जगात काही लोकं शापित म्हणून जन्माला येतात अन शापित म्हणूनच मारतात.त्या यादीतलं अग्रगण्य नावं असेल तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे.
अफाट अन अचाट शब्द प्रतिभा लाभलेला लेखक. त्यांनी जेवढा लेखन प्रपंच केला.जेवढी साहित्य निर्मिती केली, तेवढी इतर कोणीही केली असती तर 👇
त्याला डोक्यावर घेऊन मराठी वाचक अक्षरशः नाचला असता. त्यांना दलित साहित्यिक म्हणून एका कोपऱ्यात ठेवून दिलं गेलं आहे. त्यांच्या लेखनाची कोणीही मुक्त मनाने, बुध्दीने चिकित्सा करत नाही. सोनं तुम्ही पारखलच नाही तर ते सोनं आहे तुम्हाला कळणारच नाही.👇
इंग्रजी साहित्य वाचून त्याला भारतीय भाषात आणून नसती उठाठेव करणारे आज मोठे साहित्यिक म्हणून गणले गेलेत.
अण्णाभाऊ ज्या समाजातून आले, ज्या परिस्थिती राहून त्यांनी हा जो साहित्य डोंगर उभा केलाय तसा करणारा दुसरा कोणीही त्यांच्या आसपास दिसत नाही. 👇
उपाशी पोटी संघर्षाच्या, लढ्याच्या, अगतीकतेच्या कथा त्यांनी लिहिल्या नसत्या तरच नवल.पण सूर्य कितीही झाकून ठेवायचा प्रयत्न केला तरी एक ना एक दिवस तो त्या ग्रहनातून बाहेर येणारच आहे तसंच तो समस्त जणांचे डोळे दिपवून टाकनारच आहे.👇
अण्णाभाऊ म्हणजे फक्त फकीराच असं समीकरण तयार करून त्यांच्या इतर 34 कादंबऱ्या, पोवाडे, प्रवासवर्णन, नाट्य इ. अंधाऱ्या खोलीत नेऊन टाकण्याचा डाव आहे. त्यांच्या प्रत्येक कादंबऱ्या पोवाडे तसंच कथा त्यांच्या लेखन प्रतिभेची साक्ष देणारी आहे.👇
सच्च्या मराठी वाचक वर्गाला एवढीच विनंती, लेखकांना तरी जातीच्या पिंजऱ्यात टाकू नका व दुर्लक्षाच्या हत्याराने मारू नका. कारण अण्णाभाऊंच्या सारखे लेखक रोज रोज जन्म घेत नाहीत. 🙏🙏🙏
सुलेखन :- चेतन दादू शेंडगे ( शब्दयोगी )
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
आपण म्हणजे मी, तु ..आपण सगळेच..ज्या प्रकारच्या rat race चा भाग झालो आहोत..ओरबाडून घेण्याच्या ( मंग ते सुख असो यश असो पैसा असो की आणखी काहीही..) मानसिकतेत जगत आहोत..त्याला ब्रेक देण्यासाठी छेद देण्यासाठी अशाच प्रकारच्या time out ची गरज होती की काय ? 👇
असं वाटायची वेळ आली आहे. ज्या प्रकारे नैसर्गिक साधन संपत्ती लुटली जात आहे, निसर्गाचा र्हास होत आहे ..वायू जल माती प्रदूषण होत आहे, त्यावर ते रोखण्यासाठी कोणीही एक क्षण ही थांबून विचार करण्याच्या मनस्थितीत दिसत नाही/नव्हता. कोणालाही दुसऱ्याचापण विचार केला पाहिजे किंवा 👇
तो जगेल तर मी जगेल हा विचारच मनाला शिवत नव्हता...
पण आज या कोरोनामुळं तरी आपण दुसऱ्याचा विचार करायला लागू असं मला वाटतंय...
हा वेळ पूर्ण मानवजातीने strategic time out सारखा वापरला पाहिजे !.आपण कुठून सुरवात केली ..आता कुठं आहोत ..आणि पुढं कुठं जायचं आहे..👇
आजवर शेकडो म्हंटलं तरि चालतील एवढी पुस्तकं वाचली असतील, पण जे सुख, आनंद आणि त्रुप्ती या पुस्तकाने दिली ती मला तरी दुसऱ्या कुठल्याच पुस्तकांतून मिळालेली नाही..👇
आजही मला रामायण ही काल्पनिक कथाच वाटंत आली आहे.. त्याला इतिहास मानण्याचे आजही माझे मन आणि बुद्धी नाकारते..पण जो प्रभाव रामायण परिणामी रामा ने भारतीय समाज मनावर केला आहे तेवढा कुठल्याही सत्य किंवा काल्पनिक व्यक्तीचा भारतीय समाज मनावर झालेला नाही हे पण तेवढंच सत्य आहे.👇
या पुस्तकांत राम , इंद्र , यम , विष्णू , ब्रह्मदेव असो नाहीतर रावण या आणि अशा सर्व पात्रांना माणूस ( सामान्य असो किंवा असामान्य ) रूपात वर्णन करायचं खुप मोठं धाडस या लेखकाने केलेलं आहे..
आजपर्यंत आपण रामायण रामच्या बाजुने वाचत आलो , ऐकत आलो , समजून घेत आलो.. 👇