पंजाबच्या लुधियाना येथील एक महिला: श्रीमती रजनी बेक्टर ह्यांनी स्वयंपाकघरातून सुरवात केलेला व्यवसायाचे आज ₹1000 कोटीच्या जागतिक साम्राज्यात रुपांतर झालेलं असून, आज त्या 65 पेक्षा जास्त देशांमध्ये खाद्यपदार्थांची निर्यात करतात. 1/n #MrsBectorsFoodIPO
रजनी बेक्टर ह्या Mrs. Bector's Food Specialities Ltd. च्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ही कंपनी भारतात बिस्किटे आणि ब्रेड बनवन्याचे काम करते आणि McDonald's, KFC आणि Burger King सारख्या chain restaurants ची प्रमुख पुरवठादार आहे. 2/n #MrsBectorsFoodIPO
रजनीजींचा जन्म कराची येथे झालेला असून फाळणीनंतर त्या दिल्लीत स्थायिक झाल्या. त्यांचे लग्न कॉलेजमध्ये असताना लुधियाना येथील एका व्यवसायी कुटुंबात झाले. त्या काळातल्या बहुतेक भारतीय स्त्रियांप्रमाणेच, त्यांचेही जीवन एका आदर्श गृहिणीप्रमाणेच चालले होते. 3/n #MrsBectorsFoodIPO
जेव्हा मुले शाळेत जायला लागली तेव्हा अचानक त्यांना बराच मोकळा वेळ मिळायला लागला. हा वेळ सार्थकी लावण्यासाठी त्यांनी आईसक्रिम बनवण्याचा छंद जोपासयला आणि ते आपल्या मित्र परिवारात वाटायला सुरवात केली. त्यांना उत्तम प्रतिसाद मिळायला लागला. 4/n #MrsBectorsFoodIPO
पुढे त्यांनी पंजाब कृषी विद्यापीठात औपचारिक प्रवेश घेऊन बेकिंग तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याचे ठरवले. दरम्यान, त्यांना केटरिंगच्या ऑर्डर्स मिळू लागल्या होत्या. एका स्थानिक आमदाराने तर त्यांना लग्नासाठी 2000 लोकांच्या जेवणाची ऑर्डर दिली होती. 5/n #MrsBectorsFoodIPO
ह्या सगळ्या ऑर्डर्स रजनीजी आपल्या स्वयंपाक घरातून पूर्ण करत होत्या. त्यांच्या तोकड्या घरघुती साहित्याचा, चविवर आणि एकंदरीत नफ्यावर परिणाम व्हायला लागला होता. तेव्हा त्यांनी आपल्या छंदाचे व्यवसायीकरण करण्याचे ठरवले. 6/n #MrsBectorsFoodIPO
रजनीजींनी कुटुंबाच्या मदतीने ₹20000 मध्ये घराच्या मागेच एक व्यावसायिक बेकिंग युनिट उभे करून, काही लोकांना नौकरीवर देखील ठेवले. अश्या प्रकारे Cremica चा जन्म झाला. 7/n #MrsBectorsFoodIPO
1980 मध्ये पंजाब मध्ये हिंसाचार उसळलेला होता आणि ह्यातच रजनीजींच्या कुटुंबाचा पिढीजात चालत आलेला खताचा व्यवसाय बंद पडला. बेक्टर कुटुंबाने मग पूर्ण वेळ रजनीजींच्या व्यवसायात उतरण्याचे ठरवले. त्यांनी लुधियानामध्ये पहिले आईसक्रिम शॉप उघडले आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळू लागला. 8/n
तेथील नफ्याचा वापरून त्यांनी नविन operation facility सुरू केली आणि व्यवसाय विस्तारकडे लक्ष केंद्रित केले.1991 मध्ये Cremica ने लुधियानामध्ये बिस्किटांचा कारखाना चालू केला. 1995 मध्ये जेव्हा McDonald’s भारतात आले तेव्हा Cremica McDonald’s ची बन आणि सॉसची एकमेव पुरवठादार बनली. 9/n
2006 मध्ये Cremica ने ₹100 कोटी महसुलाचा टप्पा ओलांडला. उत्तर भारतात त्यांचा व्यवसाय विस्तारत होता. दलाल स्ट्रीटने देखील ह्याची दखल घेतली आणि गोल्डमॅनसह मोठ्या ब्रॅकेट गुंतवणूकदारांनी Cremica गुंतवणूक केली. 10/n #MrsBectorsFoodIPO
आज Cremica दरवर्षी ₹700 कोटी पेक्षा अधिक महसुल मिळवते. जगातील नामांकित chain restaurants ला ते पुरवठा करतात. Oreo आणि Sunfeast सारख्या बिस्किटयांची Contract manufacturing ही ते करतात. 11/n #MrsBectorsFoodIPO
Mrs. Bector's Food Specialities Ltd. चा आयपीओ आलेला असून त्याद्वारे कंपनी ₹540 कोटींचे भांडवल उभे करण्याच्या तयारीत आहे. आज आयपीओ subscribe करण्याचा शेवटचा दिवस असून आपणही श्रीमती रजनी बेक्टर ह्यांच्या प्रेरणादायी प्रवासात भागीदार होऊ शकता. 12/n #MrsBectorsFoodIPO
BCG लसीसंदर्भात एक धागा.
BCG चे पूर्ण नाव Bacille Calmette-Guérin आणि ही क्षयावरील (TB) प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वापरली जाते. ह्या लसीचा शोध 1921 मध्ये लागला असून आजतागायत ती जगभरात कमी अधिक प्रमाणात वापरली जाते.
ही लस लहान मुलांच्या TB साठी अत्यंत उपयुक्त असून प्रौढांसाठी ती किती उपायकारक आहे ह्याबद्दल शंका आहेत. प्रत्येक देशाने BCG संदर्भात वेगवेगळी धोरणे अवलंबली आहेत. ही लस सक्तीची करायची का ऐच्छिक, वय, मात्रा, त्या देशातील TB रोग्याचं प्रमाण अश्या बऱ्याच गोष्टींवर ती अवलंबून असतात.
जगातील 157 देशांमध्ये आजही सर्वांना ही लस देण्याचा सल्ला दिला जातो आणि 23 देशांनी मात्र ही लस बंद केली आहे. ह्या 23 देशांमध्ये स्पेन, डेन्मार्क, जर्मनी, ऑस्ट्रिया, युनायटेड किंगडम, फ्रांस, फिनलंड ह्या मुख्यत्वे करून मध्य व पश्चिम युरोपियन राष्ट्रांचा समावेश होतो.