महासागरात उसळतंय स्वत:च्या
धुंदीतलं एक गर्विष्ठ जहाज....
त्याच्या टोकावर सुरक्षित पट्टे बांधून
उभा आहे एक
जहाजाहून अधिक गर्विष्ठ फिडलर...
ज्याला वाटतंय,
त्याच्या हातांच्या लयकारीनेच
समुद्र नाचतोय
त्याला हवा तसा !
ज्याला वाटतंय,
सारा महासागर अंथरलाय
आपल्याच बापानं केवळ
आपल्या जहाजासाठी...
ज्याला वाटतंय,
आपलं या टोकावरील
उभं राहून फिडल वाजवत राहणं
हेच या संस्कृतीचे संचित.
ज्याला वाटतंय,
आपल्या साध्या शिंकेलाही
तळातले करोडो मूर्ख दगड
देवू लागले आहेत
टेन कमान्डमेन्ट्सचा दर्जा..
ज्याला वाटतंय,
आपल्याच लयीच्या भारामुळे
जहाज होत राहतंय वरखाली.
झुलत राहतंय
आपल्याला हवं तसं.
ज्याला वाटतंय,
प्रत्येक तयार होणाऱ्या लाटा
निर्माण करीत आहोत आपण
केवळ काही हातवाऱ्यांतून,
पोषाखातून,
स्वत:लाही न आकळलेल्या भाष्यातून.
आणि
जहाजाच्या काठावर सभोवताल
उभीआहेत या फिडलरच्या
सगळ्या समजुतींना
तितक्याच कर्कश्श सुरात
समूह साथ द्यायला
प्लेग भरलेली अनेक लाचार उंदरं.... !
पण-
तो फिडलर-
ते त्याचे वेडगळ हातवारे-
तो त्याचा दर तासाला
बदलणारा पोशाख-
त्याची ती प्लेग भरलेली
सनातन उंदरं-
त्याचं ते गर्विष्ठ भुताळी जहाज -
यापैकी
कुणालाच माहित नाही,
की या महासागरात
काही दशकांपूर्वी
तळाशी वितळलेल्या
मूठभर मीठाभोवती
तयार होऊ शकतो
क्षणात चिरफाळ्या उडवणारा
एक विशाल हिमनग...
- दत्ता पाटील
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
आंबेडकरांचे हे भाषण आजच्या स्थितीला अत्यंत चपखल लागु पडतंय.
लोकशाहीच्या संवर्धनात आस्था असणाऱ्या सर्वांना जॉन स्टुअर्ट मिल यांनी दिलेला सावधगिरीचा इशारा आपल्याला लक्षात ठेवावा लागेल.त्यांच्या मते, लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा
नये. तसेच त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नये, की जेणे करुन त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उदध्वस्त करण्यासाठी उपयोग करील. संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी व्यतित केलेल्या महापुरुषांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात काहीच गैर नाही.
परंतु कृतज्ञता व्यक्त करण्यालाही मर्यादा असल्या पाहिजेत. आयरीश देशभक्त डॅनियल ओकॉनेल यांनी समर्पकपणे म्हटल्याप्रमाणे, “कोणताही माणूस स्वाभिमानाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करु शकत नाही, कोणतीही स्त्री स्वत:च्या शीलाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करु शकत नाही आणि कोणताही देश
बराक ओबामा यांनी डॉ.सिंग, सोनिया आणि राहुल गांधी यांच्याबद्दल पुस्तकात नेमकं काय लिहिलं त्याचा मराठी अनुवाद 👇
मेजवानी दरम्यान सोनियांबद्दलचं एक निरिक्षण म्हणजे त्यांचा बोलण्याऐवजी ऐकण्यावर अधिक भर होता. धोरणात्मक गोष्टींमध्ये मनमोहन सिंगांपासुन फारकत घेत त्या अधुन मधुन संभाषण
मुलाकडे नेत होत्या.त्या सगळ्यामधुन मला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे त्यांची ताकद ही त्यांच्या तीक्ष्ण बुद्धीमत्तेचा आविष्कार होती.आईचंच रुबाबदार रूप घेतलेला राहुल हुशार आणि प्रामाणिक वाटला.तो पुरोगामी राजकारणाच्या भविष्याबद्दलचे त्याचे विचार सांगतानाच मधुन मधुन माझ्या 2008
च्या प्रचारयंत्रणेच्या तपशिलांबद्दही विचारत होता. तो जरासा चिंताक्रांत आणि अपरिपक्व वाटला... म्हणजे शिक्षकावर प्रभाव पाडण्यासाठी अत्युत्सुक असलेला, सर्व अभ्यासक्रम वाचलेला पण आत खोलवर त्या विषयासंबंधी फार आसक्ती नसलेला.