काल पर्वा च्या मार्केट फॉल मध्ये बरेच नवोदित लोकांना खूप काही शिकायला मिळाले असेल , कारण मी मागील चार वर्षे मार्केट मध्ये असून ही मला ही थोडा झटका बसलाच की,
#मराठी_शेरमार्केट @Share_Bajaar @iamShantanu_D @MarathiRojgar @marathistock @MarathiRT
@jimodiji
खास करून जे लोक हर्षद मेहता स्कम बघून मार्केट मध्ये नशीब अजमवायला उतरले त्यांना मार्केट नी एक रिऍलिटी शॉक दिला.
पण एक चांगल दिसलं की मराठी माणसा मध्ये गेल्या लॉकडाऊन च्या काळात ह्या शेर मार्केट च्या क्षेत्रात बरीच जागरूकता तयार झाली.
त्यातील बरेच लोक मार्केट ला सट्टा न समजता एक अभ्यासाचा भाग म्हणून घ्यायला लागले.
त्यामुळे ह्या ऑनलाइन क्लास घेणाऱ्यांचे फावले ते सोडा पण, या तुन जर कोणी मराठी राकेश झुंझुंवला किंवा रामकृष्ण दमनी तयार झाले तर चांगलाच आहे.
पण चित्रपट सिरीज बघून मोटिव्हेट झालेल्या लोकांना माझं एक सांगणं आहे की, एखादाच कोणी हर्षद मेहता असतो आणि त्या काळात दाखवलेला शेर मार्केट आणि आताच शेर मार्केट यात जमीन अस्मान च अंतर आहे.
त्यामुळं भोळचट कल्पना मनात आणून कोणी ही मार्केट मध्ये येऊ नये. मार्केट काही यशाचा शॉर्टकट नाही. मेहनत केल्या शिवाय इथे काही मिळत नाही. मान्य आहे शारीरिक मेहनत कमी आहे पण इथे बौद्धिक मेहनत खूप आहे.
मी स्वतः गेली चार वर्षे मार्केट मध्ये आहे वेगवेगळ्या प्रकारचे मार्केट प्रकार हाताळलेत मी. डिलिव्हरी, ऑपशन, फॉरेक्स ई.
मार्केट मध्ये ट्रेडींग करताना बऱ्याच प्रकारच्या अनुभवातून घेलोय. त्यामुळं ह्यावर भाष्य करायच धैर्य करतोय.
सर्वात पहिले आपण आपल्याला ओळखलं पाहिजे की आपण कोणत्या प्रकारचे मार्केट प्लेअर आहोत.
लॉंग टर्म इन्व्हेस्टर, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर, ट्रेडर, इ.
हे टाईप आपल्या ला मोकळया मिळणाऱ्या वेळे वर असत,
जर आपल्या कडे 2-3 महिन्यातून एकदाच वेळ देण्या सारखा असेल तर आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टर म्हणून पैसे टाकलेले चांगले.
जर आपण 15 -30 दिवसातून किंवा 4-5 दिवसातून एकदा मार्केट पाहू शकणार असाल तर शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर होणे उत्तम
आणि
जर आपण दिवसातील कमीत कमीत 3 तास दरोराज मार्केट मध्ये लक्ष देऊ शकलो तर इंट्रा डे ट्रेडर होता येईल.

लॉंग टर्म म्हणजे मार्केट मधल्या मोठ्या नामांकित कंपनी मध्ये त्यांच्या भविष्यातील आराखडे अभ्यासून आपले पैसे टाकून मिळणाऱ्या up ट्रेंड चा अनुभव घेणे
शॉर्टटर्म ट्रेडिंग ही 2-4 दिवसा पासून ते 5 ते 10 दिवस सुद्दा असू शकते त्यात आपण कंपनी च्या आताच्या कामामुळे त्या कंपनी च्या शेर मध्ये आलेल्या तेजी चा फायदा घेऊन नफा कमावता येतो.
यावेळी आपल्याला कंपनी च्या fundamental analysis म्हणजेच कंपनी च्या बॅकग्राऊंड शिवाय technical analysis म्हणजेच चार्ट च्या पॅटर्न चा अभ्यास महत्वाचा असतो.
ट्रेडर किंवा इन्ट्राडे ट्रेडर म्हणजे आपण दिवसातील ३ -४ तास कमीत कमी देऊन दिवस भरतील होणाऱ्या चढ उतारा ना मध्ये आपला नफा कमवायचा असतो. यात technical analysis फार महत्वाचे ठरते, सोबत जेव्हा आपण इन्ट्राडे स्टडी करतो
तेव्हा ते फक्त त्या दिवसा पुरता न राहता मागील 4 ते 5 दिवास जर तुम्ही त्याचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला दिवसातील चढ उतार समजणे सोप्पे जाते आणि तुम्ही नफा कमवु शकता.
इन्ट्राडे मध्ये आपण डिलिव्हरी म्हणजे एखाद्या कंपनी च्या शेर मध्ये पैसे टाकून त्याच दिवसात विकणे गरजे चे असते.
तसेच इन्ट्राडे साठी एक ऑपशन कॉल ट्रेडिंग चा पण पर्याय असतो ह्यात नफा अधिक प्रमाणात कमावण्याची शक्यता असते पण जसे म्हणतात की more risk more profit ही गोष्ट इथे विसरता येणार नाही, " अधिक नफा तर अधिक जोखीम".
म्हणून पूर्ण अभ्यास झाल्या शिवाय ह्या ऑपशन्स ट्रेडिंग म्हणजेच वायदे बाजार च्या खेळत पडू नये.

त्याच बरोबर शेरमार्केट मध्ये येताना ब्रोकर कडून लागणाऱ्या ब्रोकरेज कडे लक्ष देणे पण गरजेचे आहे. बऱ्याच वेळेला कमावलेला नफा हा ब्रोकरेज मध्येच जातो.
ह्या काही खूप वर वर च्या गोष्टी झाल्या मार्केट बद्दलच्या मार्केट आजून खूप डीप आहे. मार्केट मध्ये येण्या पेक्षा मार्केट मधून प्रॉफिट बुक करून कधी निघायचं हे समजणं फार महत्त्वाचं आहे,
त्यात पण नुसतं प्रॉफिट बुक करून निघणं नाही तर डिमॅट अकाउंट मधून पैसे कधी काढायचे आणि कधी फिरवायचे हे समजणं फार महत्त्वाचं आहे, नाही तर आपण खूप नफा कमावतो आणि नंतर काही एका ट्रेड मध्ये सगळे पैसे जातात आणि आपण परत जैसे थे येऊन बसतो ते money managment करणे फार महत्वाचे आहे.
....नंतर कधी तरी आपण
फॉरेक्स मार्केट,
ऑपशन्स ट्रेडिंग
technical analysis
fundamental analysis
fund managment इत्यादी विषय बोलू.

धन्यवाद🙏

- प्रेम कोरडे

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with The Teacher

The Teacher Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!