आल्फ्रेड पार्क मध्ये ब्रिटीश पोलिसांनी घेरले असतांना चंद्रशेखर आझाद पिस्तुलाने शर्थीचा प्रतिकार करत होते. असहाय्यता लक्षात घेऊन त्यांनी ब्रिटीशांना शरण न जाता स्वतःवर गोळी झाडून घेत या महान क्रांतीकारकाने आपले आयुष्य संपवले.
त्यांच्या खिशात त्यावेळी ३००० रुपयांचा हिशोब लिहिलेली डायरी आणि उर्वरित ४७२ रु रोख सापडले. ते पैसे नेहरूंनी दिलेले होते.
नेहरूंनी कॉंग्रेस अंतर्गत ‘नवजवान सभा’ स्थापन केलेली होती. त्या माध्यमातून पंडित नेहरू भारतीय क्रांतिकारकांच्या संपर्कात राहत होते.
गणेश शंकर विद्यार्थी या पत्रकाराच्या माध्यमातून ते क्रांतीकारकांना अर्थ पुरवठा, त्यांच्या पश्चात कुटुंबियांना नेहरू मदत देत असत. आझाद हुतात्मा झाल्यावर, पोस्ट मार्टम केलेली त्यांची बॉडी क्लेम करायला दुसरे कोणी तिथे धजावले नव्हते.
बॉडी ताब्यात घेणार्या या नेहरूंच्या पत्नी
कमला नेहरू होत्या. चंदनाची लाकडे आणून चंद्रशेखर आझादांवर सन्मानाने अंत्यसंस्कार केला गेला. तो दिवस २७ फेब्रुवारी १९३१ चा होता. त्या वेळी सोन १८ रु तोळा होते आणि स्वयंघोषित क्रांतीकारक सावरकर ब्रिटिशांकडून महिना ६० रु पेंशन घेत मुंबईतील आपल्या शिवाजी पार्कच्या घरात पहुडलेले होते.
आज नेहरुंचा जन्मदिन, स्वतंत्र भारताची त्यांनी केलेली पायाभरणी, धोरणे, त्यांचे दूरदर्शी आंतराष्ट्रीय नेतृत्व यावर पुष्कळ लिहिले गेले आहे. स्वातंत्र्य मिळवण्याचे हिंसक क्रांतीचा मार्ग त्यांचा नव्ह्ता, विचारसरणीही भिन्न होती तरीही हे सर्व नेहरूंच्या आशीर्वादाने घडत होते.
चंद्रशेखर आझाद यांना नेहरूंनी एक पत्रही लिहिले होते. त्यात मॉस्कोला जावून कम्युनिस्ट विचारसरणीचा अभ्यास करण्याविषयी सुचवत संपूर्ण खर्च उचलण्याची तयारी दर्शविली होती. प्रत्यक्ष जमिनीवर लढणार्या जहाल क्रांतिकारकांच्या पाठीशी जवाहरलाल नेहरू नेहमीच होते.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh