आज २० डिसेंबर, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू आणि शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा स्मृतिदिन. यानिमित्त त्यांच्या नावाने वसविण्यात आलेल्या टोप संभापूर येथील त्यांच्या समाधी मंदिराला भेट देऊन अभिवादन केले.
करवीरचे छत्रपती संभाजी महाराज यांनी इ.स. १७१४ ते इ.स.१७६० पर्यंत तब्बल ४६ वर्षे राज्य केले. इ.स. १७१८ च्या सुमारास कोट कोल्हापूर, पन्हाळा, राजापूर, नरगुंद, तोरगल, कोपल, तारळे, आजरे, बेळगाव आणि कुडाळ अशा १० सुभ्यासह एकूण ४६ किल्ले त्यांच्या ताब्यात होते.
तब्येतीच्या कारणास्तव एका लढाईतून करवीरला परतत असताना टोप नजीकच्या माळावर महाराज कैलासवासी झाले. महाराजांच्या पत्नी छ. महाराणी साहेब जिजाबाई यांनी महाराजांचे हे समाधी मंदीर १७६४ साली बांधले.
या मंदिराच्या पूजेअर्चेसाठी, देखभालीसाठी मानकरी नेमले गेले आणि येथेच गाव वसविले आणि गावाचे नाव 'संभापूर' ठेवले.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh