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार
11)ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी अनेक योजना
12)घरगुती वीजदर कमी 30टक्क्यांपर्यंत कमी करणार
13)शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार