फाशीच्या एक दिवस आधी म्हणजे २२ मार्च १९३१ ला आपल्या जवळच्या मित्रांना भगत सिंह ह्यांनी लिहिलेलं हे पत्र. दुर्दम्य आशावाद आहे ह्या पत्रात.
माझ्यापेक्षा जास्त सौभाग्यशाली कोण असेल?
साथीदार मित्रहो,
जिवंत राहण्याची महत्त्वाकांक्षा नैसर्गिकरित्या माझ्यातही असायला हवी. मी ती लपवू इच्छित नाही. पण माझं जिवंत राहणं सशर्त आहे, मी अटक होऊन किंवा जखडून जिवंत राहू इच्छित नाही.
Mar 20, 2023 • 4 tweets • 1 min read
बरं! त्या बागेश्वरबाबाला दिव्य दृष्टी आहे असं त्याचे भक्त छातीठोकपणे सांगतात ना? मग एवढ्या ३६ मध्यमवर्गीय महिलांचे दागिने चोरले गेले, ते त्याच्या दिव्य दृष्टीने त्याने का शोधले नाहीत?
चोर कोण आहेत हे त्याला विचारण्याच्या ऐवजी भक्त लोक पोलिसांकडे का गेले हाही प्रश्नच पडलाय मला
! तुमच्या बाबाच्या दिव्य दृष्टीवर तुमचा विश्वास नाही का? गंमत म्हणजे तो बाबाही भक्तांना मदत करायची सोडून निघून का गेला?
मीरा रोड पोलिसांनी आता त्या बाबाला बोलावून त्याच्या दिव्य दृष्टीची गुन्हेगारांना शोधण्यात मदत घेऊन त्या दिव्य दृष्टीची परीक्षा घ्यावी.
Mar 10, 2023 • 16 tweets • 3 min read
Mentally Challenged to Politically Challenged म्हणजे सोप्प्या भाषेत : मनोरुग्ण ते नमोरुग्ण !!.
बऱ्याचदा आपल्याला दिव्यांग मुलं पाहायला मिळतात.
ज्यांची बौद्धिक,शारीरिक किंवा मानसिक वाढ झालेली नसते.
त्यांना special child म्हणून ओळखले जाते.
प्रसूतीच्या वेळी घडलेल्या अपघातामुळे,आनुवंशिक विकृतीमुळे किंवा DNA मधल्या दोषामुळे अशी संतती जन्माला येते.
या मुलांच्या संगोपनासाठी पालकांना फार कष्ट करावे लागतात आणि समाज फार सहानुभूतीने या पालकांना बघतो.
कधी कधी ही मुले अल्पायुषी ठरतात.
Feb 19, 2023 • 4 tweets • 1 min read
शिवाजी महाराज म्हणजे फक्त तीनच गोष्टी सांगितल्या जातात.
१. अफजलखानाचा कोथळा
२. शाईस्तेखानाची बोटे
३. आग्राहून सुटका.
पण मला भावलेले शिवाजी महाराज अनेक अंगाने समजून घ्यावे वाटतात
१. आपल्या "आईला सती जाण्यापासून रोखणारे" शिवाजी महाराज "सामाजिक क्रांती" करणारे होते.
२. रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावता कामा नये हा आदेश देणारे "लोकपालक" राजे होते.
३. सर्व प्रथम हातात तलवारीबरोबरच पट्टी घेऊन जमीन मोजून तिची नोंद त्यांनी ठेवायला चालू केली असे "उत्तम प्रशासक" होते.
Feb 16, 2023 • 7 tweets • 2 min read
शेल कंपन्या म्हणजे नेमक काय?
ज्या कंपन्या फक्त कागदावर अस्तित्वात आहेत आणि पैसे फिरवायला त्यांचा वापर केला जातो.
१. Ilara – २४७६६ कोटी , एकूण भांडवलाच्या ९९ टक्के.
२. Monterosa Investment Holdings ३७००० कोटी.
३. Emerging Market Investment ८२०० कोटी.
#हिंडेनबर्ग
४. क्रिस्टा फंड्स ५३९२ कोटी रुपये , एकूण भांडवलाच्या ८९.५ टक्के.
५.एपीएमएस इन्वेस्टमेंट फंड १८९८६ कोटी रुपये, एकूण भांडवलाच्या ९९.४० टक्के.
६.न्यू लियाना इन्वेस्टमेंट ने ३३६० कोटी, एकूण भांडवलाच्या ९५ टक्के.
७.एलटीएस इन्वेस्टमेंट फंड १३००० कोटी, एकूण भांडवलाच्या ९८ टक्के.
Jan 31, 2023 • 11 tweets • 2 min read
२०१२ मध्ये भाजपने प्रचार सुरू केला होता की सोनिया गांधी २०० अब्ज रु. च्या मालकीण असून जगातल्या ४ थ्या सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत....
सोबत अनेक काँग्रेस व इतर लोकांची पण आकडेवारी व्हाट्सऍपला अजुन फिरतात.
यासोबत त्यानी कोळसा घोटाळा १ लाख ७६ हजार कोटी, 2 जी स्पेक्टरम घोटाळा १ लाख २० हजार कोटी सारख्या अनेक घोटाळ्यांचे आकडे दिले...
सोबत भाजपने हा पण प्रचार सुरू केला की हा सर्व पैसा परदेशात असून मोदी सत्तेत आल्यानंतर ही पै न पै देशात आणून वाटली जाईल.
Jan 14, 2023 • 13 tweets • 2 min read
कुस्तीचे जग जिंकू पाहणारा हमालाचा पोरगा 'सिकंदर'
घरात असणाऱ्या अठराविश्वे दारिद्रातून कुस्तीतला प्रवास करत एका हमालाचा पोरगा अखंड कुस्तीशौकीनांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. दुनियेचे ओझे पाठीवर वाहणाऱ्या आपल्या बापाच्या कष्टाचे ऋण या यशाने फेडणाऱ्या मल्लाचे नाव म्हणजे सिकंदर शेख.
सध्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुण्यात रंगतेय. या स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी करत सिंकदरने सर्वांची मने जिंकली आहेत. महाराष्ट्रसह देशातील प्रत्येक प्रतिस्पर्धी मल्लांला त्याने आस्मान दाखवत देशातील आघाडीचा मल्ल तो बनला आहे.
हमाली करून वडीलांनी पुरवला खुराक...
Jan 3, 2023 • 6 tweets • 1 min read
सावित्रीमाई फुले यांनी ज्योतीबा यांना लिहीलेलं एक पत्र.
सावित्रीमाई ह्या एक सामाजिक भान असलेल्या,निडर स्वतः निर्णय घेण्याची क्षमता असलेलं व्यक्तिमत्व होत्या हेच पत्रातून दिसून येते.
#थ्रेड
नायगाव, पेटा खंडाळा, जि सातारा
ता. २९ ऑगस्ट १८६८
सत्यरूप जोतिबा स्वामी यांस,
सावित्रीचा शिरसाष्टांग दंडवत,
पत्रास कारण की, आपले पत्र पावले. इकडील सर्व मंडळी खुशाल आहेत. मी येत्या पाच तारखेपर्यंत पुण्यास येईन
Dec 4, 2022 • 5 tweets • 1 min read
जवळपास १५० दीडशे वर्षांपूर्वी, 1869 साली, टाटा समूहाचा वार्षिक उलाढाल 20 हजार रुपये होती .
आणि त्याचवेळी या माणसाची, पूना कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनीची वार्षिक उलाढाल 21 हजार रुपये होती. त्याचकाळात सोनं 10 रुपये तोळा होत.
सांगायचंय एवढंच,
एकेकाळी टाटापेक्षाही श्रीमंत इतकं सधन असा हा माणूस.
इमारती,धरणं,पूल,बोगदे, इतकंच नाही तर राजवाडे,कापड गिरण्या., इत्यादी सर्व प्रकारच्या भव्य बांधकामात अग्रेसर.
सोन्याचे दागिने बनवण्यासाठी लागणारे मोल्ड्स ,त्याची संपूर्ण भारताची होलसेल एजन्सी या माणसाकडे.
Oct 31, 2022 • 15 tweets • 2 min read
देवेंद्रजी आणखी किती खोटं बोलणार, किती खालची पातळी गाठणार ?
1) फॉक्सकॉन ऍपल मोबाईल बनविण्याचा 36 हजार कोटी गुंतवणुकीचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार अशी घोषणा मा देवेंद्र फडणवीस साहेबानी जानेवारी 2015 मध्ये केली. त्यानंतर सुमारे साडेचारवर्ष तेच मुख्यमंत्रीपदावर होते
पण तो प्रकल्प गुजरातला न्यावयाचे असल्याने त्यांना दिल्लीतुन समाज देण्यात आल्याने त्यांनी त्याबाबत जाणीवपूर्वक प्रतिकुल पावले उचलली. परिणाम त्या प्रकल्पातील कंपनीचा रस निघुन गेला, कंपनीने प्रकल्प रद्द केला पण ते गुजरातला गेले नाहीत.
Oct 20, 2022 • 5 tweets • 1 min read
राहुल गांधींच्या 'भारत जोडो' पदयात्रेवर हेरंब कुलकर्णी सरांची कविता
तो निघालाय....
तो निघालाय
दक्षिणेकडून उत्तरेकडे
उत्तर नसलेल्या प्रश्नांना स्पर्श करत
विमान,जेट,हेलिकॉप्टर,बुलेटप्रूफ गाड्या,सारे हाताशी असतानाही
धुळीच्या रस्त्यावरून तो निघालाय....
गर्दीचा गैरफायदा घेत
बापाच्या चिंधड्या झालेल्या प्रदेशातून
पुन्हा त्याच गर्दीवर विश्वास टाकत
हिंसेलाही लज्जित करत तो निघालाय..
पूर्वीही असेच राजे निघत
अश्वमेध करायला, सैन्य घेऊन
जिंकत जिंकत
रक्ताचा सडा शिंपडत---
पण तो नि:शस्त्र आहे
प्रेम आणि संवादाचे शस्त्र घेऊन
Sep 18, 2022 • 5 tweets • 1 min read
Next level hacking - फक्त 2 दिवसात हैद्राबाद मधली एक अतिशय सेन्सिटिव्ह केस सॉल्व्ह केली आहे - अभिजित वाघमारे
एका मोठ्या कंपनीचा CEO माझ्या मित्राचा boss आहे
त्याच्या खात्यातून 16 लाख रुपये ऑनलाईन चोरी झाले कुठलाच OTP Call नव्हता ,कुठली ही ऑनलाईन लिंक पाठवली गेली नाही
किंवा ओपन केली गेली नाही त्याचा boss स्वतः अतिशय टेक्नो फ्रेंडली आहे पण कुठूनच मार्ग कळत नव्हता की इतकी अमाऊंट उडवली कशी सायबर क्राईमचें एलीट ऑफिसर्स केसवर होते पण समजत नव्हत....
मोबाईल मधुन सगळी स्कॅनिंग स्क्रूटणी झाली कुठलाच ट्रेस मिळाला नाही तेव्हा फक्त एक क्लू मला मिळाला
Sep 14, 2022 • 4 tweets • 1 min read
महाराष्ट्राच्या उद्धव ठाकरे सरकारने फॉक्सकॉन व वेदान्ताच्या सेमीकंडक्टर व डिस्प्ले प्रोजेक्ट साठी तळेगाव परिसरातील MIDC च्या ताब्यातील 400 एकर जागा मोफत व 700 एकर विकत अशी जमिनी संदर्भात 2100 कोटी subsidy मंजूर केलेली होती.
त्यानंतर प्रोजेक्टच्या वेगवेगळ्या सेक्टर मध्ये कॅपिटल subsidy हि 39000 कोटी subsidy या कंपनीला बहाल केली जाणार होती.
गुजरातने फक्त 28000 कोटीची कॅपिटल subsidy देऊन शिंदे व फडणवीस सरकारला मॅनेज करून हा मोठा प्रोजेक्ट आपल्या पदरात पाडून घेतला.
Sep 7, 2022 • 27 tweets • 5 min read
आज तामिळनाडू मधून भारत जोडो यात्रेची सुरुवात करताना राहुल गांधी यांनी इंग्रजीत केलेल्या भाषणाचा मी मराठीत केलेला स्वैर अनुवाद शेअर करत आहे. अगदी मोजक्या शब्दात सोपं आणि महत्त्वाचं बोलून भारत जोडो यात्रेचं ध्येय राहुल गांधींनी उलगडून सांगितलंय.
ईथे उपस्थित सर्वाना माझा नमस्कार. स्टेजवर उपस्थित दिग्विजय सिन्घ जी,पी चिदंबरम जी, दिनेश गुंटुराव जी,सेलवा पेरुंतगाई जी, शेलाकुमारजी , माणिक टागोर जी, विजय वसंत जी, ज्योतिमनी जी,काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते,पक्षाचे कार्यकर्ते,माध्यमांमधील मित्र
Sep 3, 2022 • 15 tweets • 3 min read
१३.५% जीडीपी मध्ये वाढ. मग सुस्साट प्रगती होते आहे कि नाही देशाची.
फसवणुक करायची पण तांत्रिकदृष्ट्या खरं बोलण्याचं कसब आहे त्यांच्याकडे.
उदा एक खुनी कोर्टात शपथेवर सांगतो कि मी काल रात्री खून केला नाही, साक्षीदार सुद्धा शपथेवर सांगतात की नाही त्याने काल रात्री खून केला नाही.
आणि निर्णय होतो की त्याने खून केला नाही.
तो आणि साक्षीदार खोटं बोलले नसतात. फक्त ते हे सांगत नाहीत की खून परवा रात्री केला होता.
तांत्रिकदृष्ट्या,काल रात्री खून केला नाही,हे बरोबर आहे.
आठवतंय, ना हमारे जमीन पर न कोई आया था और ना कोई है ? किंवा
Aug 15, 2022 • 9 tweets • 2 min read
नियतीची संकेत भेट..Tryst with destiny.
(नेहरूंचे अजरामर भाषण)
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत या देशाची जगाला नव्याने ओळख व्हावी. मध्यरात्रीच्या सत्तांतर सोहळ्या निमित्त काही विशेष संदेश जगात पोहचला पाहिजे म्हणून लेखन -टिपण तरी काढावे असे नेहरूंनी १४ ऑगस्ट १९४७ रोजी ठरवले होते .
परंतु त्यांचा दिवस अतिशय व्यस्त होता,रात्री घरी यायला दहा वाजले आणि नेहरू लिहायला बसणार एवढ्यात घरातील लोकांनी आग्रह करून जेवायला बसवले.नेहरू जेवायला बसले ,तेवढ्यात लाहोर येथून एक फोन आला. लाहोर मधल्या दंगली,रक्तपात,जाळपोळ या बद्दलचा तो फोन होता.हा फोन जवळपास अर्धा तास चालू होता
Jul 31, 2022 • 11 tweets • 2 min read
गुजराती माणसाच्या रक्तात व्यापार असतो, मारवाडी माणसाचा जन्मच धंद्यासाठी झालेला असतो....हे सगळं आपण ऐकून ऐकून सनातन सत्य समजू लागलो आहे. पण गुजराती आणि मारवाडी व्यवसायिकांचं व्यवसाय शास्त्र, मॉडेल आहे तरी काय?
बाजारात उतरण्याचा प्रयत्न केलेल्या, करणाऱ्या कोणाचाही अनुभव विचारा. उद्योग, व्यवसाय किंवा कोणता स्टार्ट अप सुरु करायचा असेल, तर सर्वात आधी लागणाऱ्या काही गोष्टी म्हणजे भांडवल, जागा, कच्चा माल आणि वितरक.
Jul 9, 2022 • 24 tweets • 4 min read
आर आर आर चा निर्माता एस राजमौलीचे पिताश्री ज्यांना भाजपने राज्यसभा दिली तेच त्यांनी एका मुलाखतीत सरदार पटेलच का दाखविले हे अत्यंत खोटे सांगितलं आहे, पदासाठी तो इतिहासाशी केला व्यभिचार आहे.
आपल्या पूरते तरी खोटे उघडे पाहीजेल म्हणून हा थ्रेड.
'सरदार पटेलांनी भारत अखंड ठेवला असता ' ही उजव्या विचारसरणीच्या लोकानी नव्वदच्या दशकात जन्माला घातलेली वास्तवाशी प्रतारणा करणारी दंतकथा आहे.पटेल हे १९४६ मध्येच फाळणीसाठी संमत असणार्या पहिल्या काही कॉंग्रेस नेत्यांपैकी एक होते,
Jul 1, 2022 • 7 tweets • 2 min read
वसंतराव नाईक..
मारोतराव कन्नमवार यांच्या अकाली मृत्यूनंतर मुख्यमंत्रीपद चालून आलं. यशवंतरावांनंतर मारोतराव कन्नमवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते हे आजच्या ९८ टक्के लोकांना माहीत नाही. महाराष्ट्रात आल्यावर विदर्भावर अन्याय होऊ देणार नाही म्हणून यशवंतरावांनी आपला शब्द पाळत
विदर्भाला मुख्यमंत्री पद दिलं. यशवंतरावांनी कृषी औद्योगिक महाराष्ट्र समाजाच्या निर्मितीची नांदी घातली तर या महाराष्ट्राला आपल्या द्रष्ट्या धोरणांनी सक्षम करणारा महापुरुष होता तो वसंतराव नाईक.
Jul 1, 2022 • 8 tweets • 3 min read
हॅलो फ्रेंड्स, सिक्रेट मेसेज भेज दो secret.cooo.me/8d7222595
मंत्री म्हणून त्यांचे काम चांगले होते, व्हिजन असलेला नेता
May 21, 2022 • 7 tweets • 2 min read
राजीव - " तो पुन्हा कधीच परतला नाही, तो गेला तो कायमचाच!"
" 20 मे 1991 रोजी राजीव आणि मी सकाळी 7.30 वाजता मतदानाला गेलो. तापमान त्यावेळी सुसह्य होते. राजीवने पांढरा कुर्ता पायजमा घातला होता आणि त्याच्या खांद्यावर तिरंगी उपरणे होते!
मतदान करून परत आल्यावर राजीवने मला घरी सोडले आणि तो लगेच निघून गेला कारण त्यास पुढच्या दौ-यावर जायचे होते. सायंकाळी परत दिल्लीत येवून तो ओरिसा आणि दक्षिण भारताच्या दौ-यावर जाणार होता कारण दोन दिवसांनी तिथे मतदान होते.