Dr Sheetal Amte-Karajgi's in-laws have raised some imp questions to senior Amtes. It is so tragic that Dr Sheetal Amte-Karajgi is no more. Read my report about the unanswered questions via @MumbaiMirror
mumbaimirror.indiatimes.com/mumbai/cover-s…?
Rtd Lieutenant colonel Shirish karajgi and Suhasini Karajgi have written a letter to senior Amtes. Here are the more details.
डाॅ. शीतल आमटे-करजगी यांच्या मृत्यूनंतरची हळहळ,दु:ख चहूबाजूंनी व्यक्त होत आहे.अनेक हितचिंतकांना काळजी वाटतेय की नेमकं काय सुरू आहे? जणू दोन गट पडले आहेत.शीतलसोबतच्या मैत्रीचे गोडवे गाणाऱ्या काहींनी साधी आदरांजलीही जाहीरपणे व्यक्त नाही केली कारण आपण शीतलच्या बाजूचे असं लेबल लागेल.
पण असं काही नाहीये. शीतलबद्दल लिहिलं म्हणजे तिच्या आई वडिलांचे-काका काकूंचे कुणी विरोधक होत नाहीत. एवढं समजण्याएवढे डाॅ. प्रकाश, डाॅ. मंदा, डाॅ विकास, डाॅ. भारती आणि पुढची पिढी समंजस आहे, असा विश्वास मला आहे.कारण, असेही बहुसंख्य जण आहेत. जे दोन्ही बाजूचे आहेत.
ज्यांना महारोगी सेवा समितीच्या सर्व कामांबद्दल नितांत आदर प्रेम आहे. आमटे कुटुंबियांच्या कामाविषयी आदर आहे. अनेक तपशील अनेकांना ठाऊक नाहीत. तांत्रिक बाजू सर्व समाजाला माहितही नाहीत. त्यामुळे कोण बरोबर कोण चूक? हे कसं ठरवायचं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
कुणाची एका गटाचीच बाजू घेतली पाहिजे, असाही गैरसमज झाला आहे काहींचा.
पण, या कंपूगिरीच्या राजकारणात न पडताही आमटे कुटुंबियामध्ये निर्माण झालेल्या कामाच्या कलहाविषयी बोलणं क्रमप्राप्त झालं ते शीतलच्या धक्कादायक अकाली मृत्यूमुळे. आमटे आणि करजगी कुटुंबियांच्या दु:खात सहभागी सोबत आहे.
शीतलसारखी एनर्जेटिक मुलगी गमावल्याने डाॅ विकास आणि डाॅ. भारती आमटेंवर, तिचे पती गौतम करजगी, सासरे माजी लेफ्ट. कर्नल, माजी सैनिक कल्याण निधी अधिकारी शिरीष आणि सासू सुहासिनी करजगी, सहा वर्षांचा मुलगा यांच्यावर आणि इतर जवळच्या कुटुंबियांवर जो आघात झालाय त्याची कल्पनाही करवत नाही.
आई कधी येणार? असा प्रश्न तिचा मुलगा शरविल, वडील गौतम यांना सतत विचारतोय. काल परवा गोधड्या महाराष्ट्राची ओळख व्हावी म्हणणारी, फॅब्रिक कोलाज आर्टचे फोटो टाकलेली शीतल बाबा आमटेंशेजारी कायमची शांत झाली, हे मनाला पटत नाही.
महाराष्ट्रातील आदरणीय व्यक्तिमत्वं डाॅ. विकास आणि डाॅ. प्रकाश आमटे या दु:खातून सावरल्यावर सविस्तर बोलतील अशी अपेक्षा ठेऊया.
या दरम्यान, काही वृत्तपत्रामध्ये आलेल्या बातम्या खोडसाळ होत्या, अपुऱ्या माहितीवर आधारित एकांगी होत्या असा खुलासा शीतलने केला होता.
त्यानंतरच्या तिच्या वादग्रस्त व्हिडिओनंतर चारही सिनिअर आमटेंनी पत्रक काढलं.तिचे आरोप तथ्यहीन असल्याचं सांगितल.ती खरचं नैराश्य, मानसिक तणावात होती तर ते असं जाहीर करणं, मेंटल हेल्थच्या एथिक्समध्ये बसतं का व्हिक्टिमायझेशन होतं?पेशंटच्या अधिकारांचं उल्लंघन होतं का? हे तपासावं लागेल
दोन्ही बाजूंचे आरोप प्रत्यारोप हे आता फक्त कौटुंबिक खाजगी प्रश्न न उरता सामाजिक प्रश्न झालाय.कुजबूज, गटतट करण्यापेक्षा संवादानेच हा धुरळा कदाचित खाली बसेल. बदनामीचं षडयंत्र असेल तर तेही रोखता येईल.
इतर सामाजिक चळवळी ज्या आमटे कुटुंबियांच्या प्रेरणेतून, त्यांच्यासोबत, सहकार्याने उभ्या राहिल्या त्यांचाही धीर खचणार नाही. आज आमटे कुटुंबाच्या सामाजिक संस्थांपुढे जे प्रश्न आले ते इतर संस्थांपुढे उभे राहिल्यास त्यातून मार्ग काढायची दिशाही दिसू शकेल भविष्यात.
त्यासाठी शीतलचा जीव जायची वेळ येईपर्यंत थांबता नये होतं. हा संवाद सर्व बाजूंनी आधी व्हायला हवा होता. (शीतलने मृत्यूआधी स्वत: अनेकांशी बोलून) शीतलच्या सासू सासऱ्यांनी आणि नवऱ्याने तिच्या मृत्यूनंतर काही महत्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत.
शीतल मुलगी होती, यामुळेही तिच्यावर जास्त अन्याय झाला. तिला भावापेक्षा वेगळी वागणूक मिळाली. हा त्यातील सर्वात गंभीर आरोप वाटतो मला. सर्व वाद मिटले, असं जे भासवण्यात येतंय ते खरं नाही, असंही तिच्या सासरच्या लोकांनी सांगितलंय. त्यांनी खुलं पत्र लिहिलं आहे.
या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं मिळतील, ही आशा.

याबाबत आज केलेली बातमी.

mumbaimirror.indiatimes.com/mumbai/cover-s…?
शीतलच्या सासू आणि सासरे यांनी लिहिलेलं पत्र.
.........
Dr Prakash Amte
"हे पत्र मी दोन दिवांपूर्वीच लीहले होते व आज तिच्या कुटुंबियान ( संपूर्ण आमटे परीवार) कडून तिला दिला गेलेला त्रास तिला सहन न झाल्यामुळे तीनी स्वतःला संपवले......The end....
"२५-११-२०२० च्या लोकसत्ता व अनेक पेपर मधे शितल च्या मानसिक आजारा बद्दल बातमी वाचली. खूप वाईट वाटले व आश्चर्य पण वाटले.
ह्या वर कांही प्रतीक्रीया द्यावी की चूप रहावे हे कळत नव्हते. .."
"परंतु शेवटी विचार केला की शितल ‘आमटे‘असून तिच्या बाबतीत जर असा अन्याय होतो आहे,तर बाकी सामान्य मुलींचे काय होत असेल?आमटे कुटुंबांनी(तिच्या स्वतःच्या आई- वडिलांनी व काका- काकूंनी)तिचा बद्दल असे संयुक्त निवेदन( स्वाक्षरी करून) द्यावे ह्या सारखी लाजीरवाणी गोष्ट आणखीन काय असू शकते"
"ज्या दिवशी गौतम- शितल चे लग्न झाले त्या दिवशी पासून शितल ला मी माझी मुलगीच मानले.आणि त्याच हक्काने आज मी आमटे कुटुंबीयांना काहीं प्रश्न विचारते.1)शितल नी संस्थेच्या कामात खूप योगदान दिले आहे असं तुम्हीच लिहले आहे,मग जर शितल ला आज काहीं मानसिक ताण व नैराश्य आहे तर..."
"तिला संभाळणे व आपुलकीने तिला जवळ न घेता , तिच्याशी न बोलता, तिला दूर का लोटले जाते आहे ??
कारण आनंदवनात सगळया handicapped ( mental/ physical) लोकांची काळजी घेतली जाते मग सख्या मुली बाबत बोभाटा का ?
की या मागे आमटे कुटुंबाचा काहीं स्वार्थ आहे ???"....
"डॉ. प्रकाश आमटे ना तर मुक्या प्राण्यांची भाषा कळते व ते त्यांच्याशी संवाद पण करतात, मग स्वतःच्या पुतणी शी संवाद साधता आला नाही त्यांना ?सोशल मीडिया वर बदनामी करण्याची गरज काय ?2. कौस्तुभ आमटे ह्यास परत विस्वस्थ मंडळावर घेतले.....मला विचारावेसे वाटते की त्याला काढले का होते ?"..
"खास गोष्ट म्हणजे ज्या सगळया ट्रस्टी न्नी त्याला काढले त्यांनीच त्याला परत घेतले.तर आमचा सारख्या असंख्य लोकांना हे विचारावेसे वाटते की त्याला ट्रस्टी म्हणून काढण्या मागचे कारण काय होते ??व आता परत घेतले तर त्यानी अशी काय विशेष कामगिरी केली ???"...
"मागच्या 4-5 वर्षापासून तर कौस्तुभ आमटे चे नाव पण कुठे वाचण्यात आले नाही. इतक्या वर्ष तो होता कुठे ?की आमटे कुटुंब पण सर्व सामान्य माणसान प्रमाणे मुलगा ( घराण्याचा वारस) आणि मुली मधे फरक करतात ???आज मी सर्वांना खुले आव्हान करते की आनंदवन ला जावे"....
"शितल आणि गौतम नी जे काम केले आहे ते स्वतःच्या डोळ्यांनी बघावे. आणि मग काय ते ठरवावे.
आमटेन सारख्या नावाजलेल्या लोकांनी पण मुला - मुलीं मधे फरक करावा ही खरंच लाजीरवाणी गोष्ट आहे. नाही का ?"....
"उंची न अपुली वाढते फारशी वाटून हेवा।
श्रेय ज्याचें त्यास द्यावें, एवढें लक्षांत ठेवा।
ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी।
ती न कामी आपुल्या, एवढें लक्षांत ठेवा।
कौस्तुभ आमटे च्याबाबतीत वरच्या ओळी अगदी योग्य ठरतील."...
"ज्या प्रचंड गतीने व डेडीकेशनने आज व मागच्या अनेक वर्षा पासून शितल व गौतम नी आनंदवनात काम केले आहे त्याला तोडच नाही. त्या बद्दल आम्हाला त्या दोघांचा खूप खूप अभिमान वाटतो."...
"ईथे मला आमटे लोकांना आणखीन एक प्रश्न विचारावासा वाटतो की एक मानसिक नैराश्य असलेली व्यक्ती एवढें प्रचंड जबाबदारी चे काम कसे काय करू शकेल?आज आत्ता मी आनंदवनातच आहे व शितल व गौतम शिवाय ईथे आमटे कुटूंबातील एकही जबाबदार व्यक्ती उपस्थित नाही.".....
"तिच्या व्यतिरिक्त एकही डॅाक्टर नाही. शितल एकटीच दवाखान्यातील सगळ्या आजारी लेप्रसी पेशंट ची काळजी घेते आहे.मग ती जर स्वत: मानसिक रीत्या आजारी आहे ( तीच्या आई-वडीलांनी पत्रात लीहल्या प्रमाणे) तर सगळे आमटेज तिच्या भरोशावर पुर्ण आनंदवन सोडून हेमलकशाला काय करतात आहेत ?"...
"सगळे आमटे शितल- गौतम च्या विरूध्द कट-कारस्थान तर रचत नाहीए ना ?
विकास आमटे व प्रकाश आमटेन बद्दल हे सगळं लीहण्याची वेळ माझ्यावर यावी हे माझे दुर्भाग्यच आहे.त्यांनी जनाची नाही तर मनाची लाज बाळगावीएवढेच माझे म्हणणे आहे."...
"शितलला ला कसलाही मानसिक त्रास नाही व हा त्रास तिच्या वर जबरदस्ती लादला जातोय व तो पण तिच्या सख्या आई-वडीलांन कडून हे तीचे खंर दुर्भाग्य आहे.
शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की आमचे पुर्ण करजगी कुटूंब सदैव तिच्या पाठीशी खंबीर पणे उभे आहे व पुढे पण राहू."
सुहासिनी करजगी
शिरीष करजगी.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Alka Dhupkar

Alka Dhupkar Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @alka_MIRROR

31 Jul
एक आॅक्टोबर 2016 ला तत्कालीन राज्य सरकारच्या मंजुरीने पनवेल महानगरपालिका अस्तित्वात आली. मे 2017 ची महानगपालिकेची निवडणूक भाजप जिंकलं. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पनवेल महनगरपालिकेच्या निवडणूक प्रचारातली आश्वासनं त्यांच्याच सोशल मिडियावर उपलब्ध आहेत.
त्यानंतर महाविकास आघाडीचं नवं सरकार आलं.
आजपर्यंत पनवेल महानगरपालिकेचं स्वत:चं एकही हाॅस्पिटल नाही. एमजीएम- कामोठे, डीवाय पाटील -नेरूळ आणि रायगड जि.प.चं उपकेंद्र इथे पनवेल महानगरपालिकेने बेड्स घेतले आहेत. त्यांच्याकडे स्वत:चा आरोग्यअधिकारी नाही.
आरोग्य विभागाचे 60-70 कंत्राटी लोक आहेत. नाॅन कोविड आजार, प्रशासकीय काम करायला तर माणसांची वानवाच आहे.
12 लाख लोकसंख्या असलेल्या शहरात स्वत:चं महानगरपालिकेचं हाॅस्पिटल नाही, मग ही महानगरपालिका अस्तित्वात आणून त्याचं राजकीय श्रेय घेऊन तत्कालीन भाजप सरकारने काय साध्य केलं?
Read 8 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!