ऑगस्ट १९९७ मध्ये प्रणती डेका या उल्फा दहशतवादी महिलेला अटक झाली. ती मुंबईत प्रसूतीसाठी आली होती तिच्या दोन साथीदारांसह. तिची इथली सर्व व्यवस्था केली होती टाटा टी ने. मग नंतर आसामच्या चहा मळ्यांमध्ये आपला व्यवसाय सुरळीत सुरू रहावा म्हणून टाटा टी व्यवस्थापन उल्फाला कशी मदत करतं
ही माहिती पुढे आली. फारसा गाजावाजा न होता प्रकरण दडपले गेले. नंतर अण्णांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या वेळी याच टाटा टी ने एक सामाजिक मोहीम चालवली - जागो रे. टीव्हीवर भ्रष्टाचाराच्या विरोधात त्वेषाने उभे राहणारे तरुण यात चित्रित केले होते. फायदा कुणाला झाला?
टाटा ला सिंगूर मध्ये नॅनो साठी मिळालेल्या जागेवर वाद सुरू झाला आणि ममता बॅनर्जी यांनी मोठं आंदोलन उभं केलं स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी. गुजरातचे तेव्हाचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक फोन कॉल केला आणि टाटांनी आपला प्रकल्प सानंद येथे नेला. केवळ धंदा सांभाळायचं
उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून. गुजरातमधील जमीन फुकट होती, सिंगुरमध्ये शेतकरी वाजवी मोबदला मागत होते. मुंबईत करोनाची साथ सुरू झाली तेव्हा टाटांनी ताज हॉटेल पालिकेच्या डॉक्टरांसाठी खुलं केलं म्हणून आपण भारावून गेलो. प्रत्यक्ष तिथे राहणाऱ्या डॉक्टरांचे अनुभव वेगळे आहेत.
इतर हॉटेल्समध्ये त्यांना मिळालेली वागणूक आणि ताज मधली वागणूक यात खूप फरक होता. बरं, ही हॉटेल्स फुकट वगैरे काही नव्हती. सरकारने नेमून दिलेले दर ताज ने घेतलेच. सारांश: टाटा धंदा करतात. Tanishk च्या वादानंतर कुणाचीही बाजू घेण्याआधी विचार करा. आपल्या भावना कुणालाही वापरू देऊ नका.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
गो रा खैरनार नाव आठवत नसेल बऱ्याच जणांना. मुंबईचे Demolition Man म्हणून ओळखले जात १९९० च्या काळात. टीव्ही चॅनल्स तेव्हा अमाप नव्हती, तरीही त्यांना मराठी आणि इंग्रजी वर्तमानपत्रात बरंच कव्हरेज मिळत असे. त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते आणि आता नेमकं कसं ते आठवत नाही,
पण अचानक खैरनारांची गाडी शरद पवारांवर घसरली. मुंडे विरोधी पक्षाचा आवाज होते. दोघांनी पवारांच्या विरोधात मोठी मोहीम उघडली. एका मुलाखतीत पवारांच्या विरोधात ट्रक भर पुरावे आहेत असं खैरनार यांनी जाहीर केलं. पवार खैरनार यांच्या आरोपांना अजिबात उत्तर देत नसत. ती त्यांची पद्धत आहे.
आताही त्यांनी उद्धव ठाकरे यांना तोच सल्ला दिलेला दिसतो आहे - वेड्या चाळ्यांकडे दुर्लक्ष करा. पवार मान्य करणार नाहीत पण आधी खैरनार, मग मुंडे आणि नंतर अण्णा हजारे यांनी त्यांच्या प्रतिमेची पुरती वाट लावली. यात छुप्या शक्ती होत्याच पण बेछूट आरोपांची दखल वेळीच घेतली नाही तर काय होतं
अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल, किरण बेदी यांच्या सोबत दिल्लीत उपोषण सुरू केलं तेव्हा तिघे मोठे नेते बनले होते. दिल्लीतल्या हिंदी चॅनल्स ना त्यांच्यात महात्मा गांधी दिसू लागले होते. आपली मराठी चॅनल्स सुद्धा प्रेमात होती. खरं तर या सगळ्या गोष्टींच्या मागे फक्त आणि फक्त..
काँग्रेस द्वेष होता. (नंतर विवेकानंद फाऊंडेशन ने हे सगळं पद्धतशीर कसं रचलं ते आलंच.) पण त्यावेळचे अण्णा आणि केजरीवाल यांचे सगळे मुद्दे आठवून पाहा आणि त्या मुद्द्यांचा त्यांनी किती पाठपुरावा केला ते पहा. 2जी घोटाळा कोर्टात उडाला. लोकपाल अण्णा स्वतःच विसरले. एकछत्री नेतृत्व हवं
म्हणून केजरीवाल यांनी अनेक लोकांना बाजूला सारलं. सुरुवातीच्या काळात काँग्रेसवर जोमाने आरोप करणाऱ्या केजरीवाल यांनी भाजप वर तेव्हाही नाम मात्र हल्ले केले आणि आजही तेच सुरू आहे. जर काँग्रेसला आपणच खरोखर पर्याय आहोत असं आपला वाटत असेल तर त्यांनी भाजपचा आणि
पी ए संगमा यांनी पक्ष सोडला नव्हता. सोनिया गांधी बाहेर होत्या. तेव्हाची गोष्ट आहे. मुंबईतल्या हॉटेलमध्ये निवांत गप्पा सुरू होत्या. अपरिहार्यपणे सोनिया गांधी यांचा विषय निघाला. गांधी परिवार नसेल तर पक्षाला अर्थ नाही असा त्यांचा सूर होता. पक्ष प्रत्येक गावात आहे, पण एक चेहरा हवा..
..तो नाहीये त्यामुळे पक्ष मार खातो आहे असं त्यांचं म्हणणं होतं. दिल्ली/गल्लीतल्या सगळ्या नेत्यांनी लोटांगण घालून झालं आहे, पण त्या ठाम आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. काही वर्षात काळ बदलला आणि संगमा यांनी पक्षही बदलला. ज्या सोनिया गांधी यांनी पक्षात यावं म्हणून...
काँग्रेस नेत्यांनी साकडं घातलं होतं त्यातले बरेच नंतर त्याच नेतृत्वावर आक्षेप घेऊन पक्ष सोडून निघून गेले. त्यात संगमादेखील होते. काँग्रेसमध्ये ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. तुम्ही इतिहास काढून बघा. आणि त्यात फक्त नेहरू - गांधी परिवार केंद्रस्थानी असतो असं काही नाही.